एकाच छताखाली मुलांना शिक्षणाचे समाधान
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 12, 2019 22:47 IST2019-04-12T22:46:10+5:302019-04-12T22:47:16+5:30
महागड्या शिक्षण प्रणालीच्या काळात मुलांना योग्य आणि किफायत शिक्षणाचे संतोषजनक समाधान एकाच छताखाली उपलब्ध करून देण्याच्या उद्देशाने ‘लोकमत’ने लोकमत मिशन अॅडमिशन-कम-समर कॅम्प प्रदर्शनाचे तीन दिवसीय आयोजन राणी झाशी चौक, सीताबर्डी येथील रामगोपाल माहेश्वरी भवन हॉलमध्ये सुरू असून पहिल्याच दिवशी मोठ्या संख्येने पालकांनी मुलांसह भेट दिली.

एकाच छताखाली मुलांना शिक्षणाचे समाधान
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : महागड्या शिक्षण प्रणालीच्या काळात मुलांना योग्य आणि किफायत शिक्षणाचे संतोषजनक समाधान एकाच छताखाली उपलब्ध करून देण्याच्या उद्देशाने ‘लोकमत’ने लोकमत मिशन अॅडमिशन-कम-समर कॅम्प प्रदर्शनाचे तीन दिवसीय आयोजन राणी झाशी चौक, सीताबर्डी येथील रामगोपाल माहेश्वरी भवन हॉलमध्ये सुरू असून पहिल्याच दिवशी मोठ्या संख्येने पालकांनी मुलांसह भेट दिली.
प्रदर्शनाचे आयोजन शुक्रवारी सेंट पॉल पब्लिक स्कूलचे संचालक राजाभाऊ टाकसाळे, हिलफोर्ट पब्लिक स्कूलच्या संचालिका डॉ. परिणीता फुके, सेंट्रल प्रोव्हेंन्शियल स्कूलचे संचालक निशांत नारनवरे, ई-पाठशाला सीबीएसई स्कूलचे संचालक सतीश कुंदनवार, अकॅडमिक संचालक केतन जोशी, ऐश्वर्या हॉबी क्लासेसच्या संचालिका जया गुप्ता, गायकवाड पाटील इंटरनॅशनल स्कूलचे पदाधिकारी नीलेश पाटील, अॅटलस सायकल कंपनीचे एरिया सेल्स मॅनेजर अमोल घारकर, चीप सायकल स्टोरचे संचालक हितेश कोठारी यांच्या हस्ते दीपप्रज्वलन आणि फीत कापून करण्यात आले.
या प्रसंगी छोट्या मुलांची नृत्य स्पर्धा घेण्यात आली. यामध्ये मुलांनी स्फूर्तीने भाग घेतला आणि शानदार नृत्य सादर करून आकर्षक पुरस्कार मिळविले. प्रदर्शन १४ एप्रिलपर्यंत दररोज सकाळी ११ते रात्री ९ पर्यंत सुरू राहणार असून प्रवेश नि:शुल्क आहे. प्रदर्शनात शहरातील नामांकित विविध शैक्षणिक संस्थांच्या एकून २० स्टॉलवर कोर्स, फी स्ट्रक्चर आणि सुविधांची माहिती देण्यात येत आहे. सेंट पॉल स्कूल आणि सेंट्रल प्रोव्हेन्शियल स्कूल प्रदर्शनाचे मुख्य प्रायोजक आहेत.