नागपुरात निवडणूक खर्च निरीक्षकांनी केली दारू दुकानांची तपासणी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 14, 2019 22:34 IST2019-10-14T22:31:47+5:302019-10-14T22:34:40+5:30
सोमवारी अचानक सहायक खर्च निरीक्षक राजेश सांगुळे यांनी शहरातील काही वाईन शॉपवर भेट देऊन दारूसाठ्यांची तपासणी केली.

नागपुरात निवडणूक खर्च निरीक्षकांनी केली दारू दुकानांची तपासणी
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : विधानसभा निवडणुकीसाठी निवडणूक खर्च निरीक्षक नियुक्त करण्यात आले आहेत. एकीकडे उमेदवारांच्या खर्चाची लेखा तपासणी सुरू आहे. यातच सोमवारी अचानक सहायक खर्च निरीक्षक राजेश सांगुळे यांनी शहरातील काही वाईन शॉपवर भेट देऊन दारूसाठ्यांची तपासणी केली. यावेळी सर्वकाही व्यवस्थित आढळून आल्याने त्यांनी समाधान व्यक्त केले.
विधानसभा निवडणूक विभागाचे सहायक खर्च निरीक्षक राजेश सांगुळे यांनी सोमवारी अचानक राज्य उत्पादन शुल्क विभागातील निरीक्षक रावसाहेब कोरे व कर्मचाऱ्यांना बोलवून घतले. त्यांना घेऊन ते जरीपटका पोलीस स्टेशन हद्दीतील इरोज वाईन शॉप, गिरीश वाईन शॉप, तनवानी वाईन शॉप, बापुंना वाईन शॉप व नॅशनल वाईन शॉप इत्यादी पाच ठिकाणी अनपेक्षितपणे पोहोचले. या सर्व ठिकाणी आजची मद्यविक्री वजा जाता मद्यसाठे तपासले. ते सर्व बरोबर मिळून आल्याने राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या कामकाजाबाबत समाधान व्यक्त केले व संचालकांना नियमांचे काटेकोर पालन करण्याच्या सूचना दिल्या. यावेळी दुय्यम निरीक्षक पूजा रेखे, सहायक दुय्यम निरीक्षक कवडू रामटेके, कॉन्स्टेबल महादेव कांगणे व विशाल निकुरे यांनी निरीक्षणकामी मदत केली.