सबलीकरणाच्या मृगजळात न अडकता शासनक र्त्या व्हा! स्मिता काळे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 8, 2019 22:26 IST2019-01-08T22:21:33+5:302019-01-08T22:26:34+5:30

‘सुपर मॉम’, ‘सुपर वूमन’ असे लेबल लावत महिलांचे मार्केटिंग केले. प्रत्यक्षात कुणीही सुपर नसतो. स्त्रीचे सौंदर्य हे दिसण्यात नाही तर तिच्या कर्तृत्वात आहे. त्यामुळे महिलांनी सबलीकरणाच्या मृगजळात न अडकता व्यवस्था चालविणारे शासनकर्ते व्हावे, असे आवाहन महिला उद्योजिका मेळाव्यात धंतोली झोनच्या सहायक आयुक्त स्मिता काळे यांनी रविवारी केले.

Do not fall into the mirage of empowering become ruler! Smita Kale | सबलीकरणाच्या मृगजळात न अडकता शासनक र्त्या व्हा! स्मिता काळे

सबलीकरणाच्या मृगजळात न अडकता शासनक र्त्या व्हा! स्मिता काळे

ठळक मुद्देउद्योजिका मेळाव्यात महिलांना आवाहन

लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : ‘सुपर मॉम’, ‘सुपर वूमन’ असे लेबल लावत महिलांचे मार्केटिंग केले. प्रत्यक्षात कुणीही सुपर नसतो. स्त्रीचे सौंदर्य हे दिसण्यात नाही तर तिच्या कर्तृत्वात आहे. त्यामुळे महिलांनी सबलीकरणाच्या मृगजळात न अडकता व्यवस्था चालविणारे शासनकर्ते व्हावे, असे आवाहन महिला उद्योजिका मेळाव्यात धंतोली झोनच्या सहायक आयुक्त स्मिता काळे यांनी रविवारी केले.
महापालिकेच्या महिला व बालकल्याण समिती व समाजकल्याण विभागाच्यावतीने शहर समृद्धी उत्सवांतर्गत आयोजित महिला उद्योजिका मेळाव्याच्या तिसऱ्या दिवसाच्या उद्घाटन कार्यक्रमात प्रमुख वक्त्या म्हणून त्या बोलत होत्या. मंचावर महिला व बालकल्याण समितीच्या सभापती प्रगती पाटील, उपसभापती विशाखा मोहोड, समितीच्या सदस्या दिव्या धुरडे, सरिता कावरे, उपायुक्त डॉ. रंजना लाडे, लक्ष्मीनगर झोनच्या सहायक आयुक्त सुवर्णा दखणे, हनुमाननगर झोनचे सहायक आयुक्त राजू भिवगडे, लकडगंज झोनचे सहायक आयुक्त सुभाष जयदेव आदी उपस्थित होते.
तत्पूर्वी महिला सशक्तीकरणाची मशाल पेटवून तिसऱ्या दिवसाच्या कार्यक्रमाचे उद्घाटन करण्यात आले. यानंतर स्वच्छ नागपूर, ग्रीन नागपूर, सुंदर नागपूर असा संदेश असलेला बलून मान्यवरांच्या हस्ते आकाशात सोडण्यात आला. दुपारी महिलांची क्रिकेट स्पर्धा घेण्यात आली. यात विजयी ठरलेल्या रूपमंत्रा संघाला पाहुण्यांच्या हस्ते चषक प्रदान करण्यात आला. संचालन व आभारप्रदर्शन स्मिता खनगई यांनी केले.
तिसऱ्या दिवसाच्या सत्कारमूर्ती
मेळाव्याच्या तिसऱ्या दिवशीही पाच कर्तृत्ववान महिलांचा सत्कार करण्यात आला. कीर्तनातून प्रबोधन करणाऱ्या मृण्मयी अमर कुलकर्णी, दृष्टिबाधित असतानाही योग, नॅचरोपॅथी, संगीत क्षेत्रात कार्य करणाऱ्या जिज्ञासा कुबडे, २२ वर्षांपासून निराधारांची सेवा करणाऱ्या व त्यांना आश्रय देणाऱ्या निशिगंधा रामटेके, परागकणांवर पीएच.डी. करणाऱ्या राज्य आदर्श शिक्षक पुरस्कारप्राप्त मंगला गावंडे, संवेदना संस्थेच्या माध्यमातून स्वमग्न मुलांसाठी कार्यरत ज्योती फडके आदींचा सत्कारमूर्तीत समावेश होता.
प्रिन्स डान्स ग्रुपचा धमाका
इंडियाज गॉट टॅलेंट फेम ओडिशा येथील प्रिन्स डान्स ग्रुपने आपल्या विविध प्रकारातील नृत्याने रसिकांच्या डोळ्यांचे पारणे फेडले. प्रारंभीच सादर केलेल्या देशभक्तीपर नृत्याने प्रेक्षकांना देशभक्तीचे स्फुरण चढविले. त्यानंतर एकापेक्षा एक सादर केलेल्या सरस सादरीकरणाने रसिकांचे मनोरंजन केले.

Web Title: Do not fall into the mirage of empowering become ruler! Smita Kale