ईडीची नागपुरात तीन ठिकाणी धाड; भटेवार आणि आयझेक यांची चौकशी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 25, 2021 15:05 IST2021-05-25T15:04:23+5:302021-05-25T15:05:01+5:30
Nagpur News सक्तवसुली संचालनालयाने (ईडी) मंगळवारी सकाळी नागपुरातील तीन ठिकाणी मनी लॉन्ड्रिंग प्रकरणी धाडी टाकल्या आहेत. शिवाजीनगर भागातील भटेवार व न्यू कॉलनी येथील आयझॅक यांच्या निवासस्थानी या धाडी टाकण्यात आल्या. हे दोघेही माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांचे निकटवर्ती असल्याची माहिती आहे.

ईडीची नागपुरात तीन ठिकाणी धाड; भटेवार आणि आयझेक यांची चौकशी
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर: सक्तवसुली संचालनालयाने (ईडी) मंगळवारी सकाळी नागपुरातील तीन ठिकाणी मनी लॉन्ड्रिंग प्रकरणी धाडी टाकल्या आहेत. शिवाजीनगर भागातील भटेवार व न्यू कॉलनी येथील आयझॅक यांच्या निवासस्थानी या धाडी टाकण्यात आल्या. हे दोघेही माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांचे निकटवर्ती असल्याची माहिती आहे.
ईडीच्या टीमने शिवाजीनगर येथील भटेवार व सदर येथील न्यू कॉलनीमधील एका बंगल्यावर धाड टाकली. आयझेक कुटुंबीयांचा हा बंगला असून समित आयझेक हेसुद्धा अनिल देशमुख यांचे निकटवर्ती समजले जातात. प्राप्त माहितीनुसार, मंगळवारी सकाळी ईडीचे तीन अधिकारी न्यू कॉलनी येथील आयझॅक कुटुंबीयांच्या बंगल्यात दाखल झाले. काही महत्त्वाची कागदपत्रे ताब्यात घेऊन अधिकाऱ्यांनी चौकशी सुरू केली आहे. याशिवाय नागपुरातील जाफरनगर भागातील एका ठिकाणी ईडीच्या अधिकाऱ्यांकडून चौकशी सुरू असल्याची माहिती सूत्रांनी दिली.