शहरं
Join us  
Trending Stories
1
'आम्ही भारत आणि पाकिस्तानला शस्त्रे टाकण्यास सांगू शकत नाही' : जेडी व्हेन्स
2
Robert Prevost: काल काळा धूर, आज पांढरा बाहेर पडला; अमेरिकेचे रॉबर्ट प्रीव्होस्ट बनले नवे पोप
3
आकाश, MRSAM, Zu-23, L-70 आणि शिल्का...! होती S-400 च्या साथीला; पाकिस्तान सुदर्शन चक्र भेदू शकले नाही...
4
पाकिस्तानसाठी इकडे आड तिकडे विहीर; भारतीय सैन्यानंतर बलोच आर्मीने केले पाकवर हल्ले...
5
India Pakistan War : आयएनएस विक्रांत अ‍ॅक्शनमोडवर! पाकिस्तानच्या कराची बंदरावर हल्ल्याला सुरुवात
6
भारत आणि पाकिस्तानमध्ये युद्धाचा भडका? युद्धकाळात या गोष्टी टाळा, या गोष्टी करा   
7
भारताचे पाकिस्तानवर जोरदार हल्ले; लाहोर, सियालकोट, फैसलाबादमधील संरक्षण प्रणाली उद्ध्वस्त
8
India Pakistan War: पाकिस्तानचे PM शहबाज शरीफ यांच्या घरापासून २० किमी अंतरावर स्फोट
9
'मी माझ्या देशात, मला कशाची भीती...', सामना पाहायला आलेल्या प्रेक्षकाचा व्हिडिओ व्हायरल
10
पाकिस्तानच्या हल्ल्यांना भारताकडून जोरदार प्रत्युत्तर दिले जाणार, एस जयशंकर यांचे मोठे विधान
11
Operation Sindoor Live Updates: पाकिस्तानने दहशतवादाला पाठिंबा देणं थांबवावं, भारताच्या कारवाईदरम्यान अमेरिकेने सुनावले
12
मोदी सरकारचा पाकिस्तानवर 'सोशल मीडिया'वार! भारताकडून ८ हजार एक्स अकाऊंट बंद
13
शेवटी रशियाच कामाला आला, पाकिस्तानचा हमास स्टाईल हल्ला हवेतच थोपविला; S-400 डील झाली नसती तर...
14
JF 17 लढाऊ विमानासह हद्दीत घुसलेला पायलट भारताच्या ताब्यात
15
नियंत्रण रेषेवर गोळीबार, एकमेकांवर क्षेपणास्त्र हल्ले, भारत-पाकिस्तानमध्ये युद्धाला तोंड फुटलंय की...
16
पठाणकोट, राजौरीमध्ये दहशतवाद्यांनी खरंच आत्मघाती हल्ला केला का? भारतीय लष्कराने दिली माहिती
17
पाकिस्तानने अमेरिका, चीनचे नाक कापले! भारताने जैसलमेरमध्ये आणखी एक एफ-१६ पाडले
18
"...तर पाकिस्तान जगाच्या नकाशावरही दिसणार नाही"; एकनाथ शिंदे यांचे सडेतोड वक्तव्य
19
India Pakistan War: 'आताच लाहोर सोडा', अमेरिकेने पाकिस्तानात राहणाऱ्या नागरिकांना सूचना दिल्या
20
लढाऊ विमाने पाकिस्तानवर हल्ल्यासाठी झेपावली; पाकिस्तानी AWACS विमान उडविले, लाहोरकडे कूच

डॉ. आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त कैद्यांसाठी आनंदवार्ता

By admin | Updated: June 4, 2017 17:41 IST

राज्यातील विविध कारागृहांतील कैद्यांना राज्यमाफी (शिक्षेतून सूट) देण्याचा निर्णय गृह विभागाने शनिवारी जाहीर केला.

आॅनलाईन लोकमतयवतमाळ : विविध गुन्ह्यांमध्ये इमानेइतबारे शिक्षा भोगत असलेल्या कैद्यांना राज्य शासनाने खुशखबर दिली आहे. भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या १२५ व्या जयंतीनिमित्त (समता वर्ष) राज्यातील विविध कारागृहांतील कैद्यांना राज्यमाफी (शिक्षेतून सूट) देण्याचा निर्णय गृह विभागाने शनिवारी जाहीर केला. राज्यघटनेचे शिल्पकार डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या १२५ व्या जयंतीनिमित्त शासन चालू वर्ष ‘समता वर्ष’ म्हणून साजरे करीत आहे. यानिमित्त घटनेतील तरतूदीनुसार, कैद्यांना राज्यमाफी मिळावी, अशी मागणी वऱ्हाड (व्हॉल्यूंटरी अ‍ॅक्शन फॉर रिहॅबिलिटेशन अँड डेव्हलपमेंट) संस्थेने शासनाकडे केली होती. बरेच बंदी निर्दोष असूनही शिक्षा भोगत असतात. तर कित्येकांकडून परिस्थितीमुळे अपराध घडतो. अशा लोकांना झालेल्या शिक्षेमुळे तो व्यक्ती व त्याच्या कुटुंबाचेही नुकसान होते. त्यामुळे मानवतेच्या दृष्टीकोनातून कैद्यांना शिक्षेत सूट देण्याची मागणी वऱ्हाड संस्थेने २० फेब्रुवारी २०१६ रोजी मुख्यमंत्र्यांकडे केली होती. त्यानंतर गेले वर्षभर या संस्थेने मागणीबाबत विविध स्तरावर सतत पाठपुरावा केला. अखेर या पाठपुराव्याला यश आले असून, गृहविभागाने कैद्यांसाठी राज्यमाफीचा आदेश शनिवारी जारी केला.यापूर्वी स्वातंत्र्याच्या ५० व्या वर्धापनदिनानिमित्त १९९७ मध्ये राज्य शासनाने अशी राज्यमाफी दिली होती. त्यानंतर जवळपास २० वर्षानंतर पुन्हा राज्यशासनाने कैद्यांना आनंदवार्ता दिली आहे. महाराष्ट्रातील ९ मध्यवर्ती कारागृह, ३१ जिल्हा कारागृह, १३ खुले कारागृह आणि एका खुल्या वसाहतीतील बंद्यांना या निर्णयाचा लाभ मिळणार आहे. हा आदेश १४ एप्रिल २०१६ पासून अमलात येणार आहे. त्यामुळे या दिवशी जामीनावर असलेल्या, पॅरोल, फर्लो रजेवर असलेल्या बंद्यांना राज्यमाफीचा लाभ मिळेल. मात्र कारागृहातून फरार असलेल्या बंद्यांना ही सुट मिळणार नाही. तसेच भारतीय दंड संहितेच्या कलम १२१ ते १३० अंतर्गत (राज्यविरोधी कारवाईचे गुन्हे) शिक्षा भोगत असलेले बंदी, न्यायाधीन बंदी, केंद्रीय कायद्यांर्गत शिक्षा भोगत असलेले बंदी, दिवाणी कायद्यांतर्गत शिक्षा भोगत असलेले बंदी किशोर सुधारालयातील बंदी या सवलतीसाठी पात्र नाहीत. वऱ्हाड संस्था कारागृहातील बंद्यांमध्ये सुधारणा आणि पुनर्वसनाबाबत विदर्भातील विविध कारागृहांमध्ये काम करते. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या १२५ व्या जयंती वर्षानिमित्त बंद्यांना राज्यमाफी मिळण्याबाबत संस्थेने सतत पाठपुरावा केला. - रवींद्र वैद्य, संस्थापक अध्यक्ष, वऱ्हाड संस्थाअशी मिळणार शिक्षेत सूट ३ महिन्यांपर्यंत                                                                       ७ दिवस३ महिन्यांपेक्षा अधिक ते १ वर्षापर्यंत                                        १५ दिवस१ वर्षापेक्षा अधिक ते ५ वर्षांपर्यंत                                           २ महिने५ वर्षांपेक्षा अधिक किंवा जन्मठेप                                           ३ महिने