नागपुरात भरधाव वाहनाच्या धडकेत मेकॅनिकचा करुण अंत
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 17, 2018 20:58 IST2018-05-17T20:57:48+5:302018-05-17T20:58:03+5:30
भरधाव वाहनचालकाने धडक दिल्यामुळे एका मेकॅनिकचा करुण अंत झाला. कमलेश जुजराम वर्मा (वय ४२) असे मृताचे नाव आहे. ते विजयनगरातील रामभूमी सोसायटीत राहत होते.

नागपुरात भरधाव वाहनाच्या धडकेत मेकॅनिकचा करुण अंत
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : भरधाव वाहनचालकाने धडक दिल्यामुळे एका मेकॅनिकचा करुण अंत झाला. कमलेश जुजराम वर्मा (वय ४२) असे मृताचे नाव आहे. ते विजयनगरातील रामभूमी सोसायटीत राहत होते.
मेकॅनिक असलेले वर्मा बुधवारी मध्यरात्री त्यांच्या हिरो होंडा दुचाकीने आॅटोमोटिव्ह चौक मार्गाने गॅरेजकडे जात होते. एका वाहनचालकाने वर्मा यांच्या दुचाकीला जोरदार धडक मारल्यामुळे वर्मा खाली पडून गंभीर जखमी झाले. त्यांना डॉक्टरकडे नेले असता डॉक्टरांनी मृत घोषित केले. माहिती कळताच कळमनाचे पीएसआय एस. बी. जाधव यांनी अपघातस्थळी धाव घेतली. त्यांनी या अपघाताची नोंद करून दोषी वाहनचालकाविरुद्ध गुन्हा दाखल केला. आरोपी वाहनचालकाचा शोध घेण्यासाठी सीसीटीव्ही फुटेज ताब्यात घेण्यात आले. पुढील तपास सुरू आहे.