शहरं
Join us  
Trending Stories
1
कोलकाता नाईट रायडर्सचा सहज विजय; दिल्ली कॅपिटल्सचे Play Off चे स्वप्न अधांतरी
2
"सुप्रिया बाहेरची असण्याचं कारण नाही, मी बारामतीत ज्या घरात राहतो ते तिचंच"; शरद पवारांनी स्पष्टच सांगितलं
3
भाजप नेते दुष्यंत गौतम यांच्या कारला अपघात, मणक्याला दुखापत
4
जय शाह T20 WC साठीचा भारतीय संघ फायनल करणार, अजित आगरकर लिस्ट घेऊन अहमदाबादला 
5
मुंबई उत्तर पूर्वमध्ये वादाची ठिणगी; मिहीर कोटेचा यांच्या प्रचार रॅलीवर दगडफेक केल्याचा आरोप, पोलिसांत तक्रार
6
अस्वस्थ झालेल्या सत्ताधाऱ्यांकडून वैयक्तिक आरोप; सामान्य मतदारांना EVM वर शंका- शरद पवार
7
स्वप्न पूर्ण न झालेले आत्मे देशाला अस्थिर करत आहेत; PM मोदींचा नाव न घेता पवारांवर निशाणा
8
पुण्यात महायुतीच्या उमेदवारांसाठी मोदींची सभा; मंचावर दिसले मनसे नेते अमित ठाकरे
9
रिषभ पंतच्या निर्णयाने दिल्लीच्या पायावर धोंडा! पण, कुलदीप यादवने चोपल्या सर्वाधिक धावा
10
"भाजप भयभीत, UCC मुळे हिंदूंना…"; ममता बॅनर्जी यांचा केंद्र सरकारवर निशाणा
11
वातावरण विरोधात जातंय हे पाहून देवेंद्र फडणवीसांनी...; जयंत पाटलांचा गंभीर आरोप
12
187 रुपयांच्या आईस्क्रीमसाठी Swiggy ला मोजावे लागले 5 हजार रुपये; जाणून घ्या काय आहे प्रकरण?
13
ओला कॅब्सचे सीईओ हेमंत बक्षी यांचा राजीनामा; 10 टक्के कर्मचाऱ्यांना काढून टाकण्याची तयारी
14
गुजरातमध्ये सर्वात श्रीमंत उमेदवार कोण? एकाकडे तर केवळ २ हजार रूपयांची संपत्ती
15
सुरेश रैनाने T20 World Cup 2024 साठी निवडला परफेक्ट संघ; गोलंदाजीत अनपेक्षित निवड
16
"मी जिवंत असेपर्यंत काँग्रेसला..."; पंतप्रधान मोदींनी साताऱ्याच्या सभेत विरोधकांना भरला सज्जड दम
17
'रामायण' साठी ही डिझायनर जोडी फायनल, संजय लीला भन्साळींशी आहे कनेक्शन
18
उद्धव ठाकरेंना शरद पवारांनी राजीनामा द्यायला लावला, राऊतांचा पाठिंबा होता; शिंदे गटाचा दावा
19
T20 World Cup 2024 साठी टीम इंडियाचा उपकर्णधार कोण? मोठी अपडेट समोर
20
VIDEO : 'लेव्हल सबके निकलेंगे' मधील व्हायरल मुलगी खरंच कोट्यधीश झाली का?

डॉक्टरकडून रुग्णाला मारहाण : मेयोतील प्रकरण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 09, 2019 11:39 PM

इंदिरा गांधी शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयातील (मेयो) क्ष-किरण विभागातील एका व्हिडीओने शनिवारी खळबळ उडाली. अस्थिव्यंगोपचार विभागातील रुग्णाला एक कनिष्ठ डॉक्टर एक्स-रे काढताना चक्क मारहाण करीत असल्याचे समोर आले.

लोकमत  न्यूज  नेटवर्कनागपूर : इंदिरा गांधी शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयातील (मेयो) क्ष-किरण विभागातील एका व्हिडीओने शनिवारी खळबळ उडाली. अस्थिव्यंगोपचार विभागातील रुग्णाला एक कनिष्ठ डॉक्टर एक्स-रे काढताना चक्क मारहाण करीत असल्याचे समोर आले.प्राप्त माहितीनुसार, सतीश नावाच्या रुग्णाचा मांडीचे हाड तुटल्याने नातेवाईकांनी मेयोच्या अस्थिव्यंगोपचार विभागात दाखल केले. शस्त्रक्रियेसाठी वरिष्ठ डॉक्टरांनी आपल्या कनिष्ठ डॉक्टरला एक्स-रे करण्याचा सूचना दिल्या. रुग्णाचा एक्स-रे काढताना रुग्णाला असह्य वेदना होत होत्या. यामुळे योग्य पद्धतीचा एक्स-रे येत नव्हता. यामुळे कनिष्ठ डॉक्टराने रुग्णाचे दोन्ही पाय पकडले. त्याची ओढाताण केली. रुग्ण वारंवार पाय वर करीत असल्याने रागाच्याभरात डॉक्टरने त्याला मारहाण केली. रुग्णाच्या एका नातेवाईकाने आपल्या मोबाईलमध्ये या घटनेचे चित्रीकरण केले. वरिष्ठ डॉक्टरांचे रुग्णांकडे लक्ष नसल्याने असे प्रकार होत असल्याचे नातेवाईकांचे म्हणणे आहे. संबंधित डॉक्टराचे भविष्य धोक्यात येऊ नये म्हणून नातेवाईक तक्रार करण्यास तयार नाहीत, परंतु हा प्रकार थांबावा म्हणून व्हिडीओ व्हायरल केल्याचे त्यांनी सांगितले.मेयोच्याच एका डॉक्टराने नाव न लिहिण्याच्या अटीवर सांगितले, मेयोच्या अस्थिव्यंगापेचार विभागात रुग्णांचा भार वाढत आहे. अशात कोणी रुग्ण दारू पिऊन आल्यास आणि त्यांच्याकडून उपचाराला प्रतिसाद मिळत नसल्यास डॉक्टरांचा संताप अनावर होतो. या घटनेतही असेच काही झाले असावे, असा शंका त्यांनी व्यक्त केली.या प्रकरणाविषयी अस्थिव्यंगोपचार विभागाचे प्रमुख डॉ. कोईचाडे यांना विचारले असता त्यांनी हिवाळी सुट्यांवर असल्याचे सांगितले. परंतु प्रकरणाची चौकशी करणार असल्याचेही ते म्हणाले.

टॅग्स :indira gandhi medical college, Nagpurइंदिरा गांधी वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय (मेयो)doctorडॉक्टर