नागपूर : मागील सव्वा महिन्यापासून सुरू असलेल्या लॉकडाऊनमुळे शहरातील वाहनांची चाके रुतल्यासारखी स्थिती आहे. व्यवहार आणि व्यवसाय बंद असल्याने मालवाहतूक करणारी वाहने उभी आहेत. हाताला कामच नसल्याने अनेकांना घर चालविणेही कठीण झाले आहे.
नागपूर महानगरात वाहनांची संख्या मोठी आहे. अनेकांचे संसार या व्यवसायावरच आहेत. मागील सव्वा महिन्यापासून सर्व काही ठप्प आहे. यामुळे वाहनांच्या भरवशावर कुटुंब चालविणाऱ्यांची फजिती सुरू आहे. मालवाहतूक बंद असल्याने त्यावरील मजुरांना काम नाही. वाहने उभी असल्याने गॅरेजचालकांचा व्यवसाय थांबला आहे. त्यांच्यावर अवलंबून असणारे मेकॅनिकही आर्थिक संकटात आहेत. वाहने उभी असल्याने वाहनांचे आणि टायरचे मेंटनन्स वाढले आहे. व्यवसाय बंद असल्याने अनेकांच्या वाहनांचे कर्जाचे हप्ते थकले आहेत. फायनान्सवरील वाहनांच्या कर्जाचे व्याज वाढत आहे.
...
शहरात वाहने किती?
कार - १,१६,८४२
जीप - ३१.५१७
दुचाकी - ११,३२,३५८
टुरिस्ट टॅक्सी - ५,४३८
ट्रक - १२,२१७
रुग्णवाहिका - ७१३
स्कूल बस - ५८८
...
बॉक्स
वाहने सुरू, पण गॅरेज बंद
शहरात वाहने मर्यादित स्वरूपात सुरू असली तरी गॅरेजेस मात्र बंद आहेत. कामावरील वाहन नादुरुस्त झाल्यावर दुरुस्त करायचे म्हणजे अडचण आहे. त्यामुळे वाहन रस्त्यावर उभे ठेवण्याशिवाय पर्याय नसतो, असा अनुभव आहे. पंक्चर दुरुस्तीपासून तर मोटार दुरुस्तीपर्यंत अडचणी असल्याने सध्या वाहनांचा वापरही मर्यादित झाला आहे.
...
बॉक्स -
वाहनचालकांसमोर अडचणींचा डोंगर
लॉकडाऊनमध्ये गॅरेजही बंद आहेत. गल्लीबोळांतील गॅरेजेस लपूनछपून सुरू असली तरी दुरुस्तीला येणारे नाहीत. ग्राहकच नसल्याने त्यांचीही अडचण चालली आहे. गॅरेजमध्ये कामासाठी असलेले मेकॅनिक रोजीने किंवा महिनेवारीने कामे करतात. सध्या त्यांच्या उदरनिर्वाहाचा प्रश्न ठाकला आहे. शहरातील हजारो मेकॅनिक आज हातावर हात देऊन बसलेले दिसत आहेत.
...
गॅरेजवाल्यांचे पोट-पाणी बंद (प्रतिक्रिया)
प्रतिक्रिया १ : आमचे उत्पन्न रोजच्या मेहनतीवर असते. कामच थांबल्याने उत्पन्नही थांबले आहे. दुकानाच्या जागेचे भाडे, लाईट बिल कसे भरायचे, असा प्रश्न आहे. कुटुंब चालविणेही कठीण झाले आहे.
- अतुल साळवे, वाठोडा
...
प्रतिक्रया २ : मागील वर्षीही लॉकडाऊनचा मोठा फटका बसला. यंदाही तीच वेळ आली आहे. हातात पैसा नसल्याने घर कसे चालवायचे हा प्रश्न आजही असला तरी मदत कोणतीच मिळालेली नाही.
- मोहन मेकॅनिक, खरबी चौक
...
वाहने पार्किंगमध्येच
वाहनचालकांची प्रतिक्रिया १ : जवळपास दोन महिन्यांपासून ऑटो उभा आहे. या व्यवसायावरच आमचे कुटुंब चालते. ग्राहकही मिळत नाही. लॉकडाऊनमुळे दिवसभर व्यवसाय करू शकत नाही.
- गणेश सोनवणे, ऑटोचालक
...
वाहनचालकाची प्रतिक्रिया २ : मी ट्रकचालक आहे. ठेकेदाराकडे काम करतो. दोन महिन्यांपासून काम बंद असल्याने पूर्ण पगार नाही. ट्रक उभा असल्याने मेंटेनन्सचे काम करावे लागते आहे. त्यामुळे पुन्हा किती दिवस बेकार राहावे लागेल याचा अंदाज नाही.
- रमेश यादव, ट्रकचालक
...