महापालिकेच्या कचरागाडीने एका चिमुकल्याला त्याच्या घरासमोरच चिरडले. यशोधरानगर पोलीस ठाण्याच्या हद्दीत आज दुपारी ११.३0 वाजता हा भीषण अपघात घडला.
महापालिकेच्या वाहनाने चिमुकल्याला चिरडले
यशोधरानगरात अपघात : परिसरात शोककळा
नागपूर : महापालिकेच्या कचरागाडीने एका चिमुकल्याला त्याच्या घरासमोरच चिरडले. यशोधरानगर पोलीस ठाण्याच्या हद्दीत आज दुपारी ११.३0 वाजता हा भीषण अपघात घडला. प्रथमेश महेंद्र गिरी असे मृत चिमुकल्याचे नाव आहे. यशोधरानगरातील गोसावी आखाड्याजवळ त्याचे घर आहे. प्रथमेशचे आईवडील कॅटर्सवाल्याकडे रोजमजुरीचे काम करतात. त्याला दोन मोठय़ा बहिणी आहे. अडीच वर्षाचा प्रथमेश नेहमीप्रमाणे आज दुपारी ११.३0 वाजता आपल्या घरासमोरच्या परिसरात खेळत होता. या भागातील कचरा गोळा करणार्या कनक रिसोर्सेस कंपनीच्या टाटा एस (एमएच ३१/ ३0९९) या वाहनाने त्याला चिरडले. गंभीर जखमी झालेल्या प्रथमेशला एका खासगी खासगी रुग्णालयात नेण्यात आले. तेथे डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केले. या अपघातामुळे परिसरात तीव्र शोककळा पसरली असून, प्रथमेशच्या आईवडील आणि बहिणींना जबरदस्त मानसिक धक्का बसला आहे. यशोधरानगर पोलिसांनी दोषी वाहनचालक विकास युवराज जनबंधू (वय ३0, पंचशीलनगर पाचपावली) याच्याविरुद्ध गुन्हे दाखल करून त्याला अटक केली. (प्रतिनिधी)
Web Title: The driver of the municipal corporation crashed