शहरं
Join us  
Trending Stories
1
सहा देशांमध्ये ९९ हजार टन लाल कांद्याच्या निर्यातीस परवानगी; निर्णय नवा की जुनाच?, याची चर्चा
2
ऐन निवडणुकीत बाजारातील पैसा गायब; अंगडियाचे दर भडकले !
3
अब की बार, देश में जनता की सरकार; महाराष्ट्रात करोडो रुपयांना आमदारांची खरेदी, पक्षांतराचा पायंडा पाडला : प्रियंका गांधी
4
काँग्रेसची सत्ता आली तर ओबींसीचे आरक्षण धर्माच्या नावावर वाटणार : पंतप्रधान मोदी
5
राज्यात पारा चाळिशी पार; मुंबई ३६, तर ठाणे ४१, उष्माघाताच्या रुग्णांची संख्या १८४ वर
6
राजस्थान रॉयल्सची प्ले ऑफमधील जागा निश्चित! संजू सॅमसन, ध्रुव जुरेल यांची मॅच विनिंग खेळी 
7
“मोदींनी १० वर्षांत एकही पत्रकार परिषद घेतली नाही, मनमोहन सिंग यांनी १११ घेतल्या”: शरद पवार
8
“पंतप्रधान मोदींना भारतरत्न द्या अन् प्रायश्चित करायला हिमालयात पाठवा”: मार्कंडेय काटजू
9
“देशाचे संविधान, कायदा अन् सुरक्षेलाच प्राधान्य देणार”; उज्ज्वल निकम यांची पहिली प्रतिक्रिया
10
इरफान पठाणने दाखवली MI ची मोठी चूक; हार्दिक पांड्या पराभवाचं भलतंच कारण सांगतोय... 
11
मत द्यायचे असेल तर कोणाला देऊ ? हा प्रश्न, कोणी कुठेही...; महेश मांजरेकरांचे राजकारणावर भाष्य
12
'मुंबईकरांचे योद्धे' संसदेत जाणार, उज्ज्वल निकमांचा विक्रमी मतांनी विजय होणार - शेलार
13
मुंबई इंडियन्स प्ले ऑफच्या शर्यतीतून बाद? दिल्ली कॅपिटल्सच्या विजयाने Point Table बदलले
14
“आईचे निधन पण मोदी तातडीने देशसेवेत, आईच्या पदराखाली राहून राजकारण करणारा नको”: CM शिंदे
15
KL Rahul ची रेकॉर्ड ब्रेकींग खेळी! राजस्थान रॉयल्ससमोर उभे केले तगडे आव्हान 
16
चार दिवसांपासून उत्तराखंडचे जंगल धुमसतेय; सैन्याच्या छावणीपर्यंत पोहोचला वणवा, हेलिकॉप्टर उडाली
17
ट्रोलिंग केल्यास, दोन महिने थेट तुरूंगात टाका! महेश मांजरेकरांचा सरकारला सल्ला
18
शरद पवारांचे साताऱ्याचे उमेदवार अडचणीत; शशिकांत शिंदेंवर आणखी एका घोटाळ्यात एफआयआर
19
शशिकांत शिंदेंना अटक झाली तर महाराष्ट्रात संघर्ष करू; शरद पवार यांचा इशारा
20
माझा 'भाव' विचारला, महिलांचा अपमान केला, मी श्वास घेते हेही काँग्रेसला त्रासदायक; कंगना भावूक

उपराजधानीतील सफाई कर्मचाऱ्यांची कार्यक्षमता ४५ टक्केच?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 23, 2017 10:54 AM

उपराजधानीची स्मार्ट सिटीकडे वाटचाल सुरू आहे. परंतु महापालिकेतील सफाई कर्मचारी कार्यक्षमतेच्या ४५ टक्केच काम करतात. त्यांची कार्यक्षमता ५५ टक्के कमी असल्याचा धक्कादायक प्रकार एका सर्वेक्षणात निदर्शनास आला आहे.

ठळक मुद्देसर्वेक्षणात धक्कादायक निष्कर्षजीपीएस घड्याळांमुळे प्रकार उघडकीस

गणेश हूड।आॅनलाईन लोकमतनागपूर : उपराजधानीची स्मार्ट सिटीकडे वाटचाल सुरू आहे. यात शहरातील स्वच्छता हा घटक महत्त्वाचा ठरणार आहे. अर्थातच यामुळे महापालिकेच्या सफाई कर्मचाऱ्यांची महत्त्वाची भूमिका राहणार आहे. परंतु महापालिकेतील सफाई कर्मचारी कार्यक्षमतेच्या ४५ टक्केच काम करतात. त्यांची कार्यक्षमता ५५ टक्के कमी असल्याचा धक्कादायक प्रकार एका सर्वेक्षणात निदर्शनास आला आहे.सफाई कर्मचारी काम करीत नसल्याच्या नगरसेवकांच्या तक्रारी असल्याने आसीनगर झोनमध्ये प्रायोगिक तत्त्वावर जीपीएस घड्याळांच्या माध्यमातून सफाई कर्मचाऱ्यांचा कामाचा सर्वे करण्यात आला. यात ९ सफाई कर्मचाऱ्यांचा १२ दिवसाच्या कामकाजाचा डाटा कलेक्ट करण्यात आला. त्यानुसार त्यांनी सरासरी ४५ टक्के काम केल्याचे निदर्शनास आले आहे. म्हणजेच अपेक्षित कार्यक्षमतेनुसार काम केलेले नाही. प्र्रत्येक कर्मचाऱ्याने दररोज ८ तास काम करणे अपेक्षित आहे. त्यानुसार १२ दिवसात ९६ तास काम करणे अपेक्षित होते.मात्र कामाच्या तासांची सरासरी ४५ टक्केच आहे. एका सफाई कर्मचाऱ्याने फक्त २.६३ तास काम केले आहे. एकाने सर्वाधिक ७२.३५ तास काम केले आहे. इतर ७ कर्मचाºयांनी ३८.९९, २८.५३, ५५.९३, ६८.५७, ३९.३२, २६.३७ व ५८.५६ तास काम केल्याचे निदर्शनास आले आहे.महापालिकेच्या आरोग्य विभागाच्या आस्थापनेवर ६४९० सफाई कर्मचारी आहेत. यातील ४९० कर्मचारी महापालिकेच्या इतर विभागात कार्यरत आहेत. म्हणजे ६००० सफाई कर्मचारी विभागात कार्यरत आहेत. ९ कर्मचाऱ्यांच्या १२ दिवसाच्या कामकाजाचा विचार करता प्रत्यक्षात २७०० कर्मचाऱ्यांचेच काम करण्यात आले. म्हणजेच ३३०० कर्मचाºयांनी काम केले नाही. याचाअर्थ सरसकट सर्वच कर्मचारी पूर्ण क्षमतेने काम करीत नाहीत असा होत नाही. काही ८ तास काम करणारेही सफाई कर्मचारी आहेत. सर्व कर्मचाऱ्यांनी दररोज ८ तास काम करणे अपेक्षित आहे.आसीनगरचा प्रयोग शहरात राबवावाप्रभागातील कचरा उचलला जात नाही, रस्त्यांची साफसफाई होत नाही, सफाई कर्मचारी कमी आहेत, अशी नगरसेवकांची तक्रार असते. वस्त्यातील अंतर्गत रस्त्यांची साफसफाई केली जात नाही, अशी नागरिकांची तक्रार असते. त्यामुळे आसीनगरच्या धर्तीवर महापालिका सेवेतील सर्वच सफाई कर्मचाऱ्यांना जीपीएस घड्याळी दिल्यातर कर्मचाऱ्यांना दिलेले साफसफाईची जबाबदारी कार्यक्षमतेने करतील. नागरिक ांच्या तक्रारी येणार नाहीत. त्यामुळे हा प्रयोग शहरात राबविण्यात यावा.अशी नागरिकांची मागणी आहे.

 

टॅग्स :Governmentसरकार