नागपुरात डॉक्टरचे क्लिनिक पेटविले
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 29, 2019 19:44 IST2019-11-29T19:43:13+5:302019-11-29T19:44:55+5:30
क्लिनिकमध्ये पेट्रोल टाकून आग लावून देण्याच्या प्रकरणात नंदनवन पोलिसांनी अखेर नऊ दिवसानंतर गुन्हा दाखल केला. २० नोव्हेंबरच्या पहाटे नंदनवनमध्ये ही घटना घडली होती.

नागपुरात डॉक्टरचे क्लिनिक पेटविले
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : क्लिनिकमध्ये पेट्रोल टाकून आग लावून देण्याच्या प्रकरणात नंदनवन पोलिसांनी अखेर नऊ दिवसानंतर गुन्हा दाखल केला. २० नोव्हेंबरच्या पहाटे नंदनवनमध्ये ही घटना घडली होती.
डॉ. जीवन विठोबाजी वाघाये (वय ५१, रा. खानखोजेनगर काली माता मंदिरजवळ) यांचे रमना मारोती परिसरात क्लिनिक आहे. २० नोव्हेंबरच्या पहाटे त्यांच्या क्लिनिकला आग लागली होती. त्याची माहितीवजा तक्रार डॉ. वाघाये यांनी नंदनवन पोलिसांकडे दिली होती. पोलिसांनी या प्रकरणाची चौकशी करताना सीसीटीव्ही फुटेज मिळवले. त्यात २० नोव्हेंबरच्या पहाटे ३. ४० वाजताच्या सुमारास दुचाकीवरून दोन आरोपी आले. त्यांनी क्लिनिकच्या दारातून पेट्रोल टाकले आणि आग लावून दिल्यानंतर पळ काढल्याचे फुटेजमध्ये दिसून आले. या आगीत डॉ. वाघाये यांच्या क्लिनिकचे मोठे नुकसान झाले होते. ही आग लागली नाही तर लावली गेल्याचे चौकशीत स्पष्ट झाल्यामुळे नंदनवन पोलिसांनी गुरुवारी या प्रकरणी गुन्हा दाखल केला. आग लावणाऱ्या त्या दोघांची पोलीस चौकशी करीत आहेत.