शहरं
Join us  
Trending Stories
1
एकल पदाच्या पदोन्नती, भरतीमध्ये आरक्षण नाहीच! आजवरचे सगळे आदेश रद्द करून काढला नवा शासन निर्णय
2
"तोपर्यंत इराणला पत्ताही नव्हता"; अमेरिकेतील 'त्या' खबऱ्यामुळे अडकले असते दोन सैनिक; ट्रम्प यांचा खुलासा
3
Stock Markets Today: Sensex मध्ये ७५० अंकांची मोठी घसरण, निफ्टी २०० अंकांनी घसरला; ऑटो-रियल्टी इंडेक्स १-१ टक्क्यांनी घसरले
4
‘भळाभळा रक्त वाहत होते, पण तो…’ ट्रम्प यांनी सांगितली इराणमध्ये अडकलेल्या ‘त्या’ सैनिकाच्या शौर्याची कहाणी  
5
LPG Price Today: आज एलपीजी सिलिंडरच्या किमतीबाबत काय आहेत अपटेड? पटापट चेक करा
6
आजचे राशीभविष्य, ०७ एप्रिल २०२६: गूढ रहस्यमय विद्येचे आकर्षण राहील; प्रकृती उत्तम राहील
7
'आमच्या बाई आम्हाला परत द्या', विद्यार्थ्यांचा टाहो; जिल्हाधिकाऱ्यांच्या दालनासमोर चिमुरड्यांचा ठिय्या
8
Air India च्या सीईओंचा राजीनामा, अनेक आव्हानांचा सामना करतेय कंपनी; पाहा डिटेल्स
9
इराणला अमेरिकेचा अखेरचा अल्टिमेटम; "रात्री ८ पर्यंत निर्णय घ्या, अन्यथा थेट पाषाण युगात पाठवू"
10
राज्यातील खासदार, आमदारांविरोधात हत्या, बलात्काराचे खटले; आकडेवारीत मुंबई प्रथम
11
भोंदू अशोक खरातवर EDकडून गुन्हा दाखल; आर्थिक गैरव्यवहारप्रकरणी लवकरच होणार छापेमारी
12
समान नागरी संहिता, वन नेशन-वन इलेक्शन हे भाजपचे अजेंडे अद्याप अपूर्ण: पंतप्रधान मोदी
13
राष्ट्र समृद्ध आणि सुरक्षित असेल तरच वैयक्तिक समृद्धी शक्य- सरसंघचालक मोहन भागवत
14
धोक्याची घंटा! एआय डेटा सेंटर्समुळे वाढतोय पृथ्वीचा पारा; कोट्यवधींवर ओढावणार संकट
15
अनिल अंबानी समूहाच्या कर्ज प्रकरणात ७३ हजार कोटी रुपयांचा महाघोटाळा; CBIचा दावा
16
दिल्ली विधानसभेत थरार! कडक सुरक्षा व्यवस्थेला आव्हान देत बॅरिकेड तोडून SUV आत
17
आसाममध्ये हिमंता बिस्वा सरमा सत्ता टिकवणार की, गौरव गोगोई समीकरणे बदलणार?
18
इराणमधील अनेक शहरांवर बॉम्ब हल्ले; शैक्षणिक संस्थाही लक्ष्य, २५ हून अधिक नागरिक ठार
19
आयपीओंचा महापूर, ३८ ‘ड्राफ्ट पेपर’ दाखल! १२४ कंपन्या मुहूर्ताच्या प्रतीक्षेत, गुंतवणूकदारांची चांदी
20
तामिळनाडूमध्ये ७५ टक्के मंत्रिमंडळ भ्रष्टाचाराच्या खाईत अडकलेले : देवेंद्र फडणवीस
Daily Top 2Weekly Top 5

प्लास्टिक प्रदूषणावर 'इकोब्रिक्स'चा उपाय

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 21, 2020 12:10 IST

Eco Bricks Nagpur News इकोब्रिक्स ही सहज करता येण्याजोगा उपाय आहे. त्याचा उपयोग झाल्यास एकदा उपयोगात येणारे प्लास्टिक किंवा रिसायकल होऊ न शकणाऱ्या प्लास्टिकमुळे जमीन किंवा सागराचे प्रदूषण टाळता येईल, हा यामागचा उद्देश आहे.

ठळक मुद्दे'पर्यावरण संरक्षण गतिविधी'चा उपक्रम ट्रीगार्ड, उद्यानात होईल उपयोग

अंकिता देशकरलोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : प्लास्टिक प्रदूषण कमी करण्यासाठी अनेक संस्था वेगवेगळ्या पद्धतीने प्रयत्न करीत आहेत. अशाच प्रकारचा उपाय राष्ट्रीयस्तरावर काम करणाऱ्या 'पर्यारवण संरक्षण गतिविधी'द्वारे 'इकोब्रिक्स'च्या माध्यमातून नागपुरात सुरू केला आहे. घरातील प्लास्टिक कचरा प्लास्टिक बॉटलमध्ये भरून गार्डनच्या लहानसहान कामात त्यांचा विटांप्रमाणे उपयोग करण्याचा हा उपाय आहे.या उपक्रमासाठी काम करणाऱ्या आयाम वेस्ट मॅनेजमेंट संस्थेच्या नॅशनल हेड जुई पांढरीपांडे यांनी इकोब्रिक्सच्या निर्मितीबाबत माहिती दिली. इकोब्रिक्स बनविणे सहज शक्य आहे. प्लास्टिकच्या रिकाम्या बॉटलमध्ये घरातील सर्व प्लास्टिकचा कचरा दाबून भरायचा. पूर्णपणे कोंबून घेतल्यावर त्याचे झाकण लावले की इकोब्रिक्स तयार. खरंतर या प्रक्रियेमुळे एक गोष्ट साध्य होते, ती म्हणजे प्लास्टिकचा कचरा घरातील कचऱ्यासोबत सरसकट डम्पिंग यार्डमध्ये पाठविण्याऐवजी प्लास्टिकचे घरातच विलगीकरण होईल. त्यामुळे आरोग्य कर्मचाऱ्यांचा मनस्ताप वाचेल. तयार झालेल्या इकोब्रिक्स उद्यानातील ओटे बनविणे, ट्रीगार्ड बनविण्यासोबत टेबल आणि स्टूल बनविण्याच्या कामातही येऊ शकतात. विशेष म्हणजे हरियाणात शौचालयाची भिंत बनविण्यासाठी आणि डेहराडूनमध्ये उद्यानातही त्यांचा यशस्वीपणे वापर करण्याचे आल्याचे जुई यांनी सांगितले.नागपूरमध्ये व्हॉलेन्टियर्सकडून पहिल्या प्रयत्नात अशाप्रकारच्या ५८ विटा तयार करण्यात आल्या. त्यासाठी २५ किलो पॉलिथीन व प्लास्टिकचा वापर करण्यात आला. यामुळे २५ किलो प्लास्टिक कचरा पर्यावरणात जाण्यापासून वाचला आणि ४०० चौरस मीटर जमीन व जलस्रोताचे संरक्षण झाले. सध्या दीक्षाभूमी चौकातील ब्लाईंड रिलिफ असोसिएशन येथे इकोब्रिक्स कलेक्शन सेंटर सुरू करण्यात आले आहे. तुम्ही इकोब्रिक्सप्रमाणे उपयोग जरी केला नाही तरी या प्रक्रियेमुळे घरातच प्लास्टिकचे विलगीकरण होईल आणि डम्पिंग यार्डमध्ये प्लास्टिक वेगळे करण्याची डोकेदुखी राहणार नाही, अशी भावना जुई यांनी व्यक्त केली.इकोब्रिक्स ही सहज करता येण्याजोगा उपाय आहे. त्याचा उपयोग झाल्यास एकदा उपयोगात येणारे प्लास्टिक किंवा रिसायकल होऊ न शकणाऱ्या प्लास्टिकमुळे जमीन किंवा सागराचे प्रदूषण टाळता येईल, हा यामागचा उद्देश आहे.- जुई पांढरीपांडे

टॅग्स :environmentपर्यावरण