शहरं
Join us  
Trending Stories
1
युतीबाबत एक पाऊल पुढे! शिवतीर्थावर उद्धव-राज यांच्यात अडीच तास चर्चा, बंधुऐक्याची ‘फ्रेम’ ठरली 
2
Maratha Reservation: हैदराबाद गॅझेटियर अधिसूचनेला मुंबई उच्च न्यायालयात आव्हान; काय आहे याचिकेत?
3
सोने-चांदीने गुंतवणूकदार मालामाल, गेल्या एका वर्षात मिळाले सोन्यातून ४४ तर चांदीतून ४५ टक्के रिटर्न
4
अग्रलेख: राधाकृष्णन आता देशाचे! नव्या उपराष्ट्रपतींनी हे लक्षात ठेवायला हवेच
5
विम्याचा हप्ता दहा वर्षांत दुप्पट! कंपन्यांकडून ग्राहकांची लूट; भीती दाखवून प्रीमियमवाढ
6
Maratha Reservation: राज्यात आजपर्यंत दिलेल्या कुणबी प्रमाणपत्रांची श्वेतपत्रिका काढावी; ओबीसी मंत्रिमंडळ उपसमितीची भूमिका
7
विशेष लेख: एका परिवर्तनशील, सहृदय नेतृत्वाचा अमृतमहोत्सव
8
नेपाळमध्ये देशभरात संचारबंदी लागू; महाराष्ट्रातील १०० पर्यटकांसह शेकडो प्रवासी अडकले 
9
भारत-अमेरिका यांच्यात चर्चेची दारे खुली होणार; पंतप्रधान मोदी म्हणाले, "ट्रम्प यांच्याशी..."
10
नेपाळनंतर फ्रान्समध्येही जनतेचा उद्रेक; २५० निदर्शकांना अटक 
11
Asia Cup 2025 : बुमराहच्या परफेक्ट यॉर्करशिवाय ही गोष्ट ठरली लक्षवेधी; कारण ६ वर्षांनी असं घडलं
12
सुशीला कार्की होणार नेपाळच्या पंतप्रधान; बालेंद्र शाहांचा पाठिंबा, आंदोलकांना केले आवाहन...
13
नागपुरातील कडबी चौकाजवळ भर रस्त्यावर व्यापाऱ्यावर गोळीबार, ५० लाखांची लूट
14
IND vs UAE : अभिषेकनं षटकारासह उघडलं खातं! गिलनं खणखणीत चौकार मारत पॉवरप्लेमध्ये संपवली मॅच
15
रुमाल पडला; तो क्रीजमध्ये यायला विसरला! सूंजचा डायरेक्ट थ्रो; पण Out बॅटरला सूर्यानं दिलं Not Out
16
'तुमचा वापर केला जातोय...', नेपाळमधील सत्तापालटानंतर केपी शर्मा ओलींची पहिली प्रतिक्रिया
17
महाराष्ट्राचे नवे राज्यपाल कोण? सीपी राधाकृष्णन राजीनामा देणार; १२ सप्टेंबरला उपराष्ट्रपतीपदाची शपथ घेण्याची शक्यता
18
शोरुममधून बाहेर पडताच नवीन कारचा अपघात झाला तर विमा मिळतो का? जाणून घ्या...
19
दात घासताना ८० वर्षीय वृद्धाच्या अन्ननलिकेत झाडाची काडी अडकली; ७ दिवस उपाशी राहिले अन्...
20
नेपाळमधील सत्तापालटावर चीनची पहिली प्रतिक्रिया; माजी पंतप्रधान ओलींचं नाव घेणं टाळलं!

स्विमिंग पूलमध्ये पोहताना आठ जण बुडाले, दोघांचा मृत्यू, चौघांचे प्राण वाचवण्यात यश

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 20, 2018 16:59 IST

पिकनिकसाठी क्रेझी केसल मध्ये गेलेल्या महाविद्यालयीन विद्यार्थ्यांपैकी सात युवक आणि एक महिला पाण्यात बुडाली.

 नागपूर - पिकनिकसाठी क्रेझी केसल मध्ये गेलेल्या महाविद्यालयीन विद्यार्थ्यांपैकी सात युवक आणि एक महिला पाण्यात बुडाली. पाच जणांना तातडीने मदत मिळाल्यामुळे त्यांचे प्राण वाचले. दोन युवकांचा मृत्यू झाला. तर, एक गंभीर अवस्थेत इस्पितळात मृत्यूशी झूंज देत आहे. रविवारी दुपारी १ ते १.३० च्या दरम्यान घडलेल्या या घटनेमुळे उपराजधात प्रचंड खळबळ उडाली आहे.

अक्षय बिंड (वय १९) आणि सागर गंगाधर सहस्त्रबुद्धे (वय २०) अशी मृतांची नावे आहेत. स्रेहल मोरघडे (वय १९) यांची प्रकृती गंभीर आहे.  मित्रांनी साथ दिली म्हणून नयन पाठराबे, अक्षय अंबुलकर, आदर्श रामटेके आणि आदित्य खवले हे  युवक बचावले. 

अंबाझरी मार्गावर असलेल्या क्रेझी केसलमध्ये सुटीच्या दिवशी खास करून दर रविवारी मोठी गर्दी असते. क्रेझी केसलचे प्रशासन विशिष्ट वेळेसाठी येथील स्विमिंग पुलमधील पाण्यात समुद्राप्रमाणे कृत्रिम लाटांची निर्मिती करते. त्यात पोहण्याचा आनंद घेण्यासाठी रविवारी दुपारी १ च्या सुमारास विविध वयोगटातील शंभरेक जण होते. प्रशासनाने इलेक्ट्रीक उपकरणांचा वापर करून पाण्यात लाटा निर्माण केल्या. सराव नसूनही खोलगट भागात असलेले अक्षय बिंड, सागर सहस्त्रबुद्धे,  नयन पाठराबे, अक्षय अंबुलकर, आदर्श रामटेके आणि आदित्य खवले हे तरुण पाण्यात बुडाले. ते ध्यानात येताच या युवकांचे मित्र यश भारद्वाज आणि रुतूज देव यांनी आरडाओरड केली. प्रशासनाला लाटांचे पाणी बंद करण्यास सांगितले. मात्र, त्यांनी कुछ नही होता, म्हणत  यश आणि रुतूजला गप्प बसण्यास सांगितले. मात्र, मित्रांचा जीव धोक्यात असल्याचे पाहून या दोघांनी  नयन पाठराबे, अक्षय अंबुलकर, आदर्श रामटेके आणि आदित्य खवले यांना आधार देत मानवी साखळी बनविली आणि त्यांना पाण्याबाहेर काढले. काही वेळेनंतर अक्षय, सागर आणि स्रेहललाही बाहेर काढण्यात आले. प्रत्यक्षदर्शींच्या माहितीनुसार, हे तिघे बेशुद्ध पडले असतानादेखिल तेथील कर्मचारी अथवा बाऊंसरने कसलीही मदत केली नाही. या मित्रांनीच आॅटो करून त्या तिघांना वोक्हार्ट हॉस्पिटलमध्ये आणले. तेथे अक्षय आणि सागरला डॉक्टरांनी मृत घोषित केले. स्रेहलवर अतिदक्षता विभागात उपचार सुरू असून त्याची प्रकृती गंभीर आहे.

 नातेवाईकांचा आक्रोश

या घटनेची माहिती कळताच मृतांचे नातेवाईक आणि मित्र मोठ्या संख्येत वोक्हार्टमध्ये पोहचले. त्यांनी तेथे एकच आक्रोश केला. प्रत्यक्षदर्शींनी सांगितलेल्या माहितीवरून या घटनेला क्रेझी केसलचे प्रशासनच जबाबदार असल्याचा आरोप करून त्यांनी तेथे उपस्थित पोलिसांना क्रेझी केसलच्या व्यवस्थापनावर गुन्हा दाखल करून कडक कारवाई करण्याची मागणी केली.

टॅग्स :Deathमृत्यूnagpurनागपूरMaharashtraमहाराष्ट्र