शहरं
Join us  
Trending Stories
1
विधान परिषदेच्या एका जागेसाठी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये ४ नावांवर चर्चा, विक्रम काकडे यांचं नाव आघाडीवर
2
'चंद्रकांता' फेम भरत कपूर यांचं निधन, वयाच्या ८६ व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास; अभिनयाचा चार दशकांचा प्रवास थांबला
3
"न कळत सारं घडलं..." लाजिरवाण्या पराभवानंतर अक्षर पटेल झाला 'कावरा बावरा', म्हणे...
4
वेगळ्या घोषणेची गरज नाही, भारत आधीपासूनच हिंदूराष्ट्र - सरसंघचालक मोहन भागवत
5
Bhuvneshwar Kumar : स्विंगचा किंग भुवीची पॉवरप्लेमध्ये कमाल! एकाच डावात दोन खास विक्रमांना गवसणी
6
मुंबई सीएसएमटीवरून सोलापूरला जाणाऱ्या वंदे भारत ट्रेनचा डबा घसरला, सुदैवाने सर्व प्रवासी सुरक्षित!
7
चंद्रपुरातील किडनी विक्री प्रकरणात रविंद्रपाल सिंग यांना जामीन नाहीच, हायकोर्टाचा निर्णय; सखोल तपासासाठी अर्ज फेटाळला
8
एमआयडीसीतील फॅक्टरींमध्ये अनेक कामगारांचे पोलिस व्हेरिफिकेशनच नाही; ना कागदपत्र, ना कुणाची नोंद
9
Virat Kohli New Record : किंग कोहलीचा 'विराट' पराक्रम! IPL मध्ये ९००० धावांसह रचला नवा विक्रम
10
२६ कामगारांचा बळी घेणाऱ्या एसबीएल कंपनीतील पाच पदाधिकाऱ्यांना दणका; उच्च न्यायालयाचा अटकपूर्व जामिनास नकार
11
यवतमाळ जिल्हा बँकेचे मुदतवाढ मिळालेले संचालक मंडळ अखेर बरखास्त; उपनिबंधकांकडे कारभार, संचालक मंडळाच्या मनसुब्यावर पाणी 
12
विदर्भातील सहा शहरांमध्ये ‘सन’ताप कायम, आणखी २४ तास उष्णतेची लाट; मात्र अर्धे जिल्हे अवकाळीच्या सावटात
13
DC vs RCB : हिशोब चुकता! दिल्ली कॅपिटल्सच्या घरच्या मैदानात रॉयल चॅलेंजर्सनं ३९ चेंडूत संपवली मॅच
14
Top Marathi News Live: मुंबई सीएसएमटीवरुन सोलापूरला जाणाऱ्या वंदे भारत ट्रेनचा डबा पुणे स्थानकात घसरला
15
"५१ अंशांच्या उन्हातही काही होणार नाही, माझ्या गाडीत AC चालत नाही"; ज्योतिरादित्य शिंदेंनी सांगितला उष्णतेच्या लाटेपासून बचावाचा देशी उपाय!
16
महाराज आला रे! मोठ्या धक्क्यातून सावरण्यासाठी Mumbai Indians नं खेळली 'ही' चाल
17
१ मे पासून LPG गॅसचे नियम बदलणार? सिलिंडर हवा असेल तर 'DAC' कोड द्यावा लागणार; पाहा नवे बदल
18
DC vs RCB: ८ धावांत ६ विकेट्स! भुवी-हेजलवूडमध्ये विकेट घेण्याची स्पर्धा; दिल्लीकरांसाठी भयावह स्वप्न
19
भसाभस वाढतंय वीज बिल... एसी सोबत पंखा किती फायदेशीर? फक्त AC च्या 'या' आकड्याकडे लक्ष द्या; सरकारनं दिला खास 'मंत्र'
20
वॉशिंग मशीन लावून झाल्यानंतर ४० मिनिटांनी अंघोळ करायचे लक्षात ठेवा...; नाहीतर ठरू शकते जीवघेणे!
Daily Top 2Weekly Top 5

वन विभागाच्या चौकशीला मध्यवर्ती संग्रहालयाच्या अधिकाऱ्यांची हुलकावणी

By admin | Updated: July 17, 2014 01:01 IST

मध्यवर्ती संग्रहालयातील अधिकाऱ्यांच्या असहकार्यामुळे मंगळवारी चौकशीसाठी गेलेल्या वन विभागाच्या समितीला खाली हात परतावे लागले. माहिती सूत्रानुसार, वन विभागाचे सहायक वनसंरक्षक

अभिरक्षकांचे असहकार्य : चौकशी समिती खाली हात परतली नागपूर : मध्यवर्ती संग्रहालयातील अधिकाऱ्यांच्या असहकार्यामुळे मंगळवारी चौकशीसाठी गेलेल्या वन विभागाच्या समितीला खाली हात परतावे लागले. माहिती सूत्रानुसार, वन विभागाचे सहायक वनसंरक्षक बी. एच. वीरसेन यांच्या नेतृत्वात दुपारी २.३० वाजताच्या सुमारास चौकशी समिती मध्यवर्ती संग्रहालयात दाखल झाली. परंतु यावेळी कार्यालयात उपस्थित शिपायाने साहेब (संग्रहालयाचे अभिरक्षक) कार्यालयात हजर नसल्याचे सांगितले. त्यावर समितीच्या सदस्यांनी कुठे गेल्याची विचारणा केली असता, ते शेजारच्या पुरातत्त्व विभागात असल्याचे सांगण्यात आले. त्यावर संग्रहालयातील एका कर्मचाऱ्याने दूरध्वनीवरून अभिरक्षक कठाणे यांच्याशी संपर्क साधून, त्यांना वन विभागाच्या चौकशी समितीची माहिती दिली. त्यावर कठाणे यांनी ४.३० वाजतापर्यंत कार्यालयात पोहोचणार असल्याचे सांगितले. त्यानुसार वन विभागाची समिती तब्बल दोन तास साहेबांच्या प्रतीक्षेत ताटकळत बसून राहिली. शेवटी ४.४५ वाजले, तरी साहेब कार्यालयात पोहोचले नाही. त्यामुळे अखेर एसीएफ वीरसेन यांनी स्वत: कठाणे यांच्याशी दूरध्वनीवरून संपर्क साधून, चौकशीत सहकार्य करण्याची विनंती केली. परंतु कठाणे यांनी मुंबई येथील मध्यवर्ती संग्रहालयाच्या संचालकांशी चर्चा केल्याशिवाय चौकशीची परवानगी देणार नसल्याचे सांगितले. त्यावर वीरसेन यांनी संग्रहालय प्रशासनाला अगोदरच चौकशीची नोटीस बजावून पूर्वसूचना दिली असल्याची कठाणे यांना आठवण करून दिली. मात्र कठाणे मुळातच सहकार्य करण्याच्या मन:स्थितीत नव्हते. त्यामुळे त्यांनी त्याकडे दुर्लक्ष केले. शेवटी सायं. ५.१५ वाजताच्या सुमारास वन विभागाची समिती खाली हात संग्रहालयाबाहेर पडली. यानंतर समितीने दिवसभर घडलेल्या घटनाक्रमाचा अहवाल तयार करून, तो मुख्य वनसंरक्षक व उपवनसंरक्षकांकडे सादर केला असल्याची माहिती समितीच्या एका सदस्याने ‘लोकमत’शी बोलताना दिली. वन्यप्राण्यांच्या ‘ट्रॉफी’ नष्ट ‘सृष्टी’ संस्थेचे सदस्य विनीत अरोरा यांनी माहितीच्या अधिकारात मध्यवर्ती संग्रहालयाकडून मिळविलेल्या दस्तऐवजातून संग्रहालयातील चार अस्वल, एक वाघ, दोन सांबर, दोन नीलगाई, तीन काळवीट, दोन भेडकी, दोन बिबट, दोन जंगली मांजर, चार जंगली ससे, एक फार्इंग फॉक्स, पाच मुंगूस, दोन रानम्हशी, एक खार व एक माकड अशा विविध वन्यप्राण्यांच्या ट्रॉफी नष्ट करून त्यांची परस्पर विल्हेवाट लावल्याची धक्कादायक माहिती पुढे आली आहे. हे प्रकरण वन विभागापर्यंत पोहोचताच प्रधान मुख्य वनसंरक्षक (वन्यजीव) यांनी ३ जुलै रोजी मुख्य वनसंरक्षकांना एक पत्र जारी करून, या संपूर्ण प्रकरणाच्या चौकशीचे निर्देश दिले होते. त्यावर उपवनसंरक्षकांनी एसीएफ वीरसेन यांच्या अध्यक्षतेखाली चौकशी समिती स्थापन करून ही कारवाई सुरू केली आहे.