शहरं
Join us  
Trending Stories
1
काँग्रेसच्या झेंड्याला ठाकरेंच्या मताची काठी; तब्बल दहा वर्षानंतर लोकसभेसाठी काँग्रेसला मुंबईत खाते उघडण्याची संधी
2
पैशांच्या अवैध वाहतुकीवर तिसरा डोळा; निवडणूक आयोगाचे मुंबई आणि परिसरातील रेल्वे स्थानकांवर विशेष लक्ष
3
भर समुद्रात पाकच्या बोटीवरून ६०० कोटींचे ड्रग्ज जप्त; भारतीय तटरक्षक दल, एटीएस व एनसीबीची मोठी कारवाई
4
निवडणुकीत जातीपातीच्या जाणिवा टोकदार ; एकाच जातीचे उमेदवार; तिथे पाहतात पोटजात
5
ठाण्यातील ‘त्या’ सव्वातीन लाख मतांचे मालक कोण? अजित की शरद पवार?
6
देवेगौडांचा नातू ‘सेक्स स्कँडल’मध्ये; विदेशात पलायन? एसआयटी चौकशी
7
साताऱ्यातील प्रचारात मुंबई बाजार समितीतील भ्रष्टाचाराचा मुद्दा ‘हॉट’ ; उदयनराजे भोसले आणि शशिकांत शिंदे यांच्यात थेट लढत
8
1 मे ध्वजारोहण : उमेदवार मंत्री वगळले, पण नातलग ?
9
राष्ट्रीय स्वयंसेवक संघ नेहमीच आरक्षणाचा समर्थक राहिला : मोहन भागवत
10
मोटारीला चपलांचा हार आणि आरोप-प्रत्यारोपांचे प्रहार; जरांगे पाटलांनी केला आरोप
11
यापूर्वीही आरक्षणाला संघाचा विरोध : राहुल गांधी
12
तरुणाई का संतापली? निराश तरुण मतदानाकडेच पाठ फिरवताना दिसताहेत
13
निवडणूक आहे, जिभेला लगाम घाला !
14
दुबईत साकारतेय जगातील सर्वात मोठे विमानतळ; प्रथमच नवीन विमान वाहतूक तंत्रज्ञानाचा होणार वापर
15
त्यांच्या कारकिर्दीत ‘ते’ म्हणतील ते सगळं केलं, आता भावनिक व्हायच नाही; अजित पवारांचा वार
16
IPL 2024 GT vs RCB: RCB चा 'विराट' शो! विल जॅक्सचे ४१ चेंडूत शतक; ४ ओव्हर राखून विजय
17
बारामती, शिरुरमध्ये पोलिसी बळाचा वापर, मतदारांना धमक्या; संजय राऊतांचा गंभीर आरोप
18
"मुस्लीम लोक सर्वाधिक कंडोम वापरतात..."; ओवेसींनी दिला केंद्राच्या डेटाचा हवाला, PM मोदींवर पलटवार
19
बीडमध्ये पंकजा मुंडे, मनोज जरांगे एकाच व्यासपीठावर; दोघांचाही एकमेकांना नमस्कार
20
BANW vs INDW: भारताची विजयी सलामी! बांगलादेश त्यांच्याच घरात ढेर; पाहुण्यांची सांघिक खेळी

नागपुरात कोरोनाच्या रुग्णांत दुपटीने वाढ; ११ दिवसानंतर मृत्यूची नोंद

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 28, 2021 10:52 AM

Nagpur News कोरोनाची दैनंदिन रुग्णसंख्या दिवसेंदिवस कमी होत असताना मंगळवारी दुपटीने वाढ होऊन १४ वर पोहचली. रुग्णाच्या अचानक वाढीने आरोग्य यंत्रणेत चिंता वाढली आहे.

ठळक मुद्दे पावसाचा जोर वाढल्याने रुग्णांची संख्या वाढण्याची शक्यता वर्तवली जात आहे. यामुळे कोरोनाचा नियमांचे पालन करण्याचे आवाहन डॉक्टरांनी केले आहे.

 लोकमत न्यूज नेटवर्क 

नागपूर : कोरोनाची दैनंदिन रुग्णसंख्या दिवसेंदिवस कमी होत असताना मंगळवारी दुपटीने वाढ होऊन १४ वर पोहचली. रुग्णाच्या अचानक वाढीने आरोग्य यंत्रणेत चिंता वाढली आहे. यातच ११ दिवसानंतर आज पहिल्यांदाच मृत्यूचीही नोंद झाली. रुग्णांची एकूण संख्या ४,९२,८३६ तर मृतांची संख्या १०,११६ झाली.

नागपूर जिल्ह्यात मंगळवारी ५,८२१ चाचण्या झाल्या. पॉझिटिव्हीटीचा दर ०.२४ टक्के होता. शहरात ४,७०३ चाचण्यांमधून ६ तर, ग्रामीणमध्ये १,११८ चाचण्यांमधून ८ कोरोनाबाधित आढळून आले. १६ जुलैपर्यंत शहर व ग्रामीणमध्ये एकाही मृत्यूची नोंद नव्हती. आज पहिल्यांदाच शहरातील एका रुग्णाचा मृत्यू झाला. त्यानुसार आतापर्यंत ५,८९२ मृत्यू झाले आहेत. तर, ३,३९,९४८ रुग्ण आढळून आले आहेत. ग्रामीणमध्ये २,६०३ मृत्यू व १,४६,०८३ रुग्णांची नोंद झाली आहे.

-कोरोनाचे २२२ सक्रिय रुग्ण

कोरोनाचे सध्या शहरात १६८, ग्रामीणमध्ये ४९ तर जिल्हा बाहेर ५ असे एकूण २२२ सक्रिय रुग्ण आहेत. यातील १६८ रुग्ण होम आयसोलेशनमध्ये तर ५४ रुग्ण विविध शासकीयसह खासगी हॉस्पिटलमध्ये उपचार घेत आहेत. आज १५ रुग्ण बरे झाले. कोरोनावर मात करणाºया रुग्णांची संख्या ४,८२,४९८ झाली आहे.

 

टॅग्स :Coronavirus in Maharashtraमहाराष्ट्रात कोरोना व्हायरस