शहरं
Join us  
Trending Stories
1
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
2
भारताची शान, ब्रह्मोस क्षेपणास्त्राचा जन्मदाता हरपला; ज्येष्ठ शास्त्रज्ञ अलेक्झांडर लिओनोव्ह यांचे निधन
3
प्रवाशांच्या जीवाशी खेळ! वंदे भारतचं जेवण घेताय? अहमदाबाद-मुंबई प्रवासात प्रवाशाच्या ताटात काय आढळलं पाहा
4
"आम्ही देशाला ६ सनातनी मुलं दिली, प्रत्येक हिंदूला 3 मुल तर असायलाच हवीत", पाकिस्तानातून आलेल्या सीमा हैदरचा सल्ला
5
SIR नंतर पश्चिम बंगालमध्ये मतदार यादीतून हटवली ९० लाख मतदारांची नावं
6
होर्मुझचा इतिहास: ज्या जागेसाठी अमेरिका-इराण भिडलेत, तिथले मूळ रहिवासी कोण होते? टोलही होता...
7
अनंत अंबानींची मोठी घोषणा; केरळमधील मंदिरांना ₹१८ कोटींची देणगी, हत्तींच्या देखभालीसाठी करणार मदत
8
Leopard In Dindoshi : दिंडोशीत बिबट्याची दहशत! रहिवाशांमध्ये पसरले भीतीचे वातावरण
9
Vastu Shastra: साध्या वाटणाऱ्या 'या' ७ गोष्टी तुमच्या देवघरातील सकारात्मक ऊर्जा नष्ट करत आहेत का?
10
सोन्याची किंमत ३३६४ रुपयांनी, तर चांदी ८४०१ रुपयांनी झाली स्वस्त; पटापट चेक करा आजचे लेटेस्ट दर
11
Ram Bhajan Kumar : संघर्षगाथा! दगड फोडणारा झाला मोठा अधिकारी; ७ वेळा अपयश, आता नेत्रदीपक भरारी
12
दुसऱ्या पायलटबाबत इराणला माहितीच नव्हती, लीक करणाऱ्याला शोधणार ट्रम्प; रेस्क्यू मोहिमेवर मोठा गौप्यस्फोट
13
कोण आहे ५ कोटींचे बक्षीस असलेला मिसिर बेसरा? ज्याच्या खात्म्यासाठी ३ हजार जवानांचा जंगलाला वेढा
14
३,००० कोटींचे कंत्राट मिळताच डिफेन्स शेअरमध्ये ५%ची उसळी; वर्षात गुंतवणूकदारांना १७७०% परतावा
15
तामिळनाडू, केरळ, आसाम, बंगालमध्ये समीकरणे बदलली, कोण बाजी मारणार? धक्कादायक ओपिनियन पोल
16
Anjali Damania : अजित पवारांच्या अपघातादिवशी भोंदू खरातच्या मोबाईलवर १९ मेसेज; अंजली दमानिया यांचा दावा
17
१ घर, एक कर्मचारी अन् AI ची जादू; १८ लाख गुंतवून तब्बल २८ कोटींची कमाई करतोय 'हा' युवक
18
नव्या कामगार कायद्यानं ग्रॅच्युईटी वाढणार; काय आहे नवा फॉर्म्युला, कोणावर किती होणार परिणाम?
19
"किडनी दे, नाहीतर ३० लाख आण!"; थार गाडी अन् ८ लाख देऊनही छळ; लग्नानंतर उघड झालं पतीचं भयानक गुपित!
20
मध्यपूर्वेतील युद्धाचा परिणाम! एअर इंडियाचा प्रवास महागला; प्रवाशांच्या खिशाला कात्री...
Daily Top 2Weekly Top 5

डॉ. आनंद कौसल्यायन यांनी केली सामाजिक क्रांतीची पायाभरणी : केंद्रीय मंत्री डॉ. वीरेंद्र कुमार

By आनंद डेकाटे | Updated: January 5, 2026 20:36 IST

Nagpur : डॉ. आनंद कौसल्यायन यांनी डाॅ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या ‘बुद्ध आणि त्यांचा धम्म’ या ग्रंथाचा हिंदी अनुवाद करून सामाजिक क्रांतीची पायाभरणी केली, असे प्रतिपादन केंद्रीय सामाजिक न्याय व अधिकारिता मंत्री डॉ. वीरेंद्र कुमार यांनी येथे केले.

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : डॉ. आनंद कौसल्यायन यांनी डाॅ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या ‘बुद्ध आणि त्यांचा धम्म’ या ग्रंथाचा हिंदी अनुवाद करून सामाजिक क्रांतीची पायाभरणी केली, असे प्रतिपादन केंद्रीय सामाजिक न्याय व अधिकारिता मंत्री डॉ. वीरेंद्र कुमार यांनी येथे केले.बौद्ध प्रशिक्षण संस्थेच्या वतीने महान बौद्ध विद्वान डॉ. भदंत आनंद कौसल्यायन यांच्या १२१ व्या जयंतीनिमित्त नवनिर्मित ‘महाचैत्य’ स्तूप आणि २८ बुद्ध मूर्तींचा लोकार्पण सोहळा सोमवारी कामठी रोडवरील खैरी बुद्धभूमी महाविहार येथे पार पडला. या समारंभाचे उद्घाटक म्हणून ते बोलत होते. अध्यक्षस्थानी पत्ता मेत्ता संघाचे अध्यक्ष भदंत संघरत्न मानके होते.

प्रमुख पाहुणे म्हणून खासदार शामकुमार बर्वे, आ. डाॅ. नितीन राऊत, आमदार संजय मेश्राम, माजी राज्यमंत्री ॲड.सुलेखा कुंभारे, माजी नगराध्यक्ष माया चवरे, भदंत पी. सिवली थेरो, भदंत मैत्री महाथेरो (नेपाळ), भदंत यश (श्रीलंका), आवाज इंडिया टीव्हीचे संचालक अमन कांबळे, श्रीलंकन चित्रपट दिग्दर्शक रोडनी वितानपतिराना, बुद्धभूमी महाविहार संस्थेचे अध्यक्ष भदंत शिवणी बोधानंद थेरो आणि सचिव भदंत प्रज्ञाज्योती थेरो, काशिनाथ मेश्राम, विमल आळे, उज्ज्वल उके, भदंत अश्वघोष थेरो, भदंत प्रियदर्शी, भदंत धम्मधर, भदंत शीलरक्षित उपस्थित होते.

डॉ. वीरेंद्र कुमार म्हणाले, केंद्र सरकार बौद्ध वारसा जपण्यासाठी कटिबद्ध आहे. थायलंड, व्हिएतनाम आणि मंगोलिया येथे भगवान बुद्धांच्या पवित्र अवशेषांच्या दर्शनासाठी उसळलेली गर्दी बुद्धांच्या विचारांची जागतिक शक्ती दर्शवत असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.ॲड. सुलेखा कुंभारे यांनी बौद्ध प्रशिक्षण संस्थेने १०० कोटी रुपयांचा भव्य विकास आराखडा (डेव्हलपमेंट प्लॅन) तयार करावा, असे आवाहन केले.

डॉ. नितीन राऊत यांनी आपल्या भाषणात बुद्धभूमीचा जागतिक पातळीवर विकासासाठी केंद्रीय मंत्र्यांकडे विशेष निधीची मागणी केली.संचालन भदंत नाग दीपंकर यांनी केले. तर डाॅ. चिंचाळ मेत्तानंद यांनी आभार मानले.

मेट्रो स्टेशनला ‘बुद्धभूमी महाविहार’ नाव देण्याची मागणी

दरम्यान महाविहारजवळील स्थानिक मेट्रो स्टेशनला बुद्धभूमी महाविहार असे नाव देण्याची मागणी यावेळी विविध वक्त्यांकडून करण्यात आली. यावेळी डॉ. वीरेंद्र कुमार यांनी ही मागणी मान्य करीत यासंदर्भात तात्काळ रेल्वे मंत्रालयाशी संपर्क साधून आवश्यक कार्यवाही केली जाईल, असे आश्वासन दिले.

English
हिंदी सारांश
Web Title : Dr. Anand Kausalayan Laid Foundation for Social Revolution: Union Minister

Web Summary : Dr. Anand Kausalayan's Hindi translation of 'Buddha and His Dhamma' laid the foundation for social revolution, said Union Minister Dr. Virendra Kumar at a ceremony. He pledged commitment to preserving Buddhist heritage and promised action on naming a metro station after Buddhbhumi Mahavihar.
टॅग्स :nagpurनागपूरDiksha Bhoomi Nagpurदीक्षाभूमी