शहरं
Join us  
Trending Stories
1
कोलकाता नाईट रायडर्सचा सहज विजय; दिल्ली कॅपिटल्सचे Play Off चे स्वप्न अधांतरी
2
"सुप्रिया बाहेरची असण्याचं कारण नाही, मी बारामतीत ज्या घरात राहतो ते तिचंच"; शरद पवारांनी स्पष्टच सांगितलं
3
जय शाह T20 WC साठीचा भारतीय संघ फायनल करणार, अजित आगरकर लिस्ट घेऊन अहमदाबादला 
4
मुंबई उत्तर पूर्वमध्ये वादाची ठिणगी; मिहीर कोटेचा यांच्या प्रचार रॅलीवर दगडफेक केल्याचा आरोप, पोलिसांत तक्रार
5
अस्वस्थ झालेल्या सत्ताधाऱ्यांकडून वैयक्तिक आरोप; सामान्य मतदारांना EVM वर शंका- शरद पवार
6
स्वप्न पूर्ण न झालेले आत्मे देशाला अस्थिर करत आहेत; PM मोदींचा नाव न घेता पवारांवर निशाणा
7
पुण्यात महायुतीच्या उमेदवारांसाठी मोदींची सभा; मंचावर दिसले मनसे नेते अमित ठाकरे
8
रिषभ पंतच्या निर्णयाने दिल्लीच्या पायावर धोंडा! पण, कुलदीप यादवने चोपल्या सर्वाधिक धावा
9
"भाजप भयभीत, UCC मुळे हिंदूंना…"; ममता बॅनर्जी यांचा केंद्र सरकारवर निशाणा
10
वातावरण विरोधात जातंय हे पाहून देवेंद्र फडणवीसांनी...; जयंत पाटलांचा गंभीर आरोप
11
187 रुपयांच्या आईस्क्रीमसाठी Swiggy ला मोजावे लागले 5 हजार रुपये; जाणून घ्या काय आहे प्रकरण?
12
ओला कॅब्सचे सीईओ हेमंत बक्षी यांचा राजीनामा; 10 टक्के कर्मचाऱ्यांना काढून टाकण्याची तयारी
13
गुजरातमध्ये सर्वात श्रीमंत उमेदवार कोण? एकाकडे तर केवळ २ हजार रूपयांची संपत्ती
14
सुरेश रैनाने T20 World Cup 2024 साठी निवडला परफेक्ट संघ; गोलंदाजीत अनपेक्षित निवड
15
"मी जिवंत असेपर्यंत काँग्रेसला..."; पंतप्रधान मोदींनी साताऱ्याच्या सभेत विरोधकांना भरला सज्जड दम
16
'रामायण' साठी ही डिझायनर जोडी फायनल, संजय लीला भन्साळींशी आहे कनेक्शन
17
उद्धव ठाकरेंना शरद पवारांनी राजीनामा द्यायला लावला, राऊतांचा पाठिंबा होता; शिंदे गटाचा दावा
18
T20 World Cup 2024 साठी टीम इंडियाचा उपकर्णधार कोण? मोठी अपडेट समोर
19
VIDEO : 'लेव्हल सबके निकलेंगे' मधील व्हायरल मुलगी खरंच कोट्यधीश झाली का?
20
गुरुचरण सिंग यांचे वडील बोलण्याच्या मनस्थितीत नाहीत; नातेवाईक म्हणाले, 'त्याच्या लग्नाबद्दल...'

गडकरींमुळे सूक्ष्म-लघु उद्योगांना येतील ‘अच्छे दिन’

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 01, 2019 12:06 AM

सलग दुसऱ्यांचा केंद्रीय मंत्रिपदाची शपथ घेणारे नितीन गडकरी यांच्याकडे भूपृष्ठ वाहतूक मंत्रालयासोबतच सूक्ष्म, लघु व मध्यम उद्योग मंत्रालयाची जबाबदारीदेखील देण्यात आली आहे. आजवर काहिसे दुर्लक्षित राहिलेल्या या खात्याच्या माध्यमातून गडकरी देशातील उद्योगांना एक नवीन बळ देतील. तसेच त्यांच्या कार्यशैलीतून विदर्भातील सूक्ष्म, लघु, मध्यम उद्योगांना सर्वार्थाने ‘अच्छे दिन’ आणतील, अशी अपेक्षा उद्योगजगतातून व्यक्त होत आहे. विशेषत: या माध्यमातून ग्रामीण भागाचा कायापालट करून वंचित व गरिबांना स्वावलंबी करण्याची क्षमता गडकरींकडे आहे, असा विश्वास उद्योजकांकडूनच व्यक्त होत आहे.

ठळक मुद्देविदर्भातील सूक्ष्म, लघु, मध्यम उद्योजकांचा विश्वास : ग्रामीण भागाचा कायापालट करण्याची क्षमता

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : सलग दुसऱ्यांचा केंद्रीय मंत्रिपदाची शपथ घेणारे नितीन गडकरी यांच्याकडे भूपृष्ठ वाहतूक मंत्रालयासोबतच सूक्ष्म, लघु व मध्यम उद्योग मंत्रालयाची जबाबदारीदेखील देण्यात आली आहे. आजवर काहिसे दुर्लक्षित राहिलेल्या या खात्याच्या माध्यमातून गडकरी देशातील उद्योगांना एक नवीन बळ देतील. तसेच त्यांच्या कार्यशैलीतून विदर्भातील सूक्ष्म, लघु, मध्यम उद्योगांना सर्वार्थाने ‘अच्छे दिन’ आणतील, अशी अपेक्षा उद्योगजगतातून व्यक्त होत आहे. विशेषत: या माध्यमातून ग्रामीण भागाचा कायापालट करून वंचित व गरिबांना स्वावलंबी करण्याची क्षमता गडकरींकडे आहे, असा विश्वास उद्योजकांकडूनच व्यक्त होत आहे.आपल्या देशात बेरोजगारी ही एक मोठी समस्या आहे. सरकारी व खासगी क्षेत्रात आवश्यक प्रमाणात रोजगार उपलब्ध नाही. अशा स्थितीत सूक्ष्म, लघु व मध्यम उद्योगांचे महत्त्व लक्षात घेण्याची आवश्यकता आहे. देशाच्या आर्थिक विकासात या उद्योगांची महत्त्वाची भूमिका आहे. या उद्योगांना अधिक सक्षम करण्यासाठी केंद्र सरकारने सुरू केलेली ‘५९ मिनिटात कर्ज’ ही योजना गाजली होती. या उद्योगांच्या माध्यमातून तरुण-तरुणींना उद्योजक बनून स्वत:च्या पायावर उभे राहण्याची संधी असते. या मंत्रालयाचा विस्तार आवश्यक असून नितीन गडकरी यांच्याकडे ही आव्हानात्मक जबाबदारी सोपविण्यात आली आहे.नितीन गडकरी हे स्वत: शेतकरी असून उद्योगांबाबत त्यांचे ज्ञान पाहून भलेभलेदेखील आश्चर्यचकित होतात. गडकरी निश्चितपणे देशातील सूक्ष्म, लघु व मध्यम उद्योगांना सक्षम करतील व देशात रोजगारनिर्मितीला एक नवीन चालना मिळेल, असा विश्वास उद्योगजगतातून व्यक्त करण्यात येत आहे.लघुउद्योग सक्षमीकरणासाठी संघ आग्रहीराष्ट्रीय स्वयंसेवक संघ सूक्ष्म, लघु व मध्यम उद्योगांच्या सक्षमतेसाठी लघु उद्योग भारतीच्या माध्यमातून कार्य करत आहे. देशातील ग्रामीण भागाचा विकास व्हावा तसेच गरीब व्यक्ती स्वावलंबी व्हावी यासाठी या उद्योगांना प्रोत्साहन देणारे धोरण असावे, अशी संघाची भूमिका आहे. नितीन गडकरी हे संघाच्या जवळचे मानले जातात. संघाच्या अपेक्षापूर्तीसाठी पंतप्रधानांनी गडकरींवरच विश्वास ठेवला आहे.विदर्भात मोठ्या संधीअनेक वर्षांपूर्वी स्थापन झालेल्या विदर्भातील अनेक ‘एमआयडीसी’मध्ये आवश्यक त्या प्रमाणात मोठे उद्योग आलेलेच नाही. मात्र सूक्ष्म, लघु, मध्यम उद्योग मंत्रालयाच्या माध्यमातून या ‘एमआयडीसी’चा चेहरा पालटू शकतो. विदर्भात नागपूरसह वर्धा, गडचिरोली, चंद्रपूर, भंडारा-गोंदिया, अमरावती इत्यादी जिल्ह्यात सूक्ष्म, लघु, मध्यम उद्योगांचे अनेक पर्याय उपलब्ध आहेत. गडकरी यांच्यासारखे सक्षम नेतृत्व मिळाल्याने या उद्योगांना बळ मिळेल. मागील तीन वर्षांपासून जीएसटी लघु उद्योगांची स्थिती चांगली झाली आहे. विदर्भात पायाभूत सुविधांचे मोठ्या प्रमाणावर काम सुरू आहे. त्यामुळे सूक्ष्म, लघु, मध्यम उद्योजकांना काम मिळेल. नितीन गडकरी निश्चितच यासाठी पुढाकार घेतील. गडकरींचा भर ‘क्लस्टर युनिट’वर जास्त असून विदर्भात दालमिल, रेडीमेड गारमेन्ट इत्यादींचे ‘क्लस्टर’ अस्तित्वात असून ते आता भव्य होतील, असा विश्वास बुटीबोरी मॅन्युफॅक्चरिंग इंडस्ट्रीज असोसिएशनचे सचिव मिलिंद कानडे यांनी व्यक्त केला. आज नागपुरात होणार भव्य स्वागतसलग दुसऱ्यांदा केंद्रीय मंत्रिपदाची शपथ घेतल्यानंतर केंद्रीय भूपृष्ठ वाहतूक व सूक्ष्म, लघु, मध्यम उद्योगमंत्री नितीन गडकरी यांचे शनिवारी प्रथमच उपराजधानीत आगमन होणार आहे. यानिमित्ताने सकाळी ८ वाजता नितीन गडकरी यांच्या स्वागतासाठी शहर भाजपाकडून जय्यत तयारी करण्यात आली आहे. डॉ.बाबासाहेब आंबेडकर आंतरराष्ट्रीय विमानतळावर मोठ्या प्रमाणावर कार्यकर्त्यांनी स्वागताला पोहोचावे, असे आवाहन पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे व शहराध्यक्ष सुधाकर कोहळे यांनी केले आहे.सायंकाळी ५ वाजता कविवर्य सुरेश भट सभागृहात नितीन मुकेश यांच्या गायनाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे. सायंकाळी ७ वाजता रेशीमबाग मैदान येथे नितीन गडकरी यांचा शहर व जिल्हा भाजपातर्फे सत्कार करण्यात येणार आहे. याला खा.विकास महात्मे यांच्यासह आ.सुधाकर देशमुख, आ.विकास कुंभारे, आ.अनिल सोले, आ.गिरीश व्यास, आ.कृष्णा खोपडे, आ.मिलिंद माने, विदर्भ संघटनमंत्री उपेंद्र कोठेकर, महापौर नंदा जिचकार, राजेश बागडी, संदीप जोशी, प्रवीण दटके प्रामुख्याने उपस्थित राहतील. कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी शहर संघटनमंत्री भोजराज डुंबे, संदीप जाधव, रमेश भंडारी, संजय ठाकरे, किशन गावंडे, बंडू राऊत, महेंद्र राऊत, दिलीप गौर, वीरेंद्र कुकरेजा, दयाशंकर तिवारी, प्रदीप पोहाणे, डॉ. कीर्तिदा अजमेरा, धर्मपाल मेश्राम, गुड्डू त्रिवेदी, प्रमोद पेंडके, चंदन गोस्वामी यांच्याकडे जबाबदारी देण्यात आली आहे.

 

टॅग्स :Nitin Gadkariनितीन गडकरीministerमंत्रीCentral Governmentकेंद्र सरकार