तंटामुक्त समित्या थंडबस्त्यात
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 4, 2021 04:08 IST2021-04-04T04:08:17+5:302021-04-04T04:08:17+5:30
कोंढाळी : शांततेकडून समृद्धीकडे नेणाऱ्या महात्मा गांधी तंटामुक्त मोहिमेकडे गेल्या काही वर्षांत शासनाचे दुर्लक्ष झाले आहे. शासनाच्या दुर्लक्षाने कोंढाळी ...

तंटामुक्त समित्या थंडबस्त्यात
कोंढाळी : शांततेकडून समृद्धीकडे नेणाऱ्या महात्मा गांधी तंटामुक्त मोहिमेकडे गेल्या काही वर्षांत शासनाचे दुर्लक्ष झाले आहे. शासनाच्या दुर्लक्षाने कोंढाळी भागात व काटोल तालुक्यातील अनेक गावात तंटामुक्ती समित्याची स्थापनाच करण्यात आली नाही.
राज्यात १५ ऑगस्ट २००७ पासून तत्कालीन गृहमंत्री आर.आर.पाटील यांनी महात्मा गांधी तंटामुक्त गाव मोहीम सुरू केली होती. या मोहिमेला राज्यात उत्कृष्ट प्रतिसाद मिळाला. २०१५ मध्ये राज्यात २८ हजार ९९३ गावे तंटामुक्त झाली. १२१८ गावांना तंटामुक्त अभियानांतर्गत पुरस्कार देण्यात आले. या अभियानांतर्गत पोलीस पाटील व तंटामुक्ती समित्यांची नियमित बैठक होत होती. कोंढाळी भागातील अनेक गावातील तंटे सोडविण्यात यश आले होते तसेच बहुतांश गावातील अवैध व्यवसायांना आळा बसला होता. तंटामुक्त अभियानाकडे युती सरकारच्या काळात दुर्लक्ष झाले. कोंढाळी पोलीस ठाण्यांतर्गत जवळपास ४१ गावे येतात. पण फक्त ७ ते ८ गावातच तंटामुक्ती समित्यांची स्थापना करण्यात आली आहे. अशीच अवस्था काटोल पोलीस ठाण्याच्या हद्दीतील आहे. राज्यात सध्या महाविकास आघाडीचे सरकार आहे. याकडे सरकारने लक्ष देण्याची गरज व्यक्त केली जात आहे.