शहरं
Join us  
Trending Stories
1
'हेल-होल' वादानंतर ट्रम्प यांचं 'हृदयपरिवर्तन'! म्हणाले, "भारत 'महान देश' आणि मोदी..."
2
पश्चिम रेल्वेच्या ट्रेन मॅनेजरला होमगार्ड शिपायाची लाथ; गुन्हा नोंदवण्यास टाळाटाळ केल्याचा आरोप
3
MI vs CSK: क्विंटन डी कॉकची विकेट आणि आईच्या आठवणीत भावूक झाला मुकेश चौधरी (VIDEO)
4
Baramati bypoll election: बारामती विधानसभा पोटनिवडणुकीत मतदानाचा टक्का घसरला; सुनेत्रा पवार यांच्या ‘रेकॉर्डब्रेक’ मताधिक्याचा ४ 'मे'ला होणार फैसला
5
Sanju Samson Record: वानखेडेवर संजूची विक्रमी सेंच्युरी! हिटमॅन रोहित शर्माची बरोबरी; कोहली-अभिषेकचा रेकॉर्डही धोक्यात
6
जळगाव महापालिकेत पोलिसांचे तळ, कागदपत्रांची झाडाझडती; ४१ कोटींच्या अपहाराचा आरोप
7
MI vs CSK : मुकेश चौधरीला सलाम! आईच्या निधनानंतर काळजावर दगड ठेवून उतरला मैदानात
8
पुतळ्यासारखे थिजले लेकाचे हात; बापासाठी पदक जिंकले, सुवर्ण सोहळा पाहायला येतानाच वडिलांचा अपघाती मृत्यू
9
पश्चिम बंगालमध्ये पहिल्या टप्प्यात भाजप किती जागा जिंकणार? विक्रमी मतदानानंतर सुवेंदू अधिकारी यांचा धक्कादायक दावा!
10
बंगाल-तमिळनाडूत मतदानाची विक्रमी टक्केवारी; बंपर मतदानाने कोणाचे नशीब उजळणार?
11
मध्य प्रदेशमधील प्रवाशाचे साहित्य हरवले; रेल्वे पोलिसांनी नागपुरात शोधून दिले
12
होर्मुझमध्ये सुरुंग पेरणाऱ्या बोटी दिसताच उडवा! ट्रम्प यांचा आदेश; पुन्हा युद्ध भडकणार?
13
बारामतीमध्ये २०२९ ला पवार विरुद्ध पवार लढाई होणार का? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं...
14
IPL 2026 : रोहित-धोनीशिवाय MI आणि CSK संघ उतरला मैदानात! IPL मध्ये पहिल्यांदाच असं घडलं
15
Travel : निसर्गाची मुक्त हस्ताने उधळण! भारताच्या 'या' ४ सुंदर ठिकाणांपुढे स्वित्झर्लंडही पडेल फिके
16
चेहऱ्यावर मास्क, खांद्यावर बंदूक...; भारतात येणाऱ्या जहाजावर इराणी कमांडोंनी कसा केला कब्जा? बघा भरसमुद्रातला थरारक VIDEO
17
पुणेकर...! म्हाडाची २९५ घरे घेणार का ? प्रथम येणाऱ्यास प्रथम प्राधान्य... कुठे, कुठे आहेत...
18
डोनाल्ड ट्रम्प यांच्या ‘हेलहोल’ टिप्पणीवर भारताची सावध भूमिका; परराष्ट्र मंत्रालयाने म्हटले...
19
हर्षवर्धन सपकाळ मातोश्रीवर गेले, उद्धव ठाकरे यांची भेट घेतली; कोणत्या विषयावर काय चर्चा झाली?
20
काळाचा घाला! उत्तराखंडच्या चंबा-कोटी रोडवर भीषण अपघात; बस दरीत कोसळून ८ जणांचा मृत्यू
Daily Top 2Weekly Top 5

डीवायएसपींनाही गुन्हेगारांना हद्दपार करण्याचे अधिकार

By admin | Updated: July 3, 2015 03:07 IST

आयुक्तालयाप्रमाणेच ग्रामीण भागातील डीवायएसपीलाही गुन्हेगारांना हद्दपार करण्याचे अधिकार देण्याचा विचार सुरू आहे.

गृहराज्यमंत्री : मंत्रिमंडळात निर्णय घेण्याची प्रक्रिया सुरूनागपूर : आयुक्तालयाप्रमाणेच ग्रामीण भागातील डीवायएसपीलाही गुन्हेगारांना हद्दपार करण्याचे अधिकार देण्याचा विचार सुरू आहे. मंत्रिमंडळात त्याबाबतचा आवश्यक तो निर्णय घेण्याची प्रक्रिया सुरू करण्यात येईल, अशी माहिती गृहराज्यमंत्री राम शिंदे यांनी गुरुवारी येथे पत्रकारांना दिली. नागपूर परिमंडळातील गुन्हेगारी, अवैध धंदे आणि पोलिसांची कामगिरी याचा आढावा घेण्यासाठी शिंदे यांनी गुरुवारी दुपारी पोलीस जिमखान्यात नागपूर परिक्षेत्रातील अधीक्षकांची बैठक घेतली. या बैठकी नंतर त्यांनी पत्रकारांशी चर्चा केली. शहरी भागात (आयुक्तालयात) गुन्हेगारांना हद्दपार करण्याचे अधिकार डीसीपींना आहे. त्यामुळे ते तातडीने गुन्हेगारांचा अहवाल तयार करून त्यांना हद्दपार करू शकतात. ग्रामीण भागात डीवायएसपी गुन्हेगारांचा अहवाल तयार करून त्याच्या हद्दपारीसाठी महसूल अधिकाऱ्यांकडे परवानगी मागतात. मात्र, ही फाईल संबंधित अधिकाऱ्यांकडे महिनोंमहिने मंजुरीसाठी पडून असते. राज्यभरात हीच स्थिती आहे. मोठ्या प्रमाणात महसूल अधिकाऱ्यांकडे गुन्हेगारांच्या हद्दपारीची परवानगी मागणारी प्रकरणे पडून आहेत. त्यामुळे महसूल अधिकाऱ्यांच्या मंजुरीची वाट न बघता ग्रामीण भागातील डीवायएसपी, एसपींनाच गुन्हेगारांच्या हद्दपारीचे अधिकार देण्याचा विचार पुढे आला आहे, असे शिंदे यांनी स्पष्ट केले. त्यासाठी कायद्यात तरतूद करण्याचेही विचाराधीन असल्याचे शिंदे यांनी सांगितले. राज्यभरातील पोलीस ठाण्यात १ जुलैपासून विशेष पोलीस तपासणी पथक कार्यान्वित करण्यात आले आहे. गुन्हेगारांना हुडकून काढण्यासोबतच गुन्ह्यांमधील अपराध सिद्धता (कन्विक्शन रेट) वाढविण्यासाठी हा निर्णय घेण्यात आल्याचे त्यांनी सांगितले. (प्रतिनिधी)