शहरं
Join us  
Trending Stories
1
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
2
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
3
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
4
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
5
Latest Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीत उमेदवार देणं चुकीचे नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका
6
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
7
महाकुंभातून चर्चेत आलेल्या IIT बाबाने केले लग्न; पत्नी काय करते? जाणून घ्या...
8
IPL 2026: "धोनीनं सांगूनही सीएसकेच्या गोलंदाजांनी त्याच चुका केल्या" आरसीबीविरुद्धच्या पराभवानंतर रायडू भडकला!
9
"IPL मुळे माझं करिअर संपलं, पण..." RCB च्या माजी शिलेदाराचा दावा, २००९ मध्ये तब्बल ७.५ कोटींची लागली होती बोली
10
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
11
...त्यामुळेच अमेरिका-इराण युद्ध संपत नाहीये; चीन-रशियाची पडद्यामागून मदत पडतेय भारी?
12
Travel : खिशात फक्त १० हजार? टेन्शन सोडा! भारतातल्या 'या' ७ सुंदर जागांना द्या स्वस्तात भेट
13
टाटा Punch चा धमाका Nexon ला मागे टाकत बनली देशातील नंबर-१ SUV; बघा टॉप १० कारची यादी
14
Delhi Assembly: दिल्ली विधानसभा परिसरात मोठी खळबळ, VIP गेट तोडून घुसली अज्ञात कार, तपास सुरू!
15
रन आऊटचा वाद अन् अंपायरचीच केली हत्या! क्रिकेट सामन्यातील भांडणाचा रक्तरंजित शेवट
16
फायद्याची गोष्ट! हेल्मेट घातल्याने खरंच केस गळतात का? जाणून घ्या, यामागचं 'ते' सत्य
17
IIT बाबाने गुपचूप लग्न उरकले! जोड्याने सरप्राईज द्यायला गावी गेले, संन्यास सोडून संसारातील 'अध्यात्म' सांगणार?
18
IPL दरम्यान ICC ची मोठी घोषणा! जसप्रीत बुमराह आणि संजू सॅमसन यांच्यात तगडी फाईट
19
Astro Tips: तुमच्या हाताची ५ बोटं आहेत ५ ग्रहांचे प्रतिनिधी; कोणत्या बोटात अंगठी घालणे अधिक लाभदायी?
20
चीनकडून काहीतरी वेगळेच सुरु आहे...! अमेरिका-इराण युद्धाच्या सावटात सोन्या-चांदीची प्रचंड खरेदी; डॉलरला शह देण्यासाठी नवी चाल?
Daily Top 2Weekly Top 5

आरक्षणावरील सीएम शिंदेंचे भाषण 'भाजप आरएसएस'ने दिलेला ड्राफ्ट; नाना पटोलेंचा आरोप

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 20, 2023 13:33 IST

मराठा आरक्षणाच्या मागणीवरुन आरोप-प्रत्यारोप सुरू आहेत.

Maratha Reservation( Marathi News ):  नागपूर- मराठा आरक्षणाची चर्चा काल विधानसभेत झाली. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी पुन्हा एकदा समाजाला आरक्षण देणारच असं आपल्या भाषणात सांगितले. आरक्षणासाठी फेब्रुवारी महिन्यात विशेष अधिवेशन घेणार असल्याची घोषणाही शिंदे यांनी केली. यावर आता राजकीय वर्तुळात आरोप-प्रत्यारोप सुरू आहेत. दरम्यान, आता काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी मुख्यमंत्री शिंदे यांच्यासह भाजपवर आरोप केले. 

विधान परिषदेत दानवेंचे आरोप अन् मंत्री लोढांचा राजीनामा; गोऱ्हेंनी केली मध्यस्थी

"राज्यात सध्या ऐरणीवर असलेल्या विविध समाजाच्या आरक्षणावर जातनिहाय जनगणना हाच पर्याय आहे.  काँग्रेस पक्षाने त्यासंदर्भातील आपली भूमिका सभागृहात मांडली आहे तर राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचा जातनिहाय जनगणनेला विरोध आहे. संघ व भारतीय जनता पक्षाला आरक्षणच संपवायचे आहे म्हणून महाराष्ट्रात वाद चिघवळला जात आहे, असा आरोपही पटोले यांनी केला. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी विधानसभेत आरक्षणप्रश्नी केलेले भाषण हे भाजपा व राष्ट्रीय स्वयंसेवक संघाने दिलेला ड्राफ्ट होता, अशी टीकाही नाना पटोले यांनी केली.

जातनिहाय जनगणना हाच एकमेव पर्याय

नाना पटोले पुढे म्हणाले की, आर्थिक, शैक्षणिक, सामाजिक दुर्बल घटकांना आरक्षण देण्यासाठी जातनिहाय जनगणना हाच पर्याय आहे. शिंदे समितीचे काम फक्त कुणबी प्रणाणपत्र आहे का हे पाहण्याचे काम आहे ते कायमस्वरुपी काम नाही. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे सभागृहात म्हणाले की अनेक जाती आरक्षण मागत आहेत, त्यासाठी आंदोलने सुरू आहेत त्या समाज घटकांना आरक्षण द्यायचे आहे. पण या सर्वांवरचा एकच पर्याय आहे तो म्हणजे जातनिहाय जनगणना. भाजपा सरकारने जातनिहाय जनगणना करावी म्हणजे सर्वांना न्याय मिळेल व महाराष्ट्रात समाज-सामाजात लावलेली आगही थांबेल.

टॅग्स :Winter Session Maharashtraविधानसभा हिवाळी अधिवेशनNana Patoleनाना पटोलेcongressकाँग्रेसBJPभाजपाMaratha Reservationमराठा आरक्षण