शहरं
Join us  
Trending Stories
1
लोकल ट्रेनच्या दरवाजाजवळ उभे राहणे हा निष्काळजीपणा नव्हे; उच्च न्यायालयाचा निर्णय
2
"...तर नरकाचे दरवाजे उघडतील"; ट्रम्प यांच्या ४८ तासांच्या अल्टीमेटमवर इराणची थेट 'अणुयुद्धाची' धमकी!
3
आजचे राशीभविष्य, ०५ एप्रिल २०२६: चांगली बातमी, धनलाभ, नशिबाची साथ; हर्षोल्लासाचा दिवस
4
सुनेत्रा पवारांविरोधात शरद पवारांनी उमेदवार दिल्यास काँग्रेसचा पाठिंबा; प्रदेशाध्यक्षांचा नवा प्रस्ताव
5
'धुरंधर'नंतर हाच सिनेमा पाहणार, मृणाल ठाकुरच्या 'डकैत'वर प्रेक्षकांच्या कमेंट्स; ट्रेलर रिलीज
6
भोंदू अशोक खरातला मदत करणाऱ्या महसूल अधिकाऱ्यांना घरी जावे लागेल: चंद्रशेखर बावनकुळे
7
"बायकोसोबत रेड कार्पेटवर चालताना भीती वाटते...", ऐश्वर्याबद्दल असं का म्हणाला अभिषेक बच्चन?
8
अमली पदार्थ जप्ती प्रकरणात दोघांची अखेर निर्दोष मुक्तता; नियम पालनात सरकारी पक्ष अपयशी
9
पश्चिम रेल्वेच्या ताफ्यात १५ डब्यांच्या २ नवीन लोकल; ३३ टक्के क्षमता वाढणार
10
विशेष लेख: आपल्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात नेमके चालले आहे तरी काय..?
11
साप्ताहिक राशीभविष्य: ७ राशींना मनासारखा काळ, पैशांचा ओघ राहील; यश-प्रगती चौफेर-चौपट लाभ!
12
राज्यातील कुपोषण घटतेय, पण धोका कायम! बालविकास योजनांना गती देण्याचे आव्हान
13
केरळातील डावे सरकार अखेरची घटका मोजतेय, राज्यात एनडीए सत्तेत येईल: पंतप्रधान मोदी
14
Fastest Delivery In IPL 2026 : भारताची नवी स्पीडगन! Ashok Sharma चा १५४.२ kmph वेग, Nortje चा रेकॉर्ड मोडला
15
बँक मॅनेजर जोडप्याचा हाय-प्रोफाइल घोटाळा; ८५ वर्षीय वृद्धेची ७६ लाखांची फसवणूक
16
मंत्री गणेश नाईक म्हणतात... ठाण्यातील शिवसेनेचा खरा इतिहास सांगितला जात नाही!
17
बेपत्ता वैमानिकासाठी अमेरिकेची धावपळ! शत्रूच्या पायलटला हवाली करण्यासाठी इराणकडून बक्षीस जाहीर
18
IPL New Record : नवा रेकॉर्ड! वैभव सूर्यवंशी-यशस्वी जैस्वाल जोडीनं रचला इतिहास
19
कनिष्ठ, वरिष्ठ अधिकारीही भोंगळ कारभाराला जबाबदार; उच्च न्यायालयाची कठोर टीका
20
राज्यातील निवासी डॉक्टरांची ड्युटी आठवड्याला ४८ तास? वैद्यकीय शिक्षण विभागात संभ्रम
Daily Top 2Weekly Top 5

नागपुरात बांधकामांमुळे जिकडेतिकडे धूळ, प्रदूषण उपाययोजनेकडेच दुर्लक्ष

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 13, 2024 17:31 IST

संबंधित विभाग म्हणतात, पाहू, बघू, करू : निव्वळ चालढकल सुरू

लोकमत न्यूज नेटवर्क नागपूर : एकाच भागात वारंवार मोठमोठे बांधकाम होत असल्यास त्या भागात वायू प्रदूषणात प्रचंड वाढ होते. ही परिस्थिती सध्या धंतोली आणि रामदासपेठेतील नागरिक अनुभवत आहेत. धुळीचे लोट रस्त्यावर पसरले आहेत. परिसरात पार्क केलेल्या वाहनांवर साचलेल्या मातीच्या थरावरून लक्षात येते की, किती मोठ्या प्रमाणात वातावरणात धुळीचे कण पसरले आहेत. प्रदूषण नियंत्रणात आणण्याची जबाबदारी महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या मार्गदर्शनात स्थानिक प्रशासनाकडून होणे गरजेचे आहे. पण या यंत्रणांना प्रदूषणाची फारशी गंभीरता नसल्याचे दिसून येत आहे.

केंद्र सरकारचे पर्यावरण, वने आणि हवामान बदल मंत्रालय असून, बांधकाम तसेच पाडकामातून निर्माण होणारा कचरा तसेच घनकचरा यांच्या पर्यावरणदृष्ट्या सुयोग्य व्यवस्थापनासाठी बांधकाम आणि पाडकाम कचरा व्यवस्थापन नियम २०१६ अन्वये काही तरतुदी सांगितलेल्या आहेत. या तरतुदीनुसार बांधकामामुळे होत असलेल्या प्रदूषणावर उपाययोजना करणे व करवून घेण्यासंदर्भात महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या मार्गदर्शनात स्थानिक स्वराज्य संस्थांना उपाययोजना करायच्या आहेत. नागपूर शहरामध्ये मोठ्या इमारतींच्या बांधकामाला महापालिकेच्या नगररचना विभागाकडून मंजुरी मिळत असल्याने आणि महापालिकेत पर्यावरण विभाग असल्याने नवीन बांधकामामुळे होत असलेल्या प्रदूषणावर उपाययोजना नगररचना व पर्यावरण विभागाकडून करायच्या आहेत. 

प्रदूषणावर नियंत्रण मिळविण्यासाठी करायच्या उपाययोजना धुळीवर नियंत्रण ठेवण्यासाठी धुके विरोधी गनचा वापर, हिरवे आच्छादन, बांधकाम साईटच्या भोवताली उच्च-उंचीचे अडथळे आणि नियमितपणे पाणी शिंपडणे. पाण्याचे फवारे आणि विंडब्रेक वापरणे यासारखे अनेक उपाय आवश्यक आहेत. बांधकाम साईटवर त्यांची अंमलबजावणी सुनिश्चित करणे, साईट व्यवस्थापक किंवा कंत्राटदाराचे कर्तव्य आहे.

प्रदूषण नियंत्रण मंडळ म्हणते, महापालिकेची जबाबदारी 'लोकमत'ने रामदासपेठ, धंतोलीचा धुळीमुळे गुदमरतो श्वास या आशयाचे वृत्त प्रकाशित केले होते. हे प्रदूषण कोण नियंत्रणात आणणार यासंदर्भात प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या कार्यालयाशी संपर्क केला असता, त्यांनी सांगितले की, ही जबाबदारी महापालिकेच्या नगररचना व पर्यावरण विभागाची आहे. नगररचना विभागाकडे काय उपाययोजना करणार, अशी विचारणा केली असता, त्यांच्याकडून सांगण्यात आले की, साईटवर जाऊन काय उपाययोजना करता येईल ते पाहू

"महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाने २७ ऑक्टोबर २०२३ रोजी जारी केलेल्या पत्राद्वारे बांधकाम तसेच पाडकामामुळे होणाऱ्या वायू प्रदूषणावर नियंत्रण मिळविण्याच्या दृष्टीने अंमलबजावणी अधिकाऱ्यांसाठी 'वायू प्रदूषण उपशमनासाठीची मार्गदर्शक तत्त्वे जारी केली आहेत. बांधकाम आणि पाडकाम उपक्रमांमध्ये सहभागी असणाऱ्या सर्व संस्था, प्राधिकरणाने पर्यावरण कायद्याच्या अनुषंगाने उपाययोजना करून घेणे गरजेचे आहे. पण तसे होत नाही." -नफीस शेख, पर्यावरण रिसर्च अँड ॲनालेसिस फाउंडेशन

टॅग्स :nagpurनागपूरpollutionप्रदूषण