शहरं
Join us  
Trending Stories
1
ज्याची भीती तेच घडलं, युद्ध आणखी पेटलं; इराणच्या सर्वात मोठ्या ब्रिजवर हल्ला, ८ मृत्यू ९५ जखमी
2
India Oil Supply News: भारतासाठी 'संजीवनी' ठरला हा छोटा देश; युद्ध असो की संकट, अविरत करतोय तेल अन् गॅस पुरवठा
3
"आणखी थोडा वेळ मिळाला, तर अमेरिका सहज होर्मुझ सामुद्रधुनी...", डोनाल्ड ट्रम्प यांचे इराणची चिंता वाढवणार विधान
4
US Israel Iran War : डोनाल्ड ट्रम्प यांना विरोध केल्याचे फळ! इराणने उघडला फ्रान्ससाठी होर्मुझचा रस्ता; मॅक्रॉन यांना खास 'बक्षीस'
5
IPL 2026: चेन्नईच्या संघात एक मोठा बदल; कोण इन, कोण आउट? पाहा दोन्ही संघाची प्लेईंन इलेव्हन
6
MS Dhoni: सीएसकेच्या चाहत्यांसाठी गूड न्यूज? ट्रेनिंग सेशनसाठी धोनी मैदानात, पण खेळण्याबाबत सस्पेन्स कायम
7
फक्त एका दिवसासाठी अमेरिकेतून युवक भारतात आला; ताजमहाल पाहून निघून गेला, Video व्हायरल
8
Latest Marathi News LIVE Updates: अमेरिकेला पुन्हा झटका! इराणने दुसरे एफ-३५ लढाऊ विमान पाडले
9
जीवाशी खेळ! एक्स्पायरी डेट बदलून विकत होते कोल्ड ड्रिंक्स, बिस्किट; मोठ्या रॅकेटचा पर्दाफाश
10
Bhagwant Mann : "समोसा-पिझ्झाचा मुद्दा..."; राघव चड्ढांवर पंजाबचे मुख्यमंत्री भगवंत मान कडाडले, आतिशींचा गंभीर आरोप
11
'सिंधू' करार स्थगितीनंतर पाकिस्तानला आणखी एक धक्का! पुन्हा सुरू होतोय 'मोहरा प्रकल्प', जाणून घ्या
12
IPL 2026: चेन्नईला होतोय पश्चाताप! ज्याला संघातून काढलं, तोच खेळाडू दिल्लीसाठी ठरतोय मोठा जॅकपॉट
13
पाकव्याप्त काश्मीर लवकरच भारतात समाविष्ट होणार; AIIO चे मुख्य इमाम उमर इलियासी यांची भविष्यवाणी
14
युद्धभागात १०,००० हून अधिक कर्मचारी! टाटा समूहाच्या ३० कंपन्यांच्या सीईओंना तयार राहण्याचे आदेश
15
इराणमध्ये दिसली अमेरिकेची लढाऊ विमाने आणि हेलिकॉप्टर, कमी उंचीवर घिरट्या; व्हिडीओ आले समोर
16
इराणकडून आखाती देशांच्या तोंडचं पाणी पळवण्याची तयारी, पाणी आणि गॅस प्रकल्पांवर हल्ले, नव्या चालीमुळे खळबळ
17
बच्चू कडूंनी रचला खुनाचा कट? आमदार प्रवीण तायडेंचा ऑडिओ क्लिपसह खळबळजनक दावा
18
SIP की एकरकमी गुंतवणूक? १ कोटींचा टप्पा गाठण्यासाठी सर्वात सोपा मार्ग कोणता? पाहा गणित
19
Chanakya Niti: शून्यातून विश्व निर्माण करायचंय? आचार्य चाणक्यांचे 'हे' १० विचार तुम्हाला नक्कीच दिशा देतील
20
९० दिवसांत २८ मृत्यू, मग पुजाऱ्याने दिला 'असा' सल्ला, संपूर्ण गाव झाला रिकामी, आता...  
Daily Top 2Weekly Top 5

नागपूर रेल्वेस्थानकावर वाहतूक पोलिसाच्या सतर्कतेमुळे गवसला चार तोळ्याचा हार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 27, 2018 13:29 IST

नागपूर रेल्वे स्थानकावर वाहतूक शाखेत काम करणाऱ्या भगवान इंगोले याने रेल्वेस्थानकाच्या परिसरात सापडलेला चार तोळ्यांचा सोन्याचा हार परत करून इमानदारीचा परिचय दिला आहे.

ठळक मुद्देघाईघाईत रेल्वेफलाटावर पडला होता हार

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : रस्त्यावर शंभर रुपयाची नोट पडली तरी ती कुणाची आहे याचा शोध घेण्याची कुणी तसदी घेत नाही. परंतु नागपूर रेल्वे स्थानकावर वाहतूक शाखेत काम करणाऱ्या भगवान इंगोले याने रेल्वेस्थानकाच्या परिसरात सापडलेला चार तोळ्यांचा सोन्याचा हार परत करून इमानदारीचा परिचय दिला आहे.परमित कौर गुरप्रीत सिंग (३०) रा. पंजाबी लाईन, कामठी रोड यांचे दोन दिवसांपूर्वी लग्न झाले. रविवारी त्यांचे नातेवाईक तेलंगणा एक्स्प्रेसने जात असल्यामुळे त्यांना निरोप देण्यासाठी परमित कौर कुटुंबीयांसह नागपूर रेल्वेस्थानकावर आल्या होत्या. धावपळीत त्यांच्या गळ्यातील चार तोळ्याचा सोन्याचा हार खाली पडला. ड्युटीवर असलेले वाहतूक पोलीस भगवान इंगोले यांचे लक्ष त्या हाराकडे गेले. त्यांनी तो हार उचलून आपल्या सहकाऱ्यांना त्याबाबत माहिती दिली. नातेवाईकांना निरोप देऊन झाल्यावर घरी निघत असताना परमित कौर यांना गळ्यातील हार हरविल्याचे समजले. लगेच त्यांनी लोहमार्ग पोलीस ठाणे गाठून याबाबत माहिती दिली. त्यावर रवींद्र सावजी, योगेश धुरडे यांनी मुख्य प्रवेशद्वारासमोर हाराचा शोध घेण्याचा प्रयत्न केला. त्यावेळी वाहतूक पोलीस भगवान इंगोले, प्रमोद घ्यारे यांनी त्यांना सोन्याचा हार सापडल्याची माहिती दिली. हरविलेला आणि त्यांना सापडलेला हार एकच असल्याचे स्पष्ट झाल्यानंतर कागदोपत्री कारवाई करून तो हार परमित यांना सोपविण्यात आला. त्यांनी वाहतूक पोलीस भगवान इंगोले यांना मनापासून धन्यवाद दिले.

टॅग्स :traffic policeवाहतूक पोलीस