शहरं
Join us  
Trending Stories
1
३ कोटी २० लाख सरकारी निधी हडपण्याचा डाव उघड; आमदार प्रसाद लाड यांचा खळबळजनक आरोप
2
कोलकाता: 'तो' बलात्कार होता तर आरोपीच्या अंगावर 'लव्ह बाईट्स' कसे? वकिलाचा धक्कादायक सवाल
3
'धनुष्य बाण' कुणाचा, उद्धवसेना की शिंदेसेना? १६ जुलैला 'सुप्रीम' सुनावणी
4
सोन्याच्या दरात मोठी घसरण, चांदीची चमकही झाली कमी; खरेदीपूर्वी पाहा सोन्या-चांदीचे नवी किंमत
5
Viral Video : हत्तीचं पिल्लू इवल्याशा बेडकाला घाबरलं; क्यूटनेस व्हिडीओनं नेटकऱ्यांचं मन जिंकलं!
6
IND W vs ENG: स्मृती मानधना आणि शेफाली वर्मा टी२० क्रिकेटमधील सुपरहिट जोडी, रचला नवा इतिहास!
7
'एक दिवसाचा पंतप्रधान'! आशिया खंडातील देशात उद्भवला बाका प्रसंग, 'नायक' सिनेमा आठवेल...
8
"पप्पा, मला पावसात खेळायचंय"; १० वर्षांच्या लेकाचा हट्ट अन् हैवान झाला बाप, घेतला जीव
9
"सर्वाधिक पोलीसमृत्यू हृदयविकाराच्या झटक्याने"; विरोधी पक्षनेते दानवेंनी मांडली आकडेवारी
10
'मीच मुख्यमंत्री राहणार', सिद्धारमय्या यांची स्पष्टोक्ती; डीके शिवकुमार म्हणाले...
11
स्वप्नांना पंख मिळाले! कठोर परिश्रमाने घातली आकाशाला गवसणी; आता नौदलात होणार अधिकारी
12
भारताचे पहिले अंतराळवीर राकेश शर्मा राहतात प्रसिद्धीपासून दूर, ते सध्या आहेत कुठे? करतात काय? जाणून घ्या
13
ENG vs IND : टीम इंडियाचा बचावात्मक पवित्रा? प्लेइंग इलेव्हनमध्ये या तिघांची एन्ट्री
14
पावसाचं थैमान, मृत्यूचे तांडव! रस्ते खचले, घरं पडली; 51 जणांचा मृत्यू, २२ अजूनही बेपत्ता
15
शाळेपासून होतं प्रेम, भेटण्यासाठी गेस्ट हाऊसमध्ये बोलावलं, शरीरसंबंध ठेवले आणि अखेर तिच्यावर सपासप वार केले  
16
Viral Video : ५ वर्षांची लेक समुद्रात पडली; वाचवण्यासाठी पित्याने थेट पाण्यात उडी घेतली! पुढे काय झाले बघाच... 
17
Share Market Update: शेअर बाजारात मोठी घसरण; Sensex ४०० अंकांपेक्षा अधिक आपटला, निफ्टीही घसरला
18
अनिल अंबानींच्या कंपनीचं लोन अकाऊंट ठरणार फ्रॉड; देशातील सर्वात मोठ्या बँकेची कारवाई
19
गुरुवारी गुरुपौर्णिमा: गुरुलीलामृत पारायण सप्ताह करा; स्वामींची कायम कृपा, कालातीत अखंड लाभ
20
लोकसभा, विधानसभा झाली आतातरी निवडणूक चिन्हावर सुनावणी घ्या...; उद्धव ठाकरेंना का हवाय धनुष्यबाण...

डॉ. आंबेडकर जन्मशताब्दी स्मारकाला मिळणार गती

By admin | Updated: December 21, 2014 00:16 IST

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी नागपूर व विदर्भातील रखडलेल्या प्रकल्पांना गती देण्याची धडक मोहीम सुरू केली आहे. यातच शुक्रवारी त्यांनी घेतलेल्या नागपुरातील रस्त्यांच्या आढावा बैठकीत

लीज नुतनीकरणाचा अडथळा दूर होणार नागपूर : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी नागपूर व विदर्भातील रखडलेल्या प्रकल्पांना गती देण्याची धडक मोहीम सुरू केली आहे. यातच शुक्रवारी त्यांनी घेतलेल्या नागपुरातील रस्त्यांच्या आढावा बैठकीत पटवर्धन मैदानावरील जागेच्या लीज नूतनीकरण संबंधातील प्रस्ताव तातडीने पाठविण्यात यावा, अशा सूचना दिल्या. धंतोली येथील पटवर्धन मैदानावर डॉ. बाबासाहेब आंबेडकर जन्मशताब्दी स्मारक प्रस्तावित आहे. परंतु जागा लीज नूतनीकरणामुळे या स्मारकाचे काम रखडले होते. मुख्यमंत्र्यांनी याबाबत पुढाकार घेतल्याने आता स्मारकाच्या कामाला खऱ्या अर्थाने गती मिळेल, अशी शक्यता निर्माण झाली आहे. याबाबत लोकमतने वारंवार वृत्त प्रकाशित करीत प्रशासन व शासनाचे लक्ष वेधले होते, हे विशेष. महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या जन्मशताब्दी वर्षानिमित्त १९९२ साली महापालिकेने स्वत:हून शहरात डॉ. बाबासाहेब आंबेडकर जन्मशताब्दी स्मारक उभारण्याची घोषणा केली होती. महापालिका सभागृहात त्याला एकमुखाने मंजुरीसुद्धा प्रदान केली होती. शहरातील मध्यवर्ती ठिकाणी भव्य असे स्मारक होणार होते. मनपाने त्यासाठी एक समिती स्थापन केली होती. त्या समितीने पटवर्धन मैदानाची जागा स्मारकासाठी निश्चित केली. एक कोटी रुपयांची तरतूदसुद्धा महापालिकेने केली होती. परंतु त्यानंतर त्यावर काहीच काम झाले नाही. तब्बल दहा वर्ष ती फाईल धूळखात पडली होती. अधूनमधून काही आंबेडकरी संघटनांकडून स्मारकाचा मुद्दा रेटला जात होता. मात्र त्यात फारसा जोर नसल्याने मनपा प्रशासनानेही त्याकडे कधी लक्ष दिले नाही. २००२ साली महापालिकेच्या पहिल्याच सभेत नव्यानेच निवडून आलेल्या बहुजन समाज पार्टीच्या सदस्यांनी जन्मशताब्दी स्मारकाचा मुद्दा उपस्थित केला. मनपाचे पक्षनेते असलेले राहुल तेलंग यांनी याबाबत आक्रमक भूमिका घेत कामकाज बंद पाडले. तेव्हा महापौर विकास ठाकरे आणि मनपा आयुक्त टी. चंद्रशेखर होते. फाईल शोधण्यात आली. तीन तासानंतर स्मारकावर चर्चा झाली. पुन्हा एक समिती स्थापन झाली. टी. चंद्रशेखर यांनी यासंदर्भात पुढाकार घेतला. स्मारकाबाबतचे डिझाईन तयार करून घेण्यात आले. दरम्यान पटवर्धन मैदानावरील लीज संपली. त्याचे नूतनीकरण करण्यासंदर्भात महापालिकेने सरकारकडे अर्ज केला. त्यासंबंधी आवश्यक रक्कमही भरली. परंतु कुठे माशी शिंकली माहीत नाही. लीज नूतनीकरणाचे भिजतघोंगडे कायम होते. यानंतर आंबेडकरी संघटनांमध्ये सुद्धा नाराजी पसरली. रिपब्लिकन मुव्हमेंट, रिपब्लिकन पँथर, समता सैनिक दल, रिपाइं, रिपब्लिकन आघाडी, पीपल्स डेमोक्रेटिक मुव्हमेंट आदींसह विविध आंबेडकरी संघटनांनी वारंवार आंदोलने केली. आजही या विषयावर आंदोलने सुरूआहेत. दरवर्षी हिवाळी अधिवेशनात यावर आवाज उठवला जातो. तत्कालीन मुख्यमंत्री दिवंगत विलासराव देशमुख यांनी चिटणीस पार्क मैदानावर झालेल्या जाहीर सभेत सात दिवसांच्या आत हा प्रश्न निकाली लावण्याचे आश्वासन दिले. मात्र त्यानंतरही काहीच झाले नाही. प्रत्येक मुख्यमंत्र्यांनी केवळ आश्वासनच दिले मात्र कारवाई झाली नाही. दरम्यान आंबेडकरी संघटनांच्यावतीने सातत्याने आंदोलने सुरू आहेत. परंतु त्याला फारसे यश आलेले नाही. पण मुख्यमंत्री आपल्या नागपूरचेच असल्याने आणि त्यांनी यासंदर्भात पुढाकार घेतला असल्याने या स्मारकाच्या कामाला गती मिळण्याची शक्यता बळावली आहे. (प्रतिनिधी)असे राहील स्मारक तत्कालीन मनपा आयुक्त टी. चंद्रशेखर यांनी तयार केलेल्या स्मारकाच्या डिझाईननुसार तीन हजार लोक बसू शकतील, असे भव्य वातानुकूलित भव्य सभागृह, डॉ. बाबासाहेब आंबेडकरांसह सर्व महापुरुषांची ग्रंथसंपदा, त्यांच्यावरील संदर्भ ग्रंथ असलेले विशाल ग्रंथालय आणि विविध विषयांवर संशोधन करणाऱ्या विद्यार्थी संशोधकांसाठी स्वतंत्र असे संशोधनालय आदींची व्यवस्था करण्याचे नियोजित होते. स्मारकाच्या या संपूर्ण प्रकल्पावर एकूण २५ कोटी रुपयांचा खर्च अपेक्षित होता.