शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra SSC 10th Result 2024 : दहावीचा निकाल ९५.८१ टक्के; 'कोकण-कन्या' अव्वल, १८७ विद्यार्थ्यांना 'शत-प्रतिशत'
2
इतर लॅबमध्ये डीएनए टेस्टिंग केल्यावर रक्ताचे सॅम्पल बदलल्याचे समोर; पोलीस आयुक्तांची माहिती
3
दिवाळीपूर्वीच विधानसभा निवडणूक, राजकीय पक्षांकडून तयारी सुरू; अजित पवार, बावनकुळेंच्या हालचाली
4
रक्ताचे नमुने बदलण्यासाठी डॉ. श्रीहरी हलनोरने घेतले ३ लाख; पुणे पोलिसांची माहिती
5
अश्विनी कासारला लोकलमध्ये महिलेने मारली लाथ, पोलिसांना टॅग करत शेअर केला व्हिडिओ
6
गेल्या महिन्यापासून देशात विरोधकांची हवा; जोरदार टक्कर दिल्याची अमित शाह यांची कबुली
7
Mukesh Ambani News : मुकेश अंबानींची 'या' देशातील टेलिकॉम इंडस्ट्रीवर नजर, पाहा काय आहे प्लान?
8
"ज्याने सुरु केलेय, त्यानेच संपवावे"; उद्धव ठाकरेंच्या युतीत परतण्यावर अमित शाह यांचे मोठे संकेत
9
“पुतिन अन् शेख हसीना यांनी केले तेच आता मोदी करु पाहात आहेत”; अरविंद केजरीवाल यांची टीका
10
देख रहा है बिनोद...!अवघ्या काही तासात रिलीज होणार 'पंचायत 3', जाणून घ्या नेमकी वेळ
11
पुणे पोलिसांची मोठी कारवाई! ससूनच्या डॉक्टरांनी बिल्डर बाळाचे रक्ताचे नमुने बदलले; दोघांना अटक
12
Uma Bharti : "मोदी 400 नाही, तर 500 पार करतील..."; भाजपाच्या जागांवर उमा भारती यांचा मोठा दावा
13
हैदराबाद हरल्याने अमिताभ बच्चन निराश; म्हणाले, "SRH ची मालकीण सुंदर तरुणी..."
14
Mamata Banerjee : "देव असाल तर आम्ही मंदिर बांधू, पण..."; ममता बॅनर्जींचा पंतप्रधान मोदींना खोचक टोला
15
“अंतरिम जामिनाची मुदत ७ दिवसांनी वाढवून मिळावी”; केजरीवाल यांची सुप्रीम कोर्टाला विनंती
16
धक्कादायक! प्रसिद्ध हॉलिवूड अभिनेत्याची गोळी मारून हत्या, जॉनी वॅक्टरचा ३७व्या वर्षी मृत्यू
17
"तुला मिळणार नाही, मोठ्याला घेऊन ये"; पुण्यात अचानक दारु विक्रीचे 'नियम' लागू झाले
18
दलजीत कौरच्या पतीला लग्नच मान्य नाही? अभिनेत्रीची सोशल मीडियावर पोस्ट; वाद चव्हाट्यावर
19
Crorepati Calculator: 'या' स्ट्रॅटजीनं गुंतवणूक केली तर, २०००० सॅलरी घेणारेही होतील कोट्यधीश, पाहा कॅलक्युलेशन
20
भीषण! इस्रायलने राफामध्ये केला एअर स्ट्राईक; 35 जणांचा मृत्यू, अनेक जण जखमी

राष्ट्रध्वजाचा अवमान करू नका : जिल्हाधिकारी अश्विन मुद्गल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 06, 2019 9:02 PM

१५ ऑगस्ट रोजी स्वातंत्र्यदिनी प्लास्टिक व कागदी राष्ट्रध्वजाचा वापर होतो. कळत-नकळतपणे हे ध्वज कार्यक्रमांनंतर मैदानात किंवा रस्त्यावर पडलेले आढळतात. असा पद्धतीने राष्ट्रध्वजाचा अवमान करू नये असे आवाहन जिल्हाधिकारी अश्विन मुद्गल यांनी केले आहे.

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : १५ ऑगस्ट रोजी स्वातंत्र्यदिनी प्लास्टिक व कागदी राष्ट्रध्वजाचा वापर होतो. कळत-नकळतपणे हे ध्वज कार्यक्रमांनंतर मैदानात किंवा रस्त्यावर पडलेले आढळतात. असा पद्धतीने राष्ट्रध्वजाचा अवमान करू नये असे आवाहन जिल्हाधिकारी अश्विन मुद्गल यांनी केले आहे.राष्ट्रीय सणांच्या व इतर महत्त्वाच्या सांस्कृतिक कार्यक्रमाच्या प्रसंगी नागरिक व विद्यार्थ्यांकडून अनेकदा अजाणतेपणे राष्ट्रध्वजाचा अपमान होतो. हे टाळण्याकरिता उच्च न्यायालयाने एका जनहित याचिकेवर निर्णय देताना प्लास्टिक व कागदी राष्ट्रध्वज वापरावर बंदीचे निर्णय दिले आहेत. सोबतच कागदी व प्लास्टिक राष्ट्रध्वजाचा वापर थांबविण्याकरिता जनजागृती करण्याच्या सूचनाही दिल्या आहेत. शासन निर्णयानुसार प्लास्टिक व कागदी राष्ट्रध्वज निर्मितीस पायबंद घालण्याच्या दृष्टीने त्याचे उत्पादन, वितरण व विक्रेते यांच्यावर संबंधित विभागाने कारवाई करण्याचे निर्देश दिले आहेत. त्याचप्रमाणे कार्यक्रम संपल्यानंतर ठिकठिकाणी पडलेले राष्ट्रध्वज गोळा करून त्याची योग्यप्रकारे विल्हेवाट लावण्याच्या सूचना न्यायालयाने दिल्या आहेत. खराब झालेले राष्ट्रध्वज पिशवी किंवा कापडामध्ये व्यवस्थित बांधून सूर्यास्तानंतर व सूर्योदयापूर्वी जिल्हाधिकारी व तहसील कार्यालयामध्ये वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या देखरेखीत स्वच्छ जागेत सन्मानपूर्वक नष्ट करण्याचे निर्देश आहेत, असे मुद्गल यांनी सांगितले. रस्त्यावर पडलेले राष्ट्रध्वज गोळा करण्याकरिता जिल्ह्यातील सामाजिक संघटना, नागरिक, विद्यार्थी यांनी सहकार्य करावे. तसेच जमा करण्यात आलेले राष्ट्रध्वज जिल्हाधिकारी किंवा संबंधित तहसील कार्यालयात सुपूर्द करावेत, असे आवाहनदेखील त्यांनी केले.

 

टॅग्स :National Flagराष्ट्रध्वजcollectorजिल्हाधिकारीnagpurनागपूर