शहरं
Join us  
Trending Stories
1
'जेव्हा मी फोटो पाहिला, मला पहिला प्रश्न पडला की, भाजप...', 'त्या' फोटोवर राज ठाकरे पहिल्यांदाच बोलले
2
सोलापुरात भयंकर घटना! पोटच्या ७ वर्षाच्या मुलीला संपवलं अन् घराशेजारीच पुरलं; पोलिसांनी मृतदेह काढला बाहेर
3
बाप-लेक ज्या गाडीतून झाले फरार, ती थार पोलिसांनी केली जप्त; आणखी दोन गाड्या कोणत्या? 
4
Matthew Forde: गोलंदाजाची आक्रमक फलंदाजी, अवघ्या १६ चेंडूत अर्धशतक झळकावलं, डिव्हिलियर्सच्या विक्रमाशी बरोबरी
5
'निश्चितच, ठाकरे-पवार ब्रॅण्ड संपवण्याचा प्रयत्न चाललाय', राज ठाकरेंचं मोठं विधान
6
वैष्णवी हगवणे मृत्यू प्रकरण नव्या वळणावर; पोलीस महानिरीक्षक जालिंदर सुपेकर यांचीही चौकशी होणार?
7
भारताला दहशतवादाविरोधात स्वरक्षणाचा पूर्ण अधिकार; जर्मनीने केले 'ऑपरेशन सिंदूर'चे समर्थन
8
Abhishek Sharma: अभिषेक शर्मानं षटकार मारून मैदानातील गाडीची फोडली काच, पाहा व्हिडीओ
9
रूपाली चाकणकर, रोहिणी खडसेंकडून कस्पटे कुटुबीयांची भेट अन् दोघीत शाब्दिक चकमक
10
Vaishnavi Hagawane Case : कस्पटे कुटुंबियांच्या भेटीनंतर अजित पवार म्हणाले, 'त्यांनी अजून दोन नावे सांगितली'
11
पोलिस महानिरीक्षक सुपेकर यांच्यामुळेच हगवणे कुटुंबीयांची हिंमत वाढली; अंजली दमानिया यांचा दावा
12
शिंदेंच्या शिवसेनेत उफाळला वाद! बाजोरिया हटावचा नारा, शिवसैनिकांनी बॅनर जाळले
13
'भारताच्या ऑपरेशन सिंदूरमुळे खूप नुकसान झाले', पाकिस्तानी नेत्या मरियम नवाजची कबुली
14
स्पाय कॅमेऱ्यातून बायकोचे प्रायव्हेट व्हिडिओ..! निलेश चव्हाणच्या काळ्या कारनाम्यांची A टू Z स्टोरी
15
शालार्थ आयडी घोटाळा : छत्रपती संभाजीनगर बोर्डाच्या सचिव वैशाली जामदार यांना अटक
16
नागपुरात वासनांधाने ओलांडली विकृतीची सीमा, घोड्यासोबत अनैसर्गिक कृत्य
17
'मला पाडण्यासाठी भाजपने प्रयत्न केले', धर्मरावबाबा आत्राम यांचा राष्ट्रवादीच्या मेळाव्यातच आरोप
18
“ते हत्यार शोधून…” वैष्णवी हगवणे प्रकरणात वकिलांकडून मोठी अपडेट
19
'...तर आयफोनवर 25 टक्के टॅरिफ लागेल', भारतातील आयफोन निर्मितीत ट्रम्प यांचा खोडा, टिम कुक यांना इशारा
20
नागपूर शहरातील सराफा आणि हवाला व्यावसायिकांवर ईडीचे छापे, लखोटियांना घेतलं ताब्यात

नागपूर शहरातील सराफा आणि हवाला व्यावसायिकांवर ईडीचे छापे, लखोटियांना घेतलं ताब्यात

By नरेश डोंगरे | Updated: May 23, 2025 19:45 IST

ED Raids in Nagpur: ईडीच्या अधिकाऱ्यांनी कावळे यांची प्रदीर्घ विचारपूस करून नंतर त्यांच्यासह ईतवारीतील सराफा ओळीत असलेले सागर ज्वेलर्स गाठले.

नरेश डोंगरे, नागपूर मध्य भारतातील सराफा आणि हवाला व्यावसायिकांमधील बहुचर्चित नावे असलेल्या पुरूषोत्तम कावळे आणि लखोटिया बंधूसह चार ठिकाणी प्रवर्तन संचालनालयाने (ईडी) छापे घातले. या कारवाईत नेमके काय जप्त करण्यात आले ते स्पष्ट होऊ शकले नाही. मात्र, ईडीच्या कारवाईमुळे शहरातील व्यापाऱ्यांमध्ये प्रचंड खळबळ निर्माण झाली आहे.

'लोकमत'चं WhatsApp चॅनल फॉलो करा!

संबंधित वर्तुळाच्या सूत्रांनुसार, रायपूर आणि नागपूरच्या ईडी अधिकाऱ्यांनी शुक्रवारी सकाळी ५ ते ६च्या सुमारास सराफा व्यावसायिक पुरूषोत्तम कावळे यांच्या एम्प्रेस सिटीतील सदनिकेत धडक दिली. सोबतीला मोठ्या प्रमाणात पोलीस बंदोबस्तही होता. 

ईडीच्या अधिकाऱ्यांनी कावळे यांची प्रदीर्घ विचारपूस करून नंतर त्यांच्यासह ईतवारीतील सराफा ओळीत असलेले सागर ज्वेलर्स गाठले. तेथील कागदपत्रे तपासण्यात आली. यावेळी सागर ज्वेलर्ससमोर मोठ्या प्रमाणात पोलीस बंदोबस्त दिसत होता.

दुसरीकडे ईडीच्या एका पथकाने हवाला व्यावसायिक शैलेष लखोटिया यांच्या सेंट्रल एव्हेन्यू, छापरूनगरातील निवासस्थानी आणि चिखलीतील गोदामातही धडक दिली. बरीच चाैकशी केल्यानंतर लखोटियांना ईडीच्या पथकाने सोबत नेले. दरम्यान, नेमकी काय कारवाई झाली, ते वृत्त लिहिस्तोवर स्पष्ट झाले नव्हते.

कावळेंवर यापूर्वीही झाली कारवाई

विशेष म्हणजे, कावळे मध्य भारतातील एक प्रमूख सराफा व्यावसायिक मानले जातात. तेअनेकांना सोन्याचांदीचे दागिने सप्लाय करतात. 

कोट्यवधींच्या सोन्याच्या तस्करी प्रकरणात कावळे यांच्यावर गेल्या वर्षी डायरेक्टर ऑफ रेव्हेन्यू इंटेलिजेन्स (डीआरआय)ने मोठी कारवाई केली होती. त्यावेळी ट्रेनने सोन्याची तस्करी करणाऱ्या कावळेसह काही जणांकडून १८ कोटींचे सोने पकडण्यात आले होते. या कारवाईनंतर कावळे यांना कारागृहात डांबण्यात आले होते. अनेक महिने ते कारतात.

हवालामुळेच घडले होते लखोटिया बंधू हत्याकांड

सूत्रांच्या माहितीनुसार, शैलेष लखोटिया गेल्या अनेक वर्षांपासून हवाला च्या गोरखधंद्यात सहभागी आहेत. ऑनलाईन सट्ट्यातही त्यांचे नाव घेतले जाते. 

देशातील विविध प्रांतात त्यांचे नेटवर्क असल्याची चर्चा असून २००७-०८ मध्ये नागपुरात युपीच्या बच्चाबाबू गँगने हवालाची रक्कम लुटण्यासाठी त्यांच्या लकडगंजमधील कार्यालयात हल्ला केला होता. 

यावेळी त्यांनी लखोटिया बंधूंची गोळ्या झाडून हत्या केली होती. त्यावेळीपासूनच लखोटिया आणि हवाला प्रकाशझोतात आले होते.

टॅग्स :Enforcement Directorateअंमलबजावणी संचालनालयnagpurनागपूरGoldसोनंCorruptionभ्रष्टाचारfraudधोकेबाजी