शहरं
Join us  
Trending Stories
1
Marathi Compulsion: मुजोरी केली तर थेट परवानाच रद्द करणार; परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांचा इशारा
2
मराठी सक्तीवरून राजकीय संघर्ष सुरू, शिंदेसेना- मनसे आमनेसामने, दहिसरमध्ये नेमकं काय घडलं?
3
सर्व प्रवासी वाहनांसाठी लागू होणार मराठी सक्ती, परिवहन विभागाने टाकली कायदेशीर पावले
4
समुद्रात पेरल्या जाताहेत मृत्यूच्या खाणी! ट्रम्प यांच्या 'प्लॅन २' मुळे इराणची झोप उडाली; जगाचं टेन्शन वाढलं
5
मोठी बातमी! RBI कडून पेटीएमचा बँकिंग परवाना कायमचा रद्द; युजर्सवर काय परिणाम होणार...
6
इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांना कर्करोग! स्वतःच केला धक्कादायक खुलासा; आता कशी आहे तब्येत?
7
पुण्यात भरवर्दळीत सलूनमध्ये घुसून गोळीबार; दोघे जखमी
8
चार मुले जन्माला घाला, त्यातील एक संघाला द्या; बागेश्वर धामचे धीरेंद्र कृष्ण शास्त्री यांच्या विधानावरून नव्या वादाची चिन्हं
9
Travel : चक्क लाटा बाजूला सारून दर्या दुभंगतो; समुद्राच्या पोटातून रस्ता जातो! कुठे आहे ही जागा?
10
आप फुटली, भाजपाची ताकद वाढली! राज्यसभेत आता कोणत्या पक्षाचे किती खासदार?
11
Travel : आयआरसीटीसीची पुरी, कामाख्या बैद्यनाथ तसेच दिव्य दक्षिण यात्रा; पुणे आणि नागपुरातून प्रारंभ 
12
'आप'ला भगदाड, खासदारांचा मोठा गट फुटला! अरविंद केजरीवाल म्हणाले, "भाजपाने पुन्हा..."
13
नेपाळमध्ये भारतीय भाविकांच्या बसला अपघात; २१ जण जखमी, ६ वर्षांच्या चिमुरडीसह एका महिलेचा मृत्यू
14
तरुणीला 'हाय' केले अन् वाद पेटला; लग्नातील वऱ्हाडी थेट २० फूट खड्ड्यात, एकाचा मृत्यू ८ जण जखमी, विकासकाविरुद्ध गुन्हा 
15
Latest Marathi News LIVE Updates: आम आदमी पक्षाला मोठा धक्का; राज्यसभेचे ७ खासदार फुटले, भाजपात प्रवेश करणार
16
मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमारांना हटवण्याची मागणी; ७३ खासदारांचे सभापतींना पत्र
17
९०% मार्क्स, आयआरएससोबत वडिलांची ओळख अन् लक्झरी लाईफचं वेड; हुशार राहुल मीणा गुन्हेगार कसा झाला?
18
Raghav Chadha: राघव चड्ढा, हरभजनसिंग भाजपात! आम आदमी पार्टीत उभी फूट, राज्यसभेच्या १० पैकी ७ खासदारांचा पक्षाला 'राम-राम'
19
Raghav Chadha : राघव चड्ढांनी २१ दिवसांपूर्वीच दिले होते 'आप'मधील फुटीचे संकेत; भाकीत ठरलं खरं
20
“रिक्षा-टॅक्सी, ओला-उबेर, रॅपिडो चालकांनी मराठीत संवाद साधलाच पाहिजे”: मंत्री प्रताप सरनाईक
Daily Top 2Weekly Top 5

वृद्धेवर सामूहिक बलात्कार

By admin | Updated: February 15, 2015 02:28 IST

नशेत तर्र असलेल्या नराधमांनी वृध्दाला मारहाण करून झोपडीबाहेर काढले आणि त्याच्या वृध्द पत्नीवर सामूहिक बलात्कार केला.

नागपूर : नशेत तर्र असलेल्या नराधमांनी वृध्दाला मारहाण करून झोपडीबाहेर काढले आणि त्याच्या वृध्द पत्नीवर सामूहिक बलात्कार केला. एमआयडीसी पोलीस ठाण्याच्या हद्दीत गुरुवारी रात्री ११ वाजता ही संतापजनक घटना घडली. पीडित महिला ६० वर्षांची आहे. ती आपल्या वृध्द पतीसोबत हिंगणा - वानाडोंगरी मार्गावर झोपडपट्टीत राहते. गुरुवारी रात्री जेवण केल्यानंतर वृध्द दाम्पत्य आपल्या झोपडीत झोपले. सर्वत्र सामसूम असताना दारूच्या नशेत तर्र असलेले तीन नराधम झोपडीत आले. त्यांनी वृध्दाला अश्लील शिवीगाळ करीत मारहाण केली आणि मारहाण करीतच वृध्देवर आळीपाळीने सामूहिक बलात्कार केला. अत्यंत गरीब आणि वृद्ध असलेले हे दाम्पत्य या अमानुष प्रकारामुळे एवढे हादरले की त्यांनी मदतीसाठी आरडाओरड करण्याचीही हिंमत दाखवली नाही. नराधम पळून गेल्यानंतर त्यांनी शेजाऱ्यांना अत्याचाराची माहिती दिली. त्यामुळे आज सकाळपासून झोपडपट्टीत संतापाचे वातावरण निर्माण झाले. पोलिसांना सूचना देण्यात आली. माहिती कळताच एमआयडीसीचे पोलीस निरीक्षक महेश पाटील, एपीआय गोरे आपल्या ताफ्यासह घटनास्थळी धावले. त्यांनी पीडित महिलेवर औषधोपचार करून घेतल्यानंतर सामूहिक बलात्काराचा गुन्हा दाखल केला. यानंतर आरोपींची शोधाशोध सुरू केली. शुक्रवारी सकाळपासून एक डझनपेक्षा जास्त संशयितांची चौकशी केल्यानंतर आरोपी राहुल गजभिये (वय २३) आणि संजू महातो (वय १८) या दोघांनी गुन्ह्याची कबुली दिली. त्यांना आज कोर्टात हजर करून पोलिसांनी १८ फेब्रुवारीपर्यंत पीसीआर मिळवला. पीएसआय प्रभाकर शिवूरकर, हवलदार दिलीप ठाकरे आणि त्यांच्या सहका-यांनी आज रात्री पुन्हा एका आरोपीला ताब्यात घेतले. (प्रतिनिधी)