शहरं
Join us  
Trending Stories
1
"पंतप्रधानांचा उपदेश की अपयशाचा पुरावा? देश चालवणं आता तुमच्या..." राहुल गांधींचा मोदींवर निशाणा
2
Nepal Plane Fire: नेपाळमध्ये काळ आला होता, पण वेळ आली नव्हती! लँडिंग दरम्यान विमानाच्या टायरला आग; २८९ प्रवाशांचे प्राण थोडक्यात वाचले
3
हार्दिक पांड्या आणि मुंबई इंडियन्समध्ये बिनसलं? इन्स्टावर अनफॉलो केलं, MI च्या गोटात काल रात्री असं काही घडलं
4
महामुंबई: मुंबई महापालिका निधी वाटपातील गटबाजीने भाजपमध्येच अस्वस्थता 
5
Chandranath Rath : मोठी कारवाई! सुवेंदू अधिकारींचे PA चंद्रनाथ यांच्या हत्येप्रकरणी हिस्ट्रीशीटरसह ३ जणांना अटक
6
हंटाव्हायरसचा विळखा! ३ जणांचा मृत्यू झालेल्या क्रूझवरून भारतीय नागरिकांची सुखरूप सुटका; पुढे काय होणार?
7
केवळ पगारवाढीवर अवलंबून आहात का?; 'ही' ३ कारणे आहेत तुम्ही श्रीमंत होण्यातील अडथळा!
8
'असदुद्दीन ओवेसी हे ओसामा बिन लादेनसारखेच, त्यांच्यात काही फरक नाही', मंत्री नितेश राणेंचे विधान
9
Post Office मध्ये ३६ महिन्यांच्या एफडीमध्ये ₹२,००,००० जमा कराल तर किती मिळेल रिटर्न, पाहा कॅलक्युलेशन
10
Adhik Maas 2026: अधिक मसात का लावली जाते वेणीमाधव वात? काय आहे वैशिष्ट्य, महत्त्व आणि लाभ? वाचा
11
मोदींचं आवाहन, पेट्रोलियम मंत्र्यांनी मांडलं गणित, देशात पेट्रोल, डिझेलचे दर भडकणार, किमती एवढ्या रुपयांनी वाढणार
12
रील बनवण्याचे वेड अन् दोन प्रियकरांचे लफडे; भरल्या घरात बेसबॉल बॅटने नव्या बॉयफ्रेंडचा खेळ खलास
13
विजयच्या शपथविधी सोहळ्याकडे पत्नी अन् मुलांनी फिरवली पाठ, लेकाने हटवलं वडिलांचं नाव
14
भारतीय रणरागिणींचा सुवर्णवेध! शांघाय तिरंदाजी विश्वचषकात जिंकलं गोल्ड, यजमान चीनचा उडवला धुव्वा
15
Keralam CM: केरळचे मुख्यमंत्रिपद कोणाला मिळणार, महाराष्ट्राचे प्रभारी चेन्निथलांसह तीन नेत्यांच्या नावांची चर्चा
16
हंटाव्हायरसच्या विळख्यात सापडलेले जहाज अखेर स्पेनमध्ये पोहोचले, युद्धपातळीवर मोहीम
17
'वंदे मातरम्' : मुख्यमंत्री विजय यांच्या चालीने भाजप बॅकफूटवर; बंगालमध्ये भाजपकडून उच्चार नाही
18
SBI च्या गुंतवणूकदारांना ₹४४,७२२ कोटींचं नुकसान, 'या' कंपन्यांमध्ये पैसा गुंतवणारे झाले मालामाल
19
शेतकऱ्याच्या कांद्याला मिळतात ५० पैसे, ग्राहक मोजतो २५ रुपये; उत्पादन खर्चही निघेना, शेतकऱ्यांचा आक्रोश
20
छत्रपती संभाजीनगर: विहीर ढासळून बापासह दोन मुलांचा मृत्यू, पत्नीने फोडला टाहो; सहा तासांनंतर मृतदेह काढले बाहेर
Daily Top 2Weekly Top 5

माैदा येथे डाॅ. बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 15, 2021 04:07 IST

माैदा : स्थानिक नगर पंचायत येथे डाॅ. बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती साजरी करण्यात आली. डाॅ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेला ...

माैदा : स्थानिक नगर पंचायत येथे डाॅ. बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती साजरी करण्यात आली. डाॅ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेला नगराध्यक्ष भारती साेमनाथे यांच्या हस्ते माल्यार्पण करून अभिवादन करण्यात आले. यावेळी नगरसेवक राजू साेमनाथे, अशफाक शेख, सूरज उके, धनराज चाचेरे, राजकुमार वाघमारे, चंद्रभान बावणे आदी उपस्थित हाेते.

....

ग्रामपंचायत आकाेली

कुही : तालुक्यातील आकाेली गट ग्रामपंचायत येथे महामानव, भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती साजरी करण्यात आली. याप्रसंगी सरपंच गजानन धांडे, उपसरपंच रोशन कानतोडे, ग्रामसेवक उदय चांदूरकर, ग्रा.पं. सदस्य पंकज गजभिये, विनायक लांजेवार, कर्मचारी विकास बाभरे, अर्चना लुटे उपस्थित हाेते. मांढळ येथील त्रैलोक्य बुद्धविहार येथे डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेचे पूजन व माल्यार्पण करून अभिवादन करण्यात आले. यावेळी नागरिकांना मास्कचे वाटप करण्यात आले. त्यानंतर गावात सॅनिटायझरची फवारणी करण्यात आली. यावेळी सुधीर पिल्लेवान, पिंटू नागदेवे, प्रदीप नागदेवे आदी कार्यकर्ते उपस्थित होते.

.....

न्यू इंग्लिश हायस्कूल माेहपा

मोहपा : येथील न्यू इंग्लिश हायस्कूलमध्ये डाॅ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त त्यांना अभिवादन करण्यात आले. प्राचार्य प्रकाश आदमने यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या कार्यक्रमात प्रा. विवेक देशमुख, प्रा. तुळशीदास तागडे, गौतम डहाट यांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जीवनकार्यावर भाष्य केले. उदय अंजनकर यांनी संचालन केले. आभार अनिल चिमोटे यांनी मानले.

कार्यक्रमाला वसंत धकीते, प्रा. भूपेश मारोडे, प्रतिभा झाडे, अमिता धवड, प्रा. बाबुराव गुरनुले, प्रा. मीलन वंजारी, कैलास लांजेवार, पंकज काळे, प्रा. विलास आसोले, प्रा. रोशन जुनघरे, हेमराज राकस, गजेंद्र बांबल, निशांत भेंडे, संजय पराची, राजेंद्र दैने उपस्थित होते. गोविंद बावणे, शशिकला घायवट, हिरालाल उपासे, रमेश लाडूकर आदींनी सहकार्य केले.

.....

रक्तदानाने महामानवाला अभिवादन

भिवापूर : काँग्रेस कमिटीच्या वतीने डाॅ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त रक्तदान शिबिराचे आयाेजन केले गेले. या शिबिरात १९ रक्तदात्यांनी रक्तदान करून महामानवास अभिवादन केले. प्रारंभी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यास माल्यार्पण करण्यात आले. यावेळी स्मारक समितीचे अध्यक्ष तुलाराम जनबंधू, माजी नगराध्यक्ष किरण नागरीकर, वंदना जांभुळकर, चंद्रशेखर ढाकुनकर, संतोष देवाळकर, लव जनबंधू, दिलीप गुप्ता, संतोष देवाळकर, चेतन पडोळे, अमित आगलावे, कवडू नागरीकर,‌ स्मारक समितीचे अभिषेक बन्सोड, संजय घोडके, राकेश थूलकर, प्रणय रामटेके, सुगत वाघमारे, अभिषेक जांभूळकर, सुशील राऊत, सचिन काळे, विशाल खंडाळे, युवराज करनुके आदी उपस्थित होते.

....

उपजिल्हा रुग्णालय रामटेक

रामटेक : येथील उपजिल्हा रुग्णालय येथे डाॅ. बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती साधेपणाने साजरी करण्यात आली. वैद्यकीय अधीक्षक डाॅ. प्रकाश उजगरे यांचे हस्ते बाबासाहेबांच्या प्रतिमेला माल्यार्पण करून अभिवादन करण्यात आले. यावेळी माजी नगरसेवक अनिल वाघमारे, राजू कापसे, राजेश जयस्वाल, डडोरे गुरुजी यांच्यासह रुग्णालयातील परिचारिका व कर्मचारी उपस्थित हाेते.