डॉक्टर तुम्हीसुद्धा... सायबर गुन्हेगारांच्या जाळ्यात अडकले कसे ?

By योगेश पांडे | Updated: June 30, 2025 14:50 IST2025-06-30T14:49:38+5:302025-06-30T14:50:09+5:30

Nagpur : उच्च शिक्षण आणि व्यावहारिक विवेकबुद्धी यांचा परस्पर संबंध कमी होत चालला आहे की काय?

Doctor, how did you get caught in the web of cybercriminals? | डॉक्टर तुम्हीसुद्धा... सायबर गुन्हेगारांच्या जाळ्यात अडकले कसे ?

Doctor, how did you get caught in the web of cybercriminals?

योगेश पांडे
नागपूर :
सायबर गुन्हेगारांकडून केवळ मध्यमवर्गीयच नव्हे तर अगदी उच्चशिक्षितांनादेखील गंडा घालण्यात येत असल्याचे अनेक प्रकार दिसून येतात. मात्र, आता डॉक्टर मंडळी त्यांचे सॉफ्ट टार्गेट झाल्याचे आणखी एक प्रकरण समोर आले आहे.


'अॅडव्हान्स पेमेंट'च्या नावाखाली रामदास पेठ येथील डॉक्टर दाम्पत्याला ४ लाखांचा गंडा घातल्याची घटना ताजीच आहे. सोबतच एका डॉक्टरला तर गुंतवणुकीच्या बहाण्याने अलगदपणे सायबर गुन्हेगार 'मीना' आणि 'रिया' या तथाकथित तरुणींनी जाळ्यात ओढले व थोडेथोडके नव्हे तर तब्बल साडेचौतीस लाख रुपये उडवले. वैद्यकीय तज्ज्ञ वेगवेगळ्या आजारांवर औषधे देत रुग्णांना बरे करतात. मात्र, सायबर गुन्हेगारांच्या या 'व्हायरस'चे तेच शिकार होत असल्याने उच्च शिक्षण आणि व्यावहारिक विवेकबुद्धी यांचा परस्पर संबंध कमी होत चालला आहे की काय? असा सवाल उपस्थित होत आहे.


नागपुरातील एका वैद्यकीय तज्ज्ञासोबत मागील महिन्यात हा प्रकार घडला. संबंधित डॉक्टरचे मध्य प्रदेशमध्ये मोठे सेटअप असून, नागपुरातदेखील ते राहतात. मध्य प्रदेशातील सेंटरमधून चांगली कमाई झाल्याने डॉक्टरला ते पैसे गुंतवायचे होते व त्यांनी गूगलमधून त्यासाठी 'इन्व्हेस्टमेंट प्लॅटफॉर्म' पाहण्यास सुरुवात केली. इथेच त्यांची सर्वात मोठी चूक झाली.


सातत्याने सायबर गुन्ह्यांच्या घटना समोर येत असतानादेखील डॉक्टरने अनोळखी संकेतस्थळावर स्वतःची माहिती सबमिट केली. दोनच दिवसात मीना नावाच्या एका तथाकथिक गुंतवणूक तज्ज्ञ महिलेचा त्यांना फोन आला आणि डॉक्टरचे साडेचौतीस लाख रुपये त्यांच्या खिशातून जाण्याची प्रक्रिया आपसूकच सुरू झाली. 'रेटफिन इन्व्हेस्टमेन्ट प्रा. लि.या कंपनीचे नाव सांगत मीना व रिया नावाच्या तरुणींनी डॉक्टरला गुंतवणुकीच्या विविध स्कीम्स सांगण्यास सुरुवात केली. त्यानंतर बनावट आयपीओ अलॉटमेंटच्या नावाने डॉक्टरला साडेचौतीस लाख रुपये गुंतवायला लावले.


आश्चर्याची बाब म्हणजे एकदा तर आरोपींनी नऊ लाखांच्या ऐवजी २४ लाखांच्या आयपीओ शेअर्सचे अलॉटमेंट झाले असून, जास्तीचे पैसे भरावे लागतील, अशी बतावणी केली.

Web Title: Doctor, how did you get caught in the web of cybercriminals?

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.