नागपुरात सिव्हर लाईन व फूटपाथवरील अतिक्रमणाचा सफाया
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 4, 2020 00:37 IST2020-02-04T00:36:40+5:302020-02-04T00:37:26+5:30
महापालिकेच्या प्रवर्तन विभागाच्या अतिक्रमण विरोधी पथकाने सोमवारी महाल व आसीनगर झोन क्षेत्रातील सिवरलाईन व फूटपाथवरील अतिक्रमणांवर हातोडा चालविला. बडकस चौक ते गांधी पुतळा चौकापर्यंतचा मार्ग अतिक्रमणमुक्त करण्यात आला.

नागपुरात सिव्हर लाईन व फूटपाथवरील अतिक्रमणाचा सफाया
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : महापालिकेच्या प्रवर्तन विभागाच्या अतिक्रमण विरोधी पथकाने सोमवारी महाल व आसीनगर झोन क्षेत्रातील सिवरलाईन व फूटपाथवरील अतिक्रमणांवर हातोडा चालविला. बडकस चौक ते गांधी पुतळा चौकापर्यंतचा मार्ग अतिक्रमणमुक्त करण्यात आला.
आसीनगर झोन क्षेत्रातील मानवनगर, बंगाली आटा चक्की जवळील रहिवासी सतीश साखरे, लीलाबाई चव्हाण, सुधीर चव्हाण व अंबादे आदींनी सिवरलाईनवर अनधिकृ त बांधकाम केले होते. यामुळे सिवरलाईनची दुरुस्ती व देखभाल करताना अडथळा निर्माण झाला होता. यासंदर्भात परिसरातील नागरिकांनी तक्रार केली होती. अतिक्रमण करणाऱ्यांना झोन कार्यालयातर्फे नोटीस बजाण्यात आली होती. त्यानंतरही अतिक्रमण न हटविल्याने पथकाने कारवाई केली. झोनचे सहायक आयुक्त गणेश राठोड यांच्या निर्देशानुसार ही कारवाई करण्यात आली.
महाल झोन क्षेत्रातील चिटणवीस पार्क चौक येथील विनोद हरदास यांनी पार्किं गच्या जागेवर दोन दुकानांचे बांधकाम परवानगी न घेता केले होते. यासंदर्भात त्यांना नोटीस बजावण्यात आली होती. त्यानंतरही अतिक्रमण न हटविल्याने कारवाई अनधिकृत बांधकाम तोडण्यात आले. त्यानंतर पथकाने बडकस चौक ते गांधी पुतळा चौकापर्यंतच्या मार्गावरील ७ हातठेले जप्त करून परिसर अतिक्रमणमुक्त केला. ही कारवाई प्रवर्तन विभागाचे सहायक आयुक्त अशोक पाटील व प्रवर्तन निरीक्षक संजय कांबळे यांच्या मार्गदर्शनात नितीन मंथनवार, भास्कर मालवे, शादाब खान, विशाल ढोल, रोहीत बेसरे व पथकाने केली.