नागपुरात बंद दरम्यान मनपाच्या १० बसेसची तोडफोड
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 3, 2018 20:08 IST2018-01-03T20:05:15+5:302018-01-03T20:08:52+5:30
भीमा कोरेगावमधील हिंसेच्या निषेधार्थ पुकारलेला 'महाराष्ट्र बंद'चे बुधवारी नागपुरात तीव्र पडसाद उमटले. आंदोलकांनी शहराच्या विविध भागात महापालिकेच्या १० बसेसची तोडफोड केली. यामुळे ६ लाखांचे नुकसान झाले. खबरदारी म्हणून दुपारी १२ नंतर शहर बस सेवा बंद ठेवल्याने ७.११ लाखांचे नुकसान झाले.

नागपुरात बंद दरम्यान मनपाच्या १० बसेसची तोडफोड
आॅनलाईन लोकमत
नागपूर :भीमा कोरेगावमधील हिंसेच्या निषेधार्थ पुकारलेला 'महाराष्ट्र बंद'चे बुधवारी नागपुरात तीव्र पडसाद उमटले. आंदोलकांनी शहराच्या विविध भागात महापालिकेच्या १० बसेसची तोडफोड केली. यामुळे ६ लाखांचे नुकसान झाले. खबरदारी म्हणून दुपारी १२ नंतर शहर बस सेवा बंद ठेवल्याने ७.११ लाखांचे नुकसान झाले.
महापालिकेच्या आपली बस सेवेतील ३३२ बसेस बुधवारी सकाळी खापरी, पटवर्धन व हिंगणा डेपोतून निघाल्या. परंतु सकाळी ११ च्या सुमारास बंदचा प्रभाव वाढू लागला. काही भागात बसेसवर दगडफेकीच्या घटना घडल्या. प्रवाशांची सुरक्षा व बसेसचे होणारे नुकसान विचारात घेता दुपारी १२ नंतर सर्वबसेस बंद ठेवण्याचा निर्णय महापालिका प्रशासनाने घेतला. कामठी , इंदोरा चौक, जरीपटका,शताब्दी चोक आदी ठिकाणी १० बसेसच्या काचा फोडण्यात आल्या. सुरक्षेच्या दृष्टीने बसेस बंद ठेवण्याचा निर्णय घेतल्याची माहिती परिवहन व्यवस्थापक शिवाजी जगताप यांनी दिली.
दगडफेकीत एमएच३१्-सीअे ६१२९, एमएच३१्-सीअे ६१४६, एमएच३१्-सीअे ६२०२, एमएच३१्-सीअे ६२४१, एमएच३१्-सीअे६२४४, एमएच३१्-सीअे ६१८७, एमएच३१्-सीअे ६०१२ यासह अन्य तीन बसेसचा समावेश आहे. प्रत्येक बसचे सुमारे ६० हजारांचे नुकसान झाले.
सात लाखांचा महसूल बुडाला
आपली बसच्या ३३२ बसेस दररोज नागपूर शहरात ७७ हजार ८५७ किलोमीटर धावतात. परंतु बुधवारी ३८ हजार ९२९ किलोमटर धावल्या. दुपारी १२ पर्यत काही भागात बसेस सुरू होत्या. त्यानतंर आंदोलनाचे स्वरुप बघून टप्प्याटप्प्याने बसेस डपोत उभ्या करण्यात आल्या. यामुळे जवळपास ७ लाख ११ हजार ६५७ रुपयांचे नुकसान झाल्याची माहिती शिवाजी जगताप यांनी दिली.