शहरं
Join us  
Trending Stories
1
"धरणासंदर्भात केलेल्या 'त्या' वाक्यामुळं माझं वाटोळं झालं"! अजित दादांनी 'तो' किस्सा जसाच्या तसा सांगितला
2
आता लोकसभा निवडणुकीत 'लव्ह जिहाद'ची एन्ट्री? काँग्रेस नगरसेवकाच्या मुलीच्या हत्येवरून PM मोदी बरसले
3
...तेव्हा आम्ही पाठीशी उभे राहिलो; मोहिते पाटलांच्या पक्षांतरानंतर फडणवीसांचा पहिल्यांदाच हल्लाबोल
4
IPL 2024 CSK vs SRH : मराठमोळा तुषार लै 'हुश्शार'! CSK चा मोठा विजय; SRH चा दारूण पराभव
5
'परीक्षेत जय श्री राम लिहितात अन् 50 % मार्क्स मिळतात', ओवेसींचा मोदी-शहांवर निशाणा
6
चेन्नईच्या फलंदाजाची स्फोटक खेळी! इरफान म्हणाला, याला वर्ल्ड कपच्या संघात घ्यायलाच हवं...
7
त्यांच्या कारकिर्दीत ‘ते’ म्हणतील ते सगळं केलं, आता भावनिक व्हायच नाही; अजित पवारांचा वार
8
IPL 2024 GT vs RCB: RCB चा 'विराट' शो! विल जॅक्सचे ४१ चेंडूत शतक; ४ ओव्हर राखून विजय
9
बारामती, शिरुरमध्ये पोलिसी बळाचा वापर, मतदारांना धमक्या; संजय राऊतांचा गंभीर आरोप
10
"मुस्लीम लोक सर्वाधिक कंडोम वापरतात..."; ओवेसींनी दिला केंद्राच्या डेटाचा हवाला, PM मोदींवर पलटवार
11
बीडमध्ये पंकजा मुंडे, मनोज जरांगे एकाच व्यासपीठावर; दोघांचाही एकमेकांना नमस्कार
12
BANW vs INDW: भारताची विजयी सलामी! बांगलादेश त्यांच्याच घरात ढेर; पाहुण्यांची सांघिक खेळी
13
माजी पंतप्रधानांच्या नातवाचे अश्लिल व्हिडीओ व्हायरल; निवडणूक होताच खासदार देशातून फरार
14
'अरे! तुमचं डोकं फुटलंय की सिलिंडर...'; बेंगलोर ब्लास्टवरून पंतप्रधान मोदी काँग्रेसवर बरसले 
15
माढ्याचा खासदार प्रत्येक वेळी नवा; आता कोण? परंपरा टिकणार की बदलणार?
16
IPL 2024 GT vs RCB : साई 'सु'दर्शन! शाहरूखही चमकला; युवा भारतीय खेळाडूंनी RCB ला धू धू धुतले
17
अनेक तासांचा प्रवास आता मिनिटांत! 'वंदे भारत' मेट्रोच्या रुपात येणार, कधी सुरू होणार? पाहा...
18
IPL 2024 GT vs RCB : "विराटच्या स्लो स्ट्राईक रेटबद्दल बोललं जातं पण...", इरफानची 'मन की बात'!
19
IPL 2024 CSK vs SRH : ऋतु'राज'! मराठमोळ्या गायकवाडचे शतक थोडक्यात हुकले; CSK ने धावांचा डोंगर उभारला
20
Narendra Modi : "राम मंदिर बांधण्याचा निर्णय देशाच्या स्वातंत्र्याच्या दुसऱ्याच दिवशी घ्यायला हवा होता"

नागपुरात एअर इंडियाच्या विमानाला पक्ष्याची धडक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 22, 2018 11:19 PM

रायपूरवरून नागपूरमार्गे दिल्लीला जाणाऱ्या विमानाला आज सकाळी एका पक्ष्याने धडक दिली. या अपघातात पायलटसह प्रवासी बालंबाल बचावले. नागपूरमध्ये हे विमान उतरत असताना हा अपघात घडला. या विमानात दुर्गचे खासदार ताम्रध्वज साहू यांच्यासह १६३ प्रवासी आणि क्रु मेंबर होते.

ठळक मुद्देप्रवाशी बालंबाल बचावले : नागपुरात इमर्जन्सी लँडिंग

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : रायपूरवरून नागपूरमार्गे दिल्लीला जाणाऱ्या विमानाला आज सकाळी एका पक्ष्याने धडक दिली. या अपघातात पायलटसह प्रवासी बालंबाल बचावले. नागपूरमध्ये हे विमान उतरत असताना हा अपघात घडला. या विमानात दुर्गचे खासदार ताम्रध्वज साहू यांच्यासह १६३ प्रवासी आणि क्रु मेंबर होते.विमानतळाच्या सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार गुरुवारी सकाळी एअर इंडियाचे विमान जे. ४६९ हे दिल्लीवरून सकाळी ६.५५ वाजता आकाशात झेपावले. हे विमान सकाळी ८.१५ वाजता रायपूरला पोहोचले. रायपूरवरून दिल्ली आणि नागपूरचे जवळपास १५० प्रवासी घेऊन जे. ४७० हे विमान सकाळी ८.४५ वाजता आकाशात झेपावले. नागपूरच्या आकाशात पोहोचताच सकाळी ९.२५ वाजता या विमानाच्या विंगफ्लायमध्ये एक पक्षी धडकला. पक्षी धडकल्याची माहिती मिळताच पायलटने समयसूचकता दाखवून विमान सुरक्षितरीत्या नागपूरच्या डॉ. बाबासाहेब आंबेडकर आंतरराष्ट्रीय विमानतळावर उतरविले. पक्षी विमानाला धडकल्यामुळे विमानाला पुढील प्रवास करण्याची परवानगी देण्यात आली नाही. अभियंता विमानाच्या दुरुस्तीला लागले. या विमानाने जाणाºया प्रवाशांना पॅसेंजर लाऊंजमध्ये बसविण्यात आले. त्यानंतर दिल्लीवरून एअर इंडियाचे एक विशेष विमान बोलविण्यात आले. या सर्व प्रवाशांना दुपारी ३ वाजता दिल्लीसाठी रवाना करण्यात आले. मिहान इंडिया लिमिटेडचे वरिष्ठ विमानतळ संचालक विजय मुळेकर यांनी हैदराबाद-रायपूर विमानात तांत्रिक बिघाड झाल्यामुळे ते नागपुरात उतरविण्यात आल्याचे तसेच प्रवाशांना रायपूरला नेण्यासाठी दिल्ली-रायपूर विमान नागपुरात उतरविण्यात आल्याची माहिती दिली.गो एअरचे विमानही अडकलेसूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार गो एअरचे विमान बुधवारी रात्री नागपूरला आले. गुरुवारी सकाळी ५ वाजता हे विमान बेंगळुरुला जाणार होते. परंतु त्यात तांत्रिक बिघाड झाल्यामुळे हे विमान नियोजित वेळेत जाऊ शकले नाही. विमानाची दुरुस्ती केल्यानंतर सकाळी ११ वाजता हे विमान रवाना झाले. 

टॅग्स :Dr. Babasaheb Ambedkar International Airportडॉ. बाबासाहेब आंबेडकर आंतरराष्ट्रीय विमानतळ नागपूरnagpurनागपूर