शहरं
Join us  
Trending Stories
1
राहुल गांधी एकाकी, कुणी ऐकत नाही, LPG मुद्द्यावर पक्षातच उभी फूट; नेते करतायत मोदींचे कौतुक
2
इराणने रस्ता रोखला, पण भारताने शोधली नवी वाट; आफ्रिकेतील देशांशी मैत्री अन् रशियाची तुफान साथ!
3
भाजपाने तिकीट नाकारल्यानंतर अन्नामलाई पहिल्यांदाच बोलले, म्हणाले, ‘मला निवडणूक लढवायची…’ 
4
शेअर बाजारातील घसरणीमुळे गुंतवणूकदार हवालदिल; Zerodha च्या नितीन कामथ यांनी दिला नवा मंत्र
5
Video - हृदयद्रावक! नातू पार्क करत होता गाडी, तेवढ्यात लागला बॅक गिअर; आजीचा जागीच मृत्यू,
6
सर्वसामान्यांना मोठा दिलासा! किरकोळ चुकांसाठी आता पोलीस कोठडी नाही; 'जन विश्वास' कायद्याने चित्र बदलले!
7
IPL 2026, DC v MI Head To Head Record : दिल्ली कॅपिटल्सपेक्षा मुंबई इंडियन्स भारी, पण...
8
Rupa Bayor : धाकड गर्ल! तायक्वांदो जागतिक क्रमवारीत टॉप-५ मध्ये झेप घेणारी रूपा बायोर पहिली भारतीय
9
रिक्षा परमिट हवे, तर मग मराठी येणे अनिवार्य; परवाने पुनर्तपासणीचे प्रताप सरनाईकांचे निर्देश
10
मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्याबाबत ११४७ एकरचा दावा चुकीचा, बदनामी प्रकरणी FIR दाखल
11
लक्ष्मी ऑरगॅनिक विरोधातील संघर्षाला व्यापक स्वरूप; आंदोलकांनी मुंबईत घेतली राज ठाकरेंची भेट
12
'ना पारसी ना मुंबईकर', Tata Trust मध्ये नवा वाद! मेहली मिस्त्रींचं श्रीनिवासन-विजय सिंग यांच्या नियुक्तीला आव्हान, प्रकरण काय?
13
'धुरंधर'चं तुफानी यश, रणवीर सिंहसोबत पुन्हा काम करणार आदित्य धर? पुढील प्रोजेक्ट्सची चर्चा
14
“ती बोलत नाही, बेशुद्ध...”; ७ वर्षांनी मोठ्या लिव्ह-इन पार्टनरची हत्या, २० दिवसांनी सत्य समोर
15
Petrol ४५८ रुपये तर Diesel ५२० पार! भारताच्या शेजारील देशात महागाईचा विस्फोट; आपल्याकडे काय आहेत दर?
16
VIDEO: सूर्याचा 'रहमान डकैत' स्टाईल FA9LA डान्स; Dhurandhar ची क्रेझ क्रिकेटच्या मैदानातही
17
'तू मरून जा, नाही तर तुला मारणार!' आरमोरीत हनी ट्रॅप, ब्लॅकमेलिंग अन् तरुणावर विषप्रयोग, तरुणीसह दोघांवर गुन्हा दाखल 
18
रात्रीस खेळ चाले! झोपेतच घात, सौदी दूतावास बेचिराक; इराणचा प्रहार, अमेरिकेने विचारही केला नाही
19
लखनौमध्ये रेल्वे सिग्नल बॉक्स उडवण्याचा मोठा कट उधळला; ISI च्या ४ संशयितांना अटक
20
Video - निसर्गाच्या देणगीला भेसळीचा विळखा; तुम्ही पिताय ते नारळपाणी खरंच 'नॅचरल' आहे का?
Daily Top 2Weekly Top 5

बॉलिवूडमधील नशेचा कचरा समाजासाठी घातक;सर्वांनी मिळून साफ करण्याची गरज- रामदेवबाबा

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 23, 2021 20:47 IST

'लोकमत' वृत्तपत्रसमूहाच्या नागपूर आवृत्तीच्या सुवर्णमहोत्सवी वर्षानिमित्त, रविवारी २४ ऑक्टोबर रोजी नागपुरात राष्ट्रीय आंतरधर्मीय परिषदेचे आयोजन करण्यात आले आहे. त्यावेळी स्वामी रामदेवबाबा यांनी आपलं मत व्यक्त केलं आहे.

नागपूर: बॉलिवूडमध्ये नशेचा जो कचरा झाला आहे, तो समाजासाठी घातक आहे, असं मत हरिद्वार येथील पतंजली योगपीठाचे संस्थापक स्वामी रामदेवबाबा यांनी व्यक्त केलं आहे. तसेच हा कचरा सर्वांनी मिळून साफ करण्याची गरज असल्याचे देखील रामदेवबाबा यांनी यावेळी सांगितलं. 

'लोकमत' वृत्तपत्रसमूहाच्या नागपूर आवृत्तीच्या सुवर्णमहोत्सवी वर्षानिमित्त, रविवारी २४ ऑक्टोबर रोजी नागपुरात राष्ट्रीय आंतरधर्मीय परिषदेचे आयोजन करण्यात आले आहे. 'सामाजिक सौहार्द्राबाबत वैश्विक आव्हाने व भारताची भूमिका' या विषयावर या परिषदेमध्ये विविध धर्मांच्या आचार्यांच्या उपस्थितीत महामंथन होणार आहे. या परिषदेसाठी हरिद्वार येथील पतंजली योगपीठाचे संस्थापक स्वामी रामदेव यांचं आज नागपुरात आगमन झालं. त्यावेळी त्यांनी चालू घडामोडींवर आपली रोखठोक मतं मांडली.

उद्या (रविवारी) भारत-पाकिस्तानदरम्यान होणाऱ्या क्रिकेट सामन्यावरही रामदेवबाबा यांनी टीकास्त्र सोडलं आहे. भारत आणि पाकिस्तान या दोन देशांदरम्यान सामने होणे हे राष्ट्रहित व राष्ट्रधर्माच्या विरोधात असल्याचे मत रामदेवबाबा यांनी व्यक्त केलं आहे.

दरम्यान, गेल्या काही दिवसांपासून राज्यात अंमली पदार्थप्रकरणी एनसीबी मोठ्या प्रमाणात कारवाई करत आहे. अभिनेता शाहरुख खानचा मुलगा आर्यन खान ड्रग्ज पार्टी प्रकरणी आता बॉलीवूडची उद्योन्मुख अभिनेत्री अनन्या पांडे हिचीही एनसीबीकडून चौकशी सुरू झाली आहे. आर्यन खानच्या मोबाइल चॅट्समध्ये ड्रग्जच्या खरेदीबाबतची चर्चा झाल्याची माहिती एनसीबीला मिळाली आहे. त्यानुसारच एनसीबीचे अधिकारी आता वेगानं तपासाला लागले आहेत. 

टॅग्स :Baba Ramdevरामदेव बाबाbollywoodबॉलिवूडDrugsअमली पदार्थIndiaभारतLokmatलोकमतNational Inter-Religious Conferenceराष्ट्रीय आंतरधर्मीय परिषद