शहरं
Join us  
Trending Stories
1
लाजीरवाण्या पराभवानंतर LSG चे मालक संतापले; कॅप्टन KL Rahul ला झापताना दिसले, Video
2
Fact Check: भारतात ३०० दहशतवादी घुसणार असल्याचे भाजपा अध्यक्ष जेपी नड्डा खरंच बोलले? जाणून घ्या सत्य
3
नागपूर मेडिकलच्या अधिष्ठात्यांसह ११ डॉक्टरांविरोधात गुन्हा, निष्काळजीपणाचा ठपका!
4
ना कोहली... ना रोहित...; ब्रायन लाराला वाटतं, हा युवा फलंदाज मोडू शकतो त्याचा 400 धावांचा रेकॉर्ड
5
Chandrayaan-3 नं इतिहास रचला; आता चंद्रासंदर्भात आली आणखी एक आनंदाची बातमी! जाणून घ्या, काय सापडलं?
6
सनरायझर्स हैदराबादने ९.४ षटकांत कुटल्या विजयी १६७ धावा, Mumbai Indians चे आव्हान संपुष्टात आणले
7
१६७ धावा, ९.४ षटकं, १६ चौकार, १४ षटकार! SRH चा चमत्कार, अभिषेक-ट्रॅव्हिस यांनी मोडला १६ वर्षांपूर्वीचा विक्रम
8
शरद पवारांकडे पक्ष विलिनीकरणाशिवाय पर्याय नाही; चंद्रशेखर बावनकुळे यांची खरमरीत टीका
9
माझे शब्दच हरवले आहेत, ही काल्पनिक फलंदाजी; बेक्कार हरल्यानंतर KL Rahul ला काहीच सूचेना
10
आमदाराच्या स्वीय्य सहाय्यकाच्या अपघाती मृत्यू प्रकरणी ट्रकचालकास अटक व सुटका
11
भारतीय अर्थव्यवस्था 8% दराने वाढणार; देशाच्या मुख्य आर्थिक सल्लागारांनी व्यक्त केला विश्वास
12
'इंडिया' आघाडी भ्रष्टाचारी; भाजपकडे नेता, नीती अन् विकासाचा कार्यक्रम तयार: अमित शाह
13
ट्रॅव्हिड हेडने कुटल्या १२ चेंडूंत ५८ धावा! अभिषेक शर्मासह ३६ चेंडूंत फलकावर चढवल्या १०७ धावा
14
महा-बीसीए, बीबीए, एमसीए, एमबीए CET प्रवेश परीक्षा २९ मे रोजी; सुधारित वेळापत्रक जाहीर
15
भारताच्या लोकसंख्येत हिंदू 6 टक्क्यांनी घटले, मुस्लीम समाजाचा टक्का वाढला; सरकारी पॅनलनं केला 65 वर्षांचा अभ्यास
16
Air India ने 80 उड्डाणे रद्द केल्याबद्दल मागितली प्रवाशांची माफी; तिकीटाचे पैसेही परत करणार...
17
काँग्रेसची धुळधाण हीच खरी देशभक्ती; एकनाथ शिंदेंची संगमनेरात जोरदार टीका
18
मी दक्षिण भारतातील असून भारतीय दिसते; अभिनेत्रीचं सॅम पित्रोदांना चोख प्रत्युत्तर
19
इंडिया पोस्ट पेमेंट्स बँकेत नोकरीची संधी, 'या' तारखेपूर्वी उमेदवार करू शकतात अर्ज
20
लखनौला बसले धक्के; भुवीच्या चेंडूवर नितीश रेड्डी, सनवीर सिंग यांनी अविश्वसनीय झेल टिपले 

नागपुरातील मोमीनपुरा भागात दूषित पाणीपुरवठ्यामुळे घराघरात कावीळ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 05, 2018 9:32 PM

प्रभाग ८ मोमिनपुरा येथील तकिया दिवानशहा परिसरात दूषित पाणीपुरवठ्यामुळे नागरिकांचे आरोग्य बिघडले आहे. दूषित पाणीपुरवठ्यामुळे शेकडो घरात कावीळचे रुग्ण वाढले आहेत. घराघरात कावीळचे रुग्ण आढळल्याने नागरिकांमध्ये संताप असून, बुधवारी हा संताप मोमिनपुऱ्यात अनुभवायला आला. महिलांनी रस्त्यावर येऊन मनपा प्रशासन व लोकप्रतिनिधींच्या विरोधात जोरदार नारेबाजी केली.

ठळक मुद्देतकिया, दिवानशाह परिसरात उद्रेक : नागरिकांनी व्यक्त केला संताप

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : प्रभाग ८ मोमिनपुरा येथील तकिया दिवानशहा परिसरात दूषित पाणीपुरवठ्यामुळे नागरिकांचे आरोग्य बिघडले आहे. दूषित पाणीपुरवठ्यामुळे शेकडो घरात कावीळचे रुग्ण वाढले आहेत. घराघरात कावीळचे रुग्ण आढळल्याने नागरिकांमध्ये संताप असून, बुधवारी हा संताप मोमिनपुऱ्यात अनुभवायला आला. महिलांनी रस्त्यावर येऊन मनपा प्रशासन व लोकप्रतिनिधींच्या विरोधात जोरदार नारेबाजी केली.परिसरातील मो. तौकीर म्हणाले की, त्यांच्या घरात मोठा भाऊ मो. अतिक व मो. रफीक यांना कावीळ झाला आहे. ते खासगी रुग्णालयात उपचार घेत आहेत. मशीद दारुल फलाहजवळ राहणाऱ्या आफरीन कौसर यांना कावीळ झाला आहे. मो. नसीर म्हणाले की, पाण्यातून दुर्गंधी येत आहे. घरातील १४ वर्षीय मुलाला कावीळ झाला आहे. अशा अनेक तक्रारी परिसरातील नागरिकांनी लोकमत पुढे व्यक्त केल्या. एमआयएमचे रिजवान अन्सारी म्हणाले की, दूषित पाणीपुरवठा ही संपूर्ण प्रभागाची समस्या आहे. असे असतानाही लोकप्रतिनिधींची भूमिका मूकदर्शक बनली आहे.दोन महिन्यापासून दूषित पाण्याची समस्या 

तकिया दिवानशाह परिसरात गेल्या दोन महिन्यापासून दूषित पाणीपुरवठा होत आहे. यासंदर्भात बऱ्याचदा स्थानिक नगरसेवकांना तक्रारीही केल्या आहेत. नगरसेवकाकडून समस्या सोडविल्या जात नाही, उलट सल्ले दिले जातात की पाणी उकळुन प्यावे. नागरिकांचा आरोप आहे की, नगरसेवक नागरिकांच्या समस्या प्रशासनापर्यंतसुद्धा पोहोचवीत नाही. त्यामुळे नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले आहे.पाण्यासाठी करावी लागते भटकंतीमोमिनपुऱ्यातील तकिया दिवानशाह येथे होणाऱ्या दूषित पाणीपुरवठ्यामुळे घराघरात कावीळ पसरल्याने नागरिक चिंतित आहेत. अशात लोकांना पाणीटंचाईचा सामना करावा लागतो आहे. नागरिकांना पाण्यासाठी भटकंती करावी लागत आहे. पाण्याची सोय दुसऱ्या वस्तीतून करावी लागत आहे.

 

टॅग्स :Nagpur Municipal Corporationनागपूर महानगर पालिकाcivic issueनागरी समस्या