रेड सिग्नल ओलांडून पुढे जाऊ नका : लोकोपायलटसाठी कार्यशाळा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 22, 2019 12:26 AM2019-11-22T00:26:11+5:302019-11-22T00:27:24+5:30

रेल्वेगाडीच्या संचालनात लोकोपायलटची महत्त्वाची भूमिका असते. त्यामुळे लोकोपायलटने रेड सिग्नल सुरू असताना गाडी पुढे नेऊ नये, असे आवाहन मान्यवरांनी केले.

Don't Pass Through the Red Signal: Workshop for Locopilot | रेड सिग्नल ओलांडून पुढे जाऊ नका : लोकोपायलटसाठी कार्यशाळा

रेड सिग्नल ओलांडून पुढे जाऊ नका : लोकोपायलटसाठी कार्यशाळा

Next
ठळक मुद्देसुरक्षितरीत्या रेल्वेगाडी चालविण्याचे आवाहन

लोकमत  न्यूज  नेटवर्क
नागपूर : रेल्वेगाडीच्या संचालनात लोकोपायलटची महत्त्वाची भूमिका असते. त्यामुळे लोकोपायलटने रेड सिग्नल सुरू असताना गाडी पुढे नेऊ नये, असे आवाहन मान्यवरांनी केले.
मध्य रेल्वेच्यानागपूर विभागाचे विभागीय रेल्वे व्यवस्थापक सोमेश कुमार यांच्या निर्देशानुसार लोकोपायलट लॉबीत लोकोपायलटसाठी कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले. कार्यशाळेत ७० नवनियुक्त सहायक लोकोपायलट, ५० लोकोपायलट उपस्थित होते. रेल्वेच्या सुरक्षित संचालनासाठी रेड सिग्नल ओलांडु नये, वैयक्तिक सुरक्षेकडे लक्ष द्यावे आदीबाबत मार्गदर्शन करण्यात आले. विभागीय वरिष्ठ विद्युत अभियंता महेश कुमार यांनी कार्यशाळेत मार्गदर्शन केले. सुरक्षितरीत्या रेल्वे चालवून शून्य टक्के अपघाताचे ध्येय गाठण्याचे आवाहन त्यांनी केले. अप्पर विभागीय रेल्वे व्यवस्थापक एन. के. भंडारी यांनी यावेळी आपले अनुभव सांगून सुरक्षित रेल्वे संचालनाचे गुण शिकविले. कार्यशाळेत वरिष्ठ विभागीय सुरक्षा अधिकारी ए. बी. दाभाडे, सहायक विभागीय यांत्रिक अभियंता कमलेश कुमार, गुलाब सिंह यादव, ए. के. देशमुख, के. दिवाकर यांनी सुरक्षेच्या नियमांची माहिती देऊन जुन्या अपघातांपासून धडा घेऊन चुकांची दुरुस्ती करण्याचे तसेच वैयक्तिक सुरक्षेकडे लक्ष देण्याचे आवाहन केले. संचालन मुख्य लोको निरीक्षक सुशील तिवारी यांनी केले. कार्यशाळेला रेल्वेचे अधिकारी, लोको पायलट मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Web Title: Don't Pass Through the Red Signal: Workshop for Locopilot

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.