कारच्या धडकेत वृद्धाचा मृत्यू
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 4, 2020 04:22 IST2020-12-04T04:22:57+5:302020-12-04T04:22:57+5:30
माैदा : भरधाव कारचालकाने रस्त्याने पायी जाणाऱ्या वृद्धास जाेरदार धडक दिली. त्यात गंभीर जखमी झालेल्या वृद्धाचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. ...

कारच्या धडकेत वृद्धाचा मृत्यू
माैदा : भरधाव कारचालकाने रस्त्याने पायी जाणाऱ्या वृद्धास जाेरदार धडक दिली. त्यात गंभीर जखमी झालेल्या वृद्धाचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. ही घटना अराेली पाेलीस ठाण्याच्या (ता. माैदा) हद्दीतील काेदामेंढी फाटा येथे मंगळवारी (दि. १) सकाळी ९ वाजताच्या सुमारास घडली.
लच्छीराम सीताराम थाेटे (८०, रा. नांदगाव, ता. माैदा) असे मृताचे नाव आहे. मृत लच्छीराम हे काेदामेंढी फाटा परिसरातील रस्त्याने पायी जात असताना, एमएच-३१/डीके-०४८९ क्रमांकाच्या ओमनी कारने त्यांना जबर धडक दिली. लागलीच त्यांना काेदामेंढी येथील प्राथमिक आराेग्य केंद्रात दाखल करण्यात आले. तेथे उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला. याप्रकरणी अराेली पाेलिसांनी आराेपी कारचालक दिनेश कन्हैया बिसेन (३८, रा. नांदगाव) याच्याविरुद्ध भादंवि कलम २७९, ३३८, ३०४ (अ) अन्वये गुन्हा नाेंदविला असून, घटनेचा तपास पाेलीस उपनिरीक्षक ऋषिकेश चाबुकस्वार करीत आहेत.