शहरं
Join us  
Trending Stories
1
बारामतीची लढत थांबणार? पोटनिवडणुकीत काँग्रेसने उमेदवारी मागे घेण्यासाठी ठेवली 'ही' अट!
2
मेल, एक्स्प्रेस तक्रारी ‘कमी’ दाखवण्यासाठी १३९ हेल्पलाईन ऐवजी व्हॉट्सॲपचा वापर
3
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीच्या किमतीत मोठी घसरण; मोठ्या चढ-उतारादरम्यान पाहा दिल्ली, मुंबई, चेन्नईतील नवे दर
4
"उद्या सुट्टी आहे, माझ्या अंत्ययात्रेला या"; पतीसाठी भावनिक चिठ्ठी लिहून विवाहितेने संपवलं जीवन!
5
सुरक्षित आणि करमुक्त गुंतवणुकीसाठी PPF उत्तम पर्याय; दरमहा ११,००० रुपयांच्या गुंतवणुकीवर मिळवा इतका परतावा
6
जागतिक संकेतांमुळे शेअर बाजारात घसरण; सेन्सेक्स ३८४ अंकांनी तर निफ्टी ११६ अंकांनी कोसळला
7
उन्हाच्या तडाख्यामुळे मुंबईकरांचा जलसाठा १० टक्क्यांनी घटला, आता ३७ टक्केच शिल्लक
8
११५ वर्षे जुना एल्फिन्स्टन पूल अखेर इतिहासजमा; महारेलच्या विलंबामुळे ब्लॉक दीड तासांनी लांबला
9
'तुमच्या तपस्येतच नाही तर फोटोशॉपमध्येही उणीव', हिमंता बिस्वा सरमांच्या पत्नीचा पवन खेडा यांना टोला
10
‘मेट्रो २ बी, मेट्रो ९’ला पुन्हा नवीन तारीख; आता मंगळवारपासून दोन्ही मार्गिका सेवेत
11
वैद्यकीय महाविद्यालयाचा कारभार कसा आहे, फीडबॅक द्या! राष्ट्रीय वैद्यकीय आयोगाची मोहिम
12
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघडतंय सामान्यांचं बजेट
13
मुंबई पालिका क्षेत्रात महिलांकरता मोफत स्वच्छतागृहांच्या सुधारित धोरणासाठी प्रयत्नशील! - महापौर
14
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
15
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
16
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
17
लेख: मुंबईकरांची लोकलराणी वारंवार का अडखळतेय? आजकाल धाप लागल्यासारखी करतेय...
18
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
19
लेख: शिक्षिकेऐवजी नेत्याचा, पोलिसाचा मुलगा असता तर..? चार वर्षांच्या विघ्नेशची उपचारासाठी फरफट
Daily Top 2Weekly Top 5

स्वरवेधच्या स्वरयात्रेने गंधाळली दिवाळी पहाट 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 9, 2018 21:21 IST

दिवाळीच्या उत्साही अशा वातावरणात ठिकठिकाणी आयोजित दिवाळी पहाट कार्यक्रमांनी रसिक श्रोत्यांसाठी स्वरानंदाची साखरपेरणी केली आहे. या विविध आयोजनात स्वरवेधने आपल्या नावीन्यपूर्ण दिवाळी पहाटचे आयोजन करून श्रोत्यांना चार कार्यक्रमांची सांगितिक मेजवानी प्रदान केली. ज्येष्ठ गायक कलावंतांची ‘उत्साहयात्रा’, स्वरवाद्यांचा अविष्कार असलेली ‘स्वरयात्रा’ आणि तालवाद्यांचा झंकार असलेली ‘तालयात्रा’ सादर करून श्रोत्यांना स्वरांचा आनंदठेवा दिला.

ठळक मुद्देस्वर आणि तालवाद्यांची आनंदयात्रा : चार कार्यक्रमांची सांगितिक मेजवानी

लोकमत न्यूज नेटवर्क नागपूर : दिवाळीच्या उत्साही अशा वातावरणात ठिकठिकाणी आयोजित दिवाळी पहाट कार्यक्रमांनी रसिक श्रोत्यांसाठी स्वरानंदाची साखरपेरणी केली आहे. या विविध आयोजनात स्वरवेधने आपल्या नावीन्यपूर्ण दिवाळी पहाटचे आयोजन करून श्रोत्यांना चार कार्यक्रमांची सांगितिक मेजवानी प्रदान केली. ज्येष्ठ गायक कलावंतांची ‘उत्साहयात्रा’, स्वरवाद्यांचा अविष्कार असलेली ‘स्वरयात्रा’ आणि तालवाद्यांचा झंकार असलेली ‘तालयात्रा’ सादर करून श्रोत्यांना स्वरांचा आनंदठेवा दिला.

ज्येष्ठ गायकांचा सहभाग असलेल्या उत्साहयात्रेच्या अपूर्व यशानंतर स्वरवेधतर्फे स्वरयात्रेच्या निमित्ताने सुरांच्या दवबिंदूची पखरण करीत स्वरवाद्यांच्या सहभागाने दिवाळी पहाट गंधाळली. हे आयोजन सायंटिफीक सभागृह, लक्ष्मीनगर येथे करण्यात आले. कार्यक्रमाची संकल्पना अ‍ॅड. भानुदास कुळकर्णी यांची होती. यावेळी गायक कलावंतांच्या साथीला सतार, संतूर, सारंगी, संवादिनी, व्हायोलिन, बासरी अशा स्वरवाद्यांनी रसिकांच्या कानात प्रसन्न अनुभूतीचे स्वर निनादले. या वाद्यांचा लीलया उपयोग करून माधुर्य लाभलेल्या गीतांचे सादरीकरण यावेळी गायक कलावंतांनी केले. स्वरवेधच्या अनेक वर्षाच्या प्रवासात सहभागी असलेले वादक कलावंत यात सहभागी होते. यामध्ये सतारीवर शुभदा देशपांडे, संतूरवर वाल्मिक धांडे, व्हायोलिनवर अमर शेंडे, अरविंद उपाध्ये यांची बासरी, ऋग्वेद यांची मेडोलीन तर संवादिनीवर नरेंद्र कडवे यांनी स्वरलहरींची जादू श्रोत्यांवर बिखेरली. यासोबत अमर कुळकर्णी, रसिका बावडेकर, अवंतिका पाध्ये, श्रुती जैन, मनीषा अंदूलकर, शीला कु ळकर्णी, वैशाली उपाध्ये या गायक कलावंतांनी या स्वरयात्रेला सुरांनी सजवित रसिकांना अवर्णनीय आनंद दिला. या गायकांना वादकांची मिळालेली वाद्यसंगत ही पहाट अधिक रंगतदार ठरली. निवेदन रेणुका देशकर व मुकूंद देशपांडे यांचे होते. श्रोत्यांचा अभूतपूर्व प्रतिसाद कार्यक्रमाला लाभला.

टॅग्स :Diwaliदिवाळीmusicसंगीत