शहरं
Join us  
Trending Stories
1
मुंबई हादरली..! लाइव्ह म्युझिक कॉन्सर्टमध्ये ड्रग्जच्या ओव्हरडोजने २ विद्यार्थ्यांचा मृत्यू, नेस्कोच्या अधिकाऱ्यांसह ५ अटकेत, १ तरुणी गंभीर
2
आजचे राशीभविष्य, १४ एप्रिल २०२६: कामात यश मिळेल, घरात सुख-शांती नांदेल, नशिबाची साथ मिळेल.
3
उद्यापासून उष्णतेच्या लाटेचा तडाखा, अकोला @ ४३.८
4
यंदा कसा असेल पाऊस? हवामान खात्याने मान्सूनबाबत दिली चिंता वाढवणारी माहिती
5
बिहारमध्ये नवीन सरकार स्थापनेच्या हालचालींना वेग, उद्या शपथविधी सोहळा होण्याची शक्यता
6
पूर्ववैमनस्यातून पत्नीच्या डोळ्यांसमोर दादरमध्ये तरुणाची निर्घृण हत्या
7
९ महिने तपास रखडवला, मुलीचा सांगाडाच हाती; २८ पोलीस निलंबित
8
अवैध प्रवासी वाहतूक बेतली जिवावर, ११ जणांचा मृत्यू, कल्याण-मुरबाड महामार्गावर नेमका कसा घडला अपघात?
9
मतदारसंघ पुनर्रचना अत्यंत धोकादायक अन् संविधानावर हल्ला, सोनिया गांधींची टीका
10
नाकाबंदी : इराणची आर्थिक कोंडी करणारी व्यूहरचना
11
अमेरिकेकडून होर्मुझची नाकाबंदी सुरू; समुद्रात गस्त वाढवली, युद्ध भडकणार
12
"हे खूप क्रूर असेल, जवळ आले की नष्ट करू", नाकेबंदी सुरू होताच ड्रोनाल्ड ट्रम्प यांची इराणला नवी धमकी
13
SRH चा 'प्रफुल्लित' विजय! सनरायझर्सच्या दोन रायझिंग स्टार्संसमोर RR च्या 'धुरंधरां'नी टेकले गुडघे
14
"मी साडी नेसलेली होती, त्यात अश्लीलता कुठे होती?", ती तरुणी ढसाढसा रडली, ट्रोलिंगनंतर 'धक-धक' गर्ल काय म्हणाली?
15
डोनाल्ड ट्रम्प यांच्या धमकीमुळे भारताच्या अडचणी वाढणार, होर्मुझ बंद झाली तर आता काय होईल?
16
Praful Hinge नं सांगून पहिल्याच बॉलवर काढली Vaibhav Suryavanshi ची विकेट; मॅचनंतर म्हणाला...
17
बालमैत्रिणीसाठी आशाताई दोनदा आल्या गडहिंग्लजला! महिला बँकेचे उद्घाटन, महाविद्यालयाच्या मदतीसाठी विनामूल्य कार्यक्रम 
18
शॉम्पूच्या बॉटलमध्ये ४.२६ कोटींचे कोकेन, नागपुरात राजधानी एक्सप्रेसमध्ये सिनेस्टाईल कारवाई
19
Praful Hinge : विदर्भकराचा पदार्पणात महारेकॉर्ड! पहिल्या षटकात वैभव सूर्यवंशीसह तिघांची विकेट घेत रचला इतिहास
20
युद्ध पुन्हा पेटणार! ट्रम्प यांचा मोठा आदेश आणि नेतन्याहूंचा सीजफायर संपवण्याचा इशारा, म्हणाले...
Daily Top 2Weekly Top 5

केंद्र सरकारच्या धोरणाविरुद्ध एल्गार

By admin | Updated: May 27, 2017 02:53 IST

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या आर्थिक धोरणाविरोधात विदर्भ राज्य आंदोलन समितीतर्फे शुक्रवारी संविधान चौक येथे सांकेतिक उपोषण करण्यात आले.

विदर्भ राज्य आंदोलन समितीचे सांकेतिक उपोषण : रिझर्व्ह बँकेसमोर निदर्शने लोकमत न्यूज नेटवर्क नागपूर : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या आर्थिक धोरणाविरोधात विदर्भ राज्य आंदोलन समितीतर्फे शुक्रवारी संविधान चौक येथे सांकेतिक उपोषण करण्यात आले. यानंतर रिझर्व्ह बँकेसमोर तासभर निदर्शने करण्यात आली. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी घेतलेल्या नोटाबंदीच्या निर्णयापासून देशात आर्थिक आणीबाणीसारखी परिस्थिती तयार झाली आहे. शेतकऱ्यांच्या शेतीमालाच्या किमती मातीमोल झाल्या आहेत. ग्रामीण अर्थव्यवस्था साफ कोलमडली आहे. हजारो उद्योग बंद झाले आहेत. तर शेकडो उद्योग आॅक्सिजनवर आहेत. त्यामुळे लाखो तरुण बेरोजगार झाले आहेत. व्यापाऱ्यांचा व्यापार कमी झाला असून कायद्याच्या छडीमारीमुळे व्यापारी दहशतीत आले आहेत. एटीम खाली पडले आहेत. एकूण सामान्य जनतेसह सर्वचजण त्रस्त आहेत. हे सर्व पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी घेतलेल्या हिटलरशाही निर्णयामुळेच झाल्याची टीका यावेळी आंदोलकांनी केली. आंदोलनात ज्येष्ठ नेते अ‍ॅड. वामनराव चटप, राम नेवले, डॉ. श्रीनिवास खांदेवाले, अ‍ॅड. प्रबीरकुमार चक्रवर्ती, अ‍ॅड. नंदा पराते, अ‍ॅड. अर्चना नंदघळे, सरोज काशीकर, जयंतराव चितळे, दिलीप घोरमारे, अरुण केदार, अरविंद देशमुख, प्रभाकर कोहळे, रंजना मामर्डे, मोरेश्वर टेंभुर्डे, राजकुमार नागुलवार, श्याम वाघ, भीमराव फुसे, वनश्री सिडाम, पुरुषोत्तम पाटील, कृष्णाजी भोंगाडे, धर्मराव रेवतकर आदींसह शेकडो कार्यकर्ते सहभागी झाले होते. महाव्यवस्थापकांंना निवेदन सादर या आंदोलनानंतर विदर्भ राज्य आंदोलन समितीच्या शिष्टमंडळातर्फे रिझर्व्ह बँकेचे महाव्यवस्थापक देवाशिष दत्ता यांच्या माध्यमातून पंतप्रधान नरेंद्र मोदी व रिझर्व्ह बँकेचे गर्व्हनर उर्जित पटेल यांना निवेदन सादर केले. बँकेत पैसे भरताना व काढताना तीन व्यवहारानंतर सुद्धा कुठलेही सेवा शुल्क लावू नये, मायक्रो फायनान्स कंपन्यांद्वारे मोठ्या प्रमाणावर व्याज आकारून शोषण केले जात आहे. ते तातडीने थांबवण्यात यावे, आदी मागण्यांचा या निवेदनात समावेश आहे.