शहरं
Join us  
Trending Stories
1
GST कपातीचा फायदा ग्राहकांना नाही? कंपन्यांची 'ही' चलाखी पाहून ग्राहक संतापले
2
'दादा, ओला दुष्काळ जाहीर करा'; अजित पवार शेतकऱ्यांना म्हणाले, "आता आम्हाला पाहणी तर..."
3
Mumbai: उद्योगपती नुस्ली वाडिया यांच्यासह कुटुंबावर गुन्हा दाखल, नेमकं प्रकरण काय?
4
ECINET: मतदार यादीतून नाव काढणं आता सोपं नाही; निवडणूक आयोगानं सुरू केली नवी 'ई-साइन' प्रणाली
5
पाकिस्तान युद्धात सैनिक लढला होता, नंतर पेन्शनशिवाय काढून टाकले; पत्नीला ५७ वर्षांनंतर मिळाला न्याय
6
"भारतासोबतचे संबंध महत्त्वाचे, आशा आहे की..."; अमेरिकेचे परराष्ट्र मंत्री रुबियोंनी दिले टॅरिफ कमी करण्याचे संकेत
7
Ultraviolette ने कमाल केली, X47 Crossover मोटरसायकल भारतात आली: 2.74 लाख रुपयांपासून किंमत सुरु!
8
भारतातील एकमेव सक्रिय ज्वालामुखी अचानक गरजला! अंदमानमध्ये भूकंपाचा धक्का जाणवला
9
Rapido मुळे अचानक Swiggy कडे आले २४०० कोटी रुपये, नक्की काय आहे प्रकरण?
10
एकाच वेळी पाच-सहा मराठी सिनेमे रिलीज, कसं व्हायचं? प्रसिद्ध गायकाने मांडलं मत, इंडस्ट्रीबद्दल म्हणाला...
11
चांगले मायलेज हवे असेल तर टायरमधील हवा नेमकी किती असावी? टायरवाला तर ४० पीएसआय भरतो...
12
Dussehra 2025: दसऱ्याला गुपचूप करा 'हे' धनप्राप्तीचे उपाय; कुबेर महाराज होतील प्रसन्न
13
घरी रोख रक्कम ठेवण्याची मर्यादा किती? जाणून घ्या आयकर विभागाचा महत्त्वाचा नियम
14
एच-१बी व्हिसा धोरणावर अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी ३६ तासांतच यू-टर्न का घेतला? 
15
सकाळ सकाळीच उपमुख्यमंत्री अजित पवार करमाळ्यात; पूरग्रस्त भागाची पाहणी सुरू
16
ग्राहकांची झुंबड! वाहनांच्या विक्रीने नवा उच्चांक गाठला; कोणत्या क्षेत्रांना किती होणार फायदा?
17
सोलापुरातील महापुराचा रेल्वे वाहतुकीला फटका; वंदे भारत, सिद्धेश्वर एक्सप्रेसला उशिरा, अनेक गाड्या सोलापूर विभागात थांबविल्या
18
UPI EMI: आता UPI पेमेंट करताना EMI चा पर्याय निवडता येणार; NPCI आणणार नवी सुविधा
19
रोज-रोज चटणी भात... पतीने केली चिकनची मागणी; पत्नीने नकार देताच उचलले टोकाचे पाऊल!
20
"अवामवर बॉम्बस्फोट करुन वेळ मिळाला तर...", भारताच्या क्षितिज त्यागी यांनी संयुक्त राष्ट्र मानवाधिकार परिषदेत पाकिस्तानला सुनावले

विदर्भवाद्यांचा एल्गार, स्वतंत्र राज्यासाठी उद्यापासून नागपूर अन् बुलडाण्यात आमरण उपोषण

By नरेश डोंगरे | Updated: December 25, 2023 22:55 IST

शेंडी तुटो की पारंबी, विदर्भ राज्यासाठी गावोगावी होणार 'रस्ता रोको'

नागपूर : मुबलक नैसर्गिक साधन सुविधां असूनही केवळ राज्यकर्त्यांच्या स्वार्थापोटी विदर्भाची वाताहत सुरू आहे. शेतकरी आत्महत्या, कुपोषण, बेरोजगारी, नक्षलवादामुळे विदर्भ ओसाड झाला आहे. त्यामुळे स्वतंत्र राज्य मिळावे म्हणून बुधवारी २७ डिसेंबरपासून नागपूर तसेच बुलडाणा येथे आमरण उपोषण केले जाणार असल्याची माहिती विदर्भ राज्य आंदोलन समितीचे अध्यक्ष ॲड. वामनराव चटप यांनी आज पत्रकार परिषदेत दिली.

सविनय कायदेभंगाच्या आंदोलनासोबतच आत्मक्लेश आंदोलनही केले जाणार असल्याचे त्यांनी सांगितले. यावेळी समितीचे कोर कमिटी सदस्य प्रा. प्रभाकर कोंडबत्तूनवार, अरुण केदार, तात्यासाहेब मते, नरेश निमजे, रंजना मामर्डे, ॲड. मृणाल मोरे, अशोक पाटील, सुनीता येरणे, राजेंद्र सतई आदी उपस्थित होते.

विदर्भात वीज, पाणी, कोळसा, अशी मुबलक नैसर्गिक साधने असतानादेखील राजकारण्यांमुळे विदर्भाचा मागासलेपणा संपता संपत नाही. नापिकी, आर्थिक कोंडीमुळे शेतकऱ्यांना आत्महत्या कराव्या लागतात आहे. मोठ्या प्रमाणात गर्भवती महिला- माता आणि बालके कुपोषणामुळे मरत आहेत. रोजगार नसल्याने बेरोजगारांची गावोगावी फाैज निर्माण झाली आहे. विदर्भात दरवर्षी अधिवेशन होते मात्र जनतेच्या ज्वलंत प्रश्नांवर, समस्यांवर चर्चाच होत नाही.

विदर्भाला सुजलाम्, सुफलाम् बनवायचे असेल, तर ३१ डिसेंबरपर्यंत स्वतंत्र विदर्भ राज्य निर्माण करा अशी, अशी मागणी आम्ही केली आहे. या मागणीच्या पूर्ततेसाठी आम्ही नागपूरच्या संविधान चाैकात २७ डिसेंबरपासून आमरण उपोषण करणार आहोत, या आंदोलनाला विदर्भातील गावागावांतून नागरिकांचे समर्थन मिळत आहे. त्याचमुळे ईकडे आंदोलन आणि तिकडे गावोगावी रास्ता रोको केला जाणार आहे. हे आंदोलन आता मागे घेतले जाणार नाही. शेंडी तुटो की पारंबी, अशी आमची भूमीका असल्याचेही ॲड. चटप यांनी सांगतिले.

बुलडाण्यातील जनताही आग्रहीनागपूरला २७ डिसेंबरपासून आमरण उपोषण केले जाणार असल्याचे माहिती झाल्याने बुलडाणा जिल्ह्यातील समितीच्या सदस्यांनीही आम्हाला तिकडे आमरण उपोषण करण्याचा आग्रह धरून परवानगी मागितली. तिकडच्या जिल्ह्यातील जनतेला नागपूरात येऊन उपोषणाला बसणे शक्य होत नसल्याचे ध्यानात घेऊन विदर्भ राज्य आंदोलन समितीने त्यांना परवानगी दिली. त्यानुसार, २७ डिसेंबरपासून नागपुरात ॲड. चटप, पत्रकार प्रकाश पोहरे, रंजना मामर्डे, अरुण केदार, मुकेश मासुरकर आणि वीरेंद्र जयस्वाल तर, बुलडाण्यात ॲड. सुरेश वानखेडे, तेजराव मुंढे, प्रा. राम बारोटे, विलास फाटे, प्रकाश अवसरमोल आणि रविकांत आढाव हे आमरण उपोषणाला बसणार आहेत.

टॅग्स :nagpurनागपूरVidarbhaविदर्भ