नागपुरातील जुगार अड्डयावरील धाडीत डॉक्टरसह अडकले ८ जण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 27, 2018 01:12 IST2018-10-27T01:09:19+5:302018-10-27T01:12:12+5:30

गिट्टीखदानमधील पेन्शननगरात एका दूध डेअरीच्या वर सुरू असलेल्या जुगार अड्ड्यावर शुक्रवारी रात्री पोलिसांनी छापा मारला. या छाप्यात पोलिसांना जुगार खेळणारे आठ जण सापडले. त्यांच्याकडून रोख १८ हजार, ८ मोबाईल आणि दोन मोटरसायकल जप्त केल्या.

Eight people with a doctor arrested in gambling den raid at Nagpur | नागपुरातील जुगार अड्डयावरील धाडीत डॉक्टरसह अडकले ८ जण

नागपुरातील जुगार अड्डयावरील धाडीत डॉक्टरसह अडकले ८ जण

ठळक मुद्देरोख, मोबाईल आणि वाहने जप्त

लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : गिट्टीखदानमधील पेन्शननगरात एका दूध डेअरीच्या वर सुरू असलेल्या जुगार अड्ड्यावर शुक्रवारी रात्री पोलिसांनी छापा मारला. या छाप्यात पोलिसांना जुगार खेळणारे आठ जण सापडले. त्यांच्याकडून रोख १८ हजार, ८ मोबाईल आणि दोन मोटरसायकल जप्त केल्या.
परिमंडळ दोनच्या उपायुक्त पथकाने तसेच गिट्टीखदान पोलिसांनी संयुक्तपणे शुक्रवारी रात्री ९ च्या सुमारास ही कारवाई केली. पोलिसांनी पकडलेल्या जुगाऱ्यांमध्ये एक होमिओपॅथी डॉक्टर असल्याचेही सूत्रांकडून कळले. वृत्त लिहिस्तोवर गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू होती. त्यामुळे आरोपींचे नाव पोलिसांकडून कळू शकले नाही.

Web Title: Eight people with a doctor arrested in gambling den raid at Nagpur