शहरं
Join us  
Trending Stories
1
देवेंद्र फडणवीस पवारांना काटशह देणार?; अभिजीत पाटलांच्या भाजप प्रवेशाची चर्चा
2
धमक्या कशाला देता? ४ जूनला जनताच तुम्हाला बघून घेईल - संजय राऊत
3
Sunita Kejriwal : "प्रत्येकजण हुकूमशाही हटवण्यासाठी आणि लोकशाही..."; सुनीता केजरीवाल यांचा रोड शो
4
दादा-भाईंचं मनोमीलन, बदलणार का सिंधुदुर्गातलं समीकरण?, असं आहे गणित... 
5
याला म्हणतात नशीब! बॉयफ्रेंडच्या 'त्या' एका सल्ल्याने 'ती' झाली लखपती; मिळाले 41 लाख
6
काँग्रेसला मोठा धक्का; अरविंदर सिंग लवली यांचा राजीनामा
7
"रावणानं सीतेचं हरण केलं आणि नरेंद्र मोदी यांनी…” काँग्रेसच्या महिला नेत्याची बोचरी टीका
8
शेव्हिंग कंपनीने टॉपर प्राचीच्या समर्थनार्थ दिली पानभर जाहिरात; शेवटचा सल्ला वाचून नेटकऱ्यांचा संताप अनावर
9
वर्षा गायकवाडांविरोधात कसं लढणार? उज्ज्वल निकम म्हणाले, ‘कोर्टात समोरच्याला…’
10
Sahil Khan : अभिनेता साहिल खानच्या अडचणीत वाढ; महादेव बेटिंग App प्रकरणी मुंबई पोलिसांची मोठी कारवाई
11
J P Nadda : "ही ममता बॅनर्जींची सर्वात मोठी चूक, तुम्ही बंगालचं काय केलं?"; जेपी नड्डा यांचा हल्लाबोल
12
नरेंद्र मोदी आज कर्नाटकात करणार वादळी प्रचार, दिवसभरात 4 सभांचे आयोजन
13
‘अमित शाह, योगी आदित्यनाथ यांनी कोकणात यायच्या भानगडीत पडू नये, इथे आल्यास…’, भास्कर जाधव यांचा इशारा
14
"ते म्हणतात की, मी अपवित्र आहे, कारण...", कंगनाचा विक्रमादित्य यांच्यावर जोरदार हल्लाबोल
15
सांगलीच्या ‘करेक्ट’ कार्यक्रमामुळे राष्ट्रवादी काॅंग्रेसची घसरगुंडी !
16
प्रचाराच्या रणधुमाळीदरम्यान मुंबईतील भांडुपमधून तीन कोटींची रोकड जप्त, तपास सुरू
17
महायुतीची डोकेदुखी वाढली, पाच जागांचा तिढा कायम; आपसांतच रस्सीखेच
18
आजचे राशीभविष्य - २८ एप्रिल २०२४, सार्वजनिक जीवनात मान-प्रतिष्ठा वाढेल
19
आमिरला पहिल्या पत्नीने लगावली होती कानशिलात, नेमकं काय घडलं होतं? अभिनेत्याने केला खुलासा
20
ईश्वराप्पा यांच्या बंडाने शिवमोग्गात लढत रंगतदार; पक्षातून सहा वर्षासाठी हकालपट्टी

देशातील आर्थिक मंदी जाणीवपूर्वक  : प्रकाश आंबेडकर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 20, 2020 8:02 PM

आज जी देशातील आर्थिक परिस्थिती आहे ती सध्याच्या सरकारने जाणीवपूर्वक निर्माण केलेली असून आरएसएसचा छुपा अजेंडा राबविण्यासाठीच मंदी आणली गेली आहे, अशी टीका वंचित बहुजन आघाडीचे प्रमुख अ‍ॅड. प्रकाश ऊर्फ बाळासाहेब आंबेडकर यांनी येथे केली.

ठळक मुद्देआरएसएसचा अजेंडा कठोरपणे राबवण्याचा प्रयत्न

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : भारतात ४० टक्के लोक हे दारिद्र्य रेषेखाली राहतात. त्यामुळे या देशात आर्थिक मंदी कधीच येऊ शकत नाही. आज जी देशातील आर्थिक परिस्थिती आहे ती सध्याच्या सरकारने जाणीवपूर्वक निर्माण केलेली असून आरएसएसचा छुपा अजेंडा राबविण्यासाठीच मंदी आणली गेली आहे, अशी टीका वंचित बहुजन आघाडीचे प्रमुख अ‍ॅड. प्रकाश ऊर्फ बाळासाहेब आंबेडकर यांनी येथे केली.प्रेस क्लब येथे पत्रकारांशी अनौपचारिक चर्चा करताना ते बोलत होते. अ‍ॅड. प्रकाश आंबेडकर म्हणाले, देशातील पहिल्या पंतप्रधानांपासून डॉ. मनमोहन सिंग यांच्या सरकारपर्यंत एकाही पंतप्रधानांना देशात आर्थिक परिस्थिती चांगली लाभली नाही. २०१४ साली पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनाच पहिल्यांदा देशात चांगली आर्थिक परिस्थिती लाभली. परंतु त्यांनी याचा फायदा घेतला नाही. उलट नोटाबंदीसारखा निर्णय घेऊन या देशातील छोट्या उद्योगांचे कंबरडे मोडण्याचे काम केले. यातच जीएसटीसारखा निर्णय घेतला. हा सर्व प्रकार आरएसएसचा छुपा अजेंडा या देशात राबवण्यासाठी केलेला होता. हा देश कसा चालवावा याचे एक ‘फ्रे मवर्क’ ज्याला आरएसएसचे संविधानही म्हणता येऊ शकेल, असे तयार आहे. २००३ साली अटलबिहारी वाजपेयी यांचे सरकार असताना मी खासदार होतो. तेव्हा आरएसएसची राज्यघटना मी लोकसभेच्या पटलावर ठेवली होती. त्यांचे संपूर्ण फ्रेमवर्क कसे तयार आहे, हे मी सांगितले होते. ते आजही लोकसभेत आहे.सीएए-एनपीआर,एनआरसी हा त्यातलाच प्रकार आहे. अगोदर सरकार एनपीआर आणणार आहे. त्यानंतर एनआरसी लावण्यात येईल. सीएएच्या माध्यमातून केंद्र सरकार असे सांगत आहे की, पाकिस्तान, बांगलादेश आणि अफगाणिस्तान येथून येणारे हिंदू, बौद्ध, पारशी, जैन, सीख आणि ख्रिश्चन यांना नागरिकत्व दिले जाईल. परंतु हे केवळ एक बूम आहे. अगोदर नागरिकत्व घालवायचे आहे. नागरिकत्व गेले की संपत्तीचा अधिकार जातो. हा आरएसएसचाच अजेंडा असून, याच्या विरोधात वंचित बहुजन आघाडीने येत्या २४ तारखेला महाराष्ट्र बंदची हाक दिली असून यात सर्वांनी सहभागी व्हावे, असे आवाहनही त्यांनी केले.सावरकरांचा सन्मान करण्यापूर्वी त्यावर चर्चा व्हावीसावरकरांना भारतरत्न देण्यावरून सध्या सुरू असलेल्या वादाबाबत विचारले असता अ‍ॅड. प्रकाश आंबेडकर म्हणाले, स्वातंत्र्यवीर सावरकर हे क्रांतिकारी होते. परंतु यासोबतच इंग्रजांविरुद्ध लढणाऱ्या पत्रिसरकारच्या विरोधात त्यांची भूमिका राहिली आहे. एकूणच सावरकर यांच्या दोन वेगवेगळ्या भूमिका आहेत. तेव्हा त्यांचा सन्मान करीत असताना त्यावर चर्चा झाली पाहिजे.

टॅग्स :Prakash Ambedkarप्रकाश आंबेडकरEconomyअर्थव्यवस्था