दिवाळी संपली, कोरोनाची लाट परतली

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 19, 2020 11:31 IST2020-11-19T11:30:32+5:302020-11-19T11:31:55+5:30

corona returns Nagpur News दिवाळीनंतर कोरोनाची लाट परतणार असे संकेत आरोग्य क्षेत्रातून देण्यात आले होते. हे संकेत खरे ठरत असल्याचे दिसून येत आहे

Diwali is over, the wave of corona returns | दिवाळी संपली, कोरोनाची लाट परतली

दिवाळी संपली, कोरोनाची लाट परतली

ठळक मुद्देनागपूर जिल्ह्यात ७ मृत्यू३८९ पॉझिटिव्हची नोंद

लोकमत न्यूज नेटवर्क

नागपूर : दिवाळीनंतर कोरोनाची लाट परतणार असे संकेत आरोग्य क्षेत्रातून देण्यात आले होते. हे संकेत खरे ठरत असल्याचे दिसून येत आहे. गेल्या दोन-तीन दिवसापासून जिल्ह्यात कोरोना पॉझिटिव्हची संख्या दुपटीने वाढत असल्याचे दिसते आहे. बुधवारी जिल्ह्यात ३८९ कोरोना पॉझिटिव्हची नोंद झाली असून, ७ पॉझिटिव्ह रुग्णांचा मृत्यू झाला आहे.

मृतांमध्ये २ रुग्ण ग्रामीण भागातील असून, १ शहरातील आणि ४ जिल्ह्याबाहेरील आहे. तर बुधवारी आढळलेल्या पॉझिटिव्हमध्ये ग्रामीण भागातील ५४, शहरातील ३३१ व जिल्ह्याबाहेरील ४ रुग्ण आहेत. बुधवारी ६,६८५ कोरोना टेस्ट करण्यात आल्या. यात ग्रामीणमध्ये १५०८ व शहरात ५,१७७ टेस्ट झाल्या. जिल्ह्यात आतापर्यंत ३,५३८ मृत्यूची नोंद झाली आहे. १,०७,२१३ पॉझिटिव्ह आतापर्यंत आढळले आहे. बुधवारी १७५ रुग्ण कोरोनातून बरे झाले असून, बरे झालेल्या रुग्णांची संख्या १,००,३७४ वढी आहे. सद्यस्थितीत ३,३०१ रुग्ण अ‍ॅक्टिव्ह आहेत.

Web Title: Diwali is over, the wave of corona returns