३०० अतिक्रमणांचा सफाया ( )

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 5, 2021 04:53 IST2021-02-05T04:53:49+5:302021-02-05T04:53:49+5:30

लोकमत न्यूज नेटवर्क नागपूर : महापालिकेच्या प्रवर्तन विभागातर्फे शहरातील अतिक्रमण हटाव मोहीम राबविली जात आहे. शुक्रवारी फूटपाथवरील तब्बल ३०० ...

Elimination of 300 encroachments () | ३०० अतिक्रमणांचा सफाया ( )

३०० अतिक्रमणांचा सफाया ( )

लोकमत न्यूज नेटवर्क

नागपूर : महापालिकेच्या प्रवर्तन विभागातर्फे शहरातील अतिक्रमण हटाव मोहीम राबविली जात आहे. शुक्रवारी फूटपाथवरील तब्बल ३०० अतिक्रमणांचा सफाया केला.

लक्ष्मीनगर झोन : त्रिमूर्ती नगर येथील मटन दुकानदारांचे सात शेड तोडण्यात आले. नाल्यावरील अवैध बांधकाम पाडण्यात आले.

धरमपेठ झोन - झाशी राती चौक, अमरावती रोडवरील ३४ अतिक्रमणे हटविली. शंकरनगर चौक ते अलंकार टॉकीज ते रामदासपेठ लेंड्रा पार्क ते बर्डी रस्त्याच्या बाजूची अतिक्रमणे काढण्यात आली. पथकाने ६६ अतिक्रमणे हटविली.

धंंतोली झोन : मौजा सोमलवाडा येथील संताजी को. ऑप. हॉ. सोसाटीत नारायणराव जिभकाटे यांनी केलेले घराचे अवैध बांधकाम तोडण्यात आले.

गांधीबाग झोन : महाल चौक ते केळीबाग रोड, नंगा पुतळा, अग्रसेन चौक परिसरातील ६६ अतिक्रमणे काढली. १२ ठेले जप्त केले.

लकडगंज झोन : सीए रोडवरील फूटपाथवरील २५ शेड तोडण्यात आले. ४५ अतिक्रमणे काढण्यात आली.

आशीनगर झोन : इंदोरा चौक ते कमाल चौक, आवळेबाबू चौक परिसरातील रस्ते मोकळे करण्यात आले. पथकाने ७६ अतिक्रमणे हटविली.

मंगळवारी झोन : रेल्वे स्टेशन ते झिंगबाई टाकळी भागातील अतिक्रमणाचा सफाया करण्यात आला.

Web Title: Elimination of 300 encroachments ()

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.