शहरं
Join us  
Trending Stories
1
दिवाळी एकत्र साजरी करू, पण अजित पवारांना पुन्हा पक्षात नो एंट्री; शरद पवारांनी परतीचे दरवाजे बंद केले...
2
महागाईवर सर्वात खळबळजनक रिपोर्ट; तीन वर्षांत कुटुंबांची घरगुती बचत ९ लाख कोटींनी घटली
3
साताऱ्याच्या बदल्यात राज्यसभा मिळाली! पार्थ पवारांना दिल्लीत पाठविण्यावर अजित पवारांचे मोठे संकेत
4
सुप्रियाने पवार-सुळे असे नाव लावले असते तर..? शरद पवारांनी सांगितला तिने घेतलेला एक निर्णय...
5
अदानी-अंबानींकडून टेम्पाेने पैसा आला का? मोदींच्या सवालावर राहुल गांधींचे चोख प्रत्तूत्तर...
6
नावात काय आहे? विचारत हायकोर्टाने फेटाळल्या नामांतराविरोधातील याचिका
7
कर्मचारी सुट्टीवर; विमाने जमिनीवर; ‘एअर इंडिया एक्स्प्रेस’ची ९० उड्डाणे रद्द
8
मी ठाण मांडून बसलो, म्हणजे करेक्ट कार्यक्रम होणार: मुख्यमंत्री एकनाथ शिंदे
9
शाळेत अ‍ॅडमिशन मिळणार का? न्यायालयात स्थगितीनंतर आरटीई ऑनलाइन अर्जाला ब्रेक, पालक अस्वस्थ 
10
हेड, अभिषेकने घातला धुमाकूळ; लखनौचा पाडला फडशा; हैदराबादचा १० गड्यांनी दणदणीत विजय
11
तीन वर्षांनंतर भारतात खेळणार नीरज; राष्ट्रीय फेडरेशन चषक स्पर्धेची उत्सुकता शिगेला
12
भारतीय अर्थव्यवस्था 8% दराने वाढणार; देशाच्या मुख्य आर्थिक सल्लागारांनी व्यक्त केला विश्वास
13
'इंडिया' आघाडी भ्रष्टाचारी; भाजपकडे नेता, नीती अन् विकासाचा कार्यक्रम तयार: अमित शाह
14
ट्रॅव्हिड हेडने कुटल्या १२ चेंडूंत ५८ धावा! अभिषेक शर्मासह ३६ चेंडूंत फलकावर चढवल्या १०७ धावा
15
महा-बीसीए, बीबीए, एमसीए, एमबीए CET प्रवेश परीक्षा २९ मे रोजी; सुधारित वेळापत्रक जाहीर
16
भारताच्या लोकसंख्येत हिंदू 6 टक्क्यांनी घटले, मुस्लीम समाजाचा टक्का वाढला; सरकारी पॅनलनं केला 65 वर्षांचा अभ्यास
17
Air India ने 80 उड्डाणे रद्द केल्याबद्दल मागितली प्रवाशांची माफी; तिकीटाचे पैसेही परत करणार...
18
काँग्रेसची धुळधाण हीच खरी देशभक्ती; एकनाथ शिंदेंची संगमनेरात जोरदार टीका
19
मी दक्षिण भारतातील असून भारतीय दिसते; अभिनेत्रीचं सॅम पित्रोदांना चोख प्रत्युत्तर
20
इंडिया पोस्ट पेमेंट्स बँकेत नोकरीची संधी, 'या' तारखेपूर्वी उमेदवार करू शकतात अर्ज

दीक्षाभूमीजवळील परिसरात उंच बांधकाम नको : नागपूर मनपाला सूचना देणार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 20, 2019 9:06 PM

दीक्षाभूमी परिसरात उंच इमारतींचे बांधकाम व्हायला नको व अशा आराखड्यांना मंजुरी देऊ नये अशी सूचना नागपूर महानगरपालिकेला करण्यात येईल असे आश्वासन सामाजिक न्याय मंत्री छगन भुजबळ यांनी शुक्रवारी विधान परिषदेत दिले.

ठळक मुद्देसामाजिक न्यायमंत्र्यांचे आश्वासन

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : जगभरातील कोट्यवधी जनतेचे श्रद्धास्थान असलेल्या उपराजधानीतील दीक्षाभूमी परिसराच्या विकासकामांसाठी निधीची कमतरता पडू दिली जाणार नाही. या परिसराचे सौंदर्य अबाधित रहावे यासाठी विशेष काळजी घेण्यात येईल. जवळील परिसरात उंच इमारतींचे बांधकाम व्हायला नको व अशा आराखड्यांना मंजुरी देऊ नये अशी सूचना नागपूर महानगरपालिकेला करण्यात येईल असे आश्वासन सामाजिक न्याय मंत्री छगन भुजबळ यांनी शुक्रवारी विधान परिषदेत दिले.दीक्षाभूमीच्या विकासकामांच्या निधीसंदर्भातील मुद्द्यावर राष्ट्रवादीचे प्रकाश गजभिये यांनी लक्षवेधी मांडली. दीक्षाभूमीचा जागतिक स्तरावर विकास करण्यासाठी ३२५ कोटी रुपयांची योजना तयार झाली असली तरी त्यातील ४० कोटींचा धनादेश हा शासनाला परत आला आहे अशी माहिती मिळाल्याचे त्यांनी प्रतिपादन केले. यावर छगन भुजबळ यांनी असे काहीही झालेले नाही, हे स्पष्ट केले. दीक्षाभमीची विकासकामे दोन टप्प्यात होणार आहे. पहिल्या टप्प्यात १०० कोटी ५० लाख व उर्वरित रक्कम दुसऱ्या टप्प्यात दिली जाईल. पहिल्या टप्प्याच्या निधीला तत्त्वत: मंजुरीदेखील मिळाली व त्यातील ४० कोटी रुपये नागपूर महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाकडे वर्गदेखील करण्यात आले आहेत. तो निधी प्राधिकरणाकडे सुरक्षित आहे. याबाबतचे अंदाजपत्रक व नकाशे प्रशासकीय मान्यतेसाठी २२ जानेवारी २०१९ रोजी शासनाला प्राप्त झाले. कामाच्या नकाशांवर मुख्य वास्तुशास्त्रज्ञ यांचे साक्षांकन नसल्याची त्रुटी काढत ते सामाजिक न्याय विभागाला परत पाठविण्यात आले होते. याची पूर्तता झाल्यावर जुलै महिन्यात अंदाजपत्रक शासनाकडे सादर करण्यात आले. या कामाची व्याप्ती निश्चित करण्याचे निर्देश उच्चाधिकार समितीने दिले आहेत. त्या अनुषंगाने २७ नोव्हेंबर रोजी प्रधान सचिवांच्या अध्यक्षतेखाली बैठक झाली. यात प्रस्तावित आराखड्याचे नियोजन करताना मुख्य स्तुपास बाधा येणार नाही, स्तूप दुरून दिसण्यास अडचण येणार नाही या बाबी विचारात घेऊन सुधारित प्रस्ताव तयार करण्याची सूचना करण्यात आली. तसेच संबंधित प्रस्ताव १५ दिवसाच्या आत उच्चस्तरीय समितीसमोर सादर करण्यात येईल, असे भुजबळ यांनी स्पष्ट केले.‘मेट्रो’ची इमारत पाडणार कशी ?‘मेट्रो’च्या इमारतीची उंची खूप जास्त आहे व त्यामुळे स्तूप पाहण्यास अडथळा येत असल्याचा मुद्दा यावेळी प्रकाश गजभिये यांनी मांडला. परंतु ही इमारत तयार झाली असून आता ती पाडणार कशी हा प्रश्न आहे. यापुढे असे होणार नाही याची काळजी घेण्यात येईल, असे छगन भुजबळ यांनी सांगितले.व्यास झाले आक्रमकया चर्चेदरम्यान भाजपचे गिरीश व्यास यांनी आक्रमक भूमिका घेतली. दीक्षाभूमीची जागा संपूर्णपणे स्मारक व विचारांसाठी देण्यात यावी, असा आग्रह माजी विधान परिषद सदस्य व माझे वडील बच्छराज व्यास यांनी धरला होता. नितीन गडकरी यांच्या कार्यकाळात दीक्षाभूमीच्या कामाला गती मिळाली. तर मागील पाच वर्षांत तर दीक्षाभूमीला १०० कोटींचा निधी प्रत्यक्षात मंजूरदेखील झाला आहे. यासंदर्भात ४० कोटी परत गेले असे सांगून गजभिये यांनी संभ्रम निर्माण करण्याचा प्रयत्न करू नये असे व्यास म्हणाले.

टॅग्स :Chagan Bhujbalछगन भुजबळDiksha Bhoomi Nagpurदीक्षाभूमीVidhan Parishadविधान परिषद