शहरं
Join us  
Trending Stories
1
'हयगय केली जाणार नाही', IG जालिंदर सुपेकरांचं नाव चर्चेत, अजित पवारांचा कारवाईचा इशारा
2
कोरोना का वाढतोय? लसीचा प्रभाव संपला की अन्य काही...; २०१९ मध्ये जेव्हा पहिल्यांदा आलेला तेव्हा... 
3
१०० ते १५० लोक, ६१ लॅपटॉप, ४१ मोबाईल, पुण्यात बनावट कॉल सेंटरवर पोलिसांचा छापा; सायबर फसवणुकीचे मोठे रॅकेट उघड
4
काळरात्र! सर्पदंशाने दोन सख्या भावंडांचा झोपेतच मृत्यू, कोयाळ गाव हादरलं
5
Operation Sindoor : चार वार अन् शत्रू झाला लाचार! भारताची अशी एअर स्ट्राईक जिने पाकिस्तानला गुडघ्यावर आणलं 
6
Corona Virus : चिंताजनक! देशात कोरोनाचा वेग वाढतोय, ९ महिन्यांचं बाळ पॉझिटिव्ह; कोणत्या राज्यात किती रुग्ण?
7
'धुरंधर' सिनेमाचं डोंबिवलीत होतंय शूट, माणकोली पूलावरुन संजय दत्तचा व्हिडिओ व्हायरल
8
Mumbai Mega Block : मुंबईकरांसाठी महत्त्वाची बातमी! रविवारी 'या' २ मार्गांवर मेगाब्लॉक, गाड्यांचं वेळापत्रकही बदलणार
9
धैर्य राखून वाचविले! त्या विमानाच्या दोन्ही पायलटना विमानोड्डाणास मनाई; डीजीसीएचे आदेश
10
Tarot Card: आगामी काळ प्रगतीचा, आत्मविश्वासाने सामोरे जाण्याचा; वाचा साप्ताहिक टॅरो भविष्य!
11
रमेशचा २९ वेळा, तर द्रौपदीबाईंचा २८ वेळा मृत्यू! ११ कोटींचा 'स्नेक स्कॅम', इनसाइड स्टोरी ऐकून चक्रवाल! 
12
संयुक्त राष्ट्र परिषदेत पाकिस्तानला नागरिकांच्या सुरक्षेबद्दल कळवळा; भारताने उत्तर देत पाकच्या तोंडाला लावला टाळा!
13
'कान्स'च्या रेड कार्पेटवर चमकली आलिया भट, दोन्ही लूकमधून वेधलं लक्ष; चाहते म्हणाले...
14
टाटा स्टीलच्या वरिष्ठ मॅनेजरने दोन मुली, पत्नीला संपविले; एकाच खोलीत आढळले चौघांचे मृतदेह
15
अ‍ॅपल ऐकली नाही...! ट्रम्प संतापले, रातोरात २५ टक्के टेरिफ लादले; युरोपियन युनियनवर ५० टक्के...
16
पाकला ड्रोन पुरवणाऱ्या तुर्कीमधील कंपनी देते पुणे, मुंबई मेट्रो तिकिटे; अद्यापही काम सुरूच
17
आजचे राशीभविष्य २४ मे २०२५ : आजचा दिवस वैवाहिक जीवनाचा आनंद उपभोगण्याचा
18
ऑनलाइन जुगार कायदा थांबवू शकत नाही; सुप्रीम कोर्टाने व्यक्त केली हतबलता, केंद्राला विचारणा
19
परंपरा बदलली; अखेरच्या दिवशी न्या. अभय ओक यांचे तब्बल ११ खटल्यांत न्यायदान
20
माजी नगरसेवकांना देणार शिंदेसेना ‘व्हिटामिन एम’; निवडणुकीपूर्वी विकासकामांसाठी देणार निधी

प्रलंबित अर्जाचा निपटारा झटपट

By admin | Updated: July 20, 2014 01:16 IST

सेतू केंद्रातील विविध प्रमाणपत्रांसाठी आलेल्या अर्जांचा निपटारा झटपट करण्यासाठी यंत्रणेला कामाला लावले आहे. पुढच्या काळात केंद्राकडे अर्ज आल्यावर तीन दिवसात त्याचा निपटारा करण्याचे

सेतू केंद्र : जिल्हाधिकाऱ्यांचे यंत्रणेला आदेशनागपूर: सेतू केंद्रातील विविध प्रमाणपत्रांसाठी आलेल्या अर्जांचा निपटारा झटपट करण्यासाठी यंत्रणेला कामाला लावले आहे. पुढच्या काळात केंद्राकडे अर्ज आल्यावर तीन दिवसात त्याचा निपटारा करण्याचे नियोजन करण्यात आले आहे. यासंदर्भात शनिवारी निवासी उपजिल्हाधिकाऱ्यांनी नायब तहसीलदारांची बैठक घेतली आणि त्यांना कामाच्या नियोजनाची माहिती दिली.जिल्हाधिकारी कार्यालयातील सेतू केंद्रातून बाराही महिने प्रमाणपत्र वाटप करण्याची सोय आहे. पण दरवर्षी शाळा-महाविद्यालयांच्या प्रवेश प्रक्रिया सुरू झाल्यावरच पालक प्रमाणपत्रासाठी गर्दी करतात. एकाच वेळी हजारोंच्या संख्येने आलेल्या अर्जांमुळे केंद्राचे नियोजन कोलमडते. अधिकाऱ्यांना त्यांचे मूळ काम करून अर्जांचा निपटारा करायचा असल्याने कार्यव्यस्ततेमुळे त्यांच्याकडेही अर्ज प्रलंबित राहतात. दुसरीकडे वेळेत प्रमाणपत्र न मिळाल्याने पालक व विद्यार्थ्यांची गैरसोय होते. यंदाही हेच चित्र सेतू केंद्रात आहे.निवडणुका, मदत वाटप आणि नियमित कामात प्रशासकीय यंत्रणा गुंतल्याने प्रलंबित अर्जांची संख्या वाढली होती. त्याला गती देण्याचा प्रयत्न सेतू व्यवस्थापनाकडून झाले. मात्र दैनंदिन अर्जांची त्यात भर पडत गेल्याने गाडी रुळावर आली नाही. काही उपजिल्हाधिकाऱ्यांनी काढलेल्या नाहक त्रुटी याला कारणीभूत ठरल्या. लोकांच्या तक्रारी वाढल्यावर जिल्हाधिकारी अभिषेक कृष्णा यांनी पुन्हा या प्रकरणात लक्ष घातले. सेतू व्यवस्थापन सांभाळणाऱ्या अधिकाऱ्यांची बैठक घेऊन अर्ज प्रलंबित असण्याची कारणे जाणून घेतली व यासंदर्भात नियोजन करण्याचे आदेश दिले. (प्रतिनिधी)असे आहे नियोजननव्या नियोजनानुसार सेतू केंद्रात आलेल्या अर्जाचा निपटारा तीन दिवसात करणे आवश्यक आहे. त्यासाठी नायब तहसीलदार आणि उपजिल्हाधिकाऱ्यांना केंद्रात बसविण्यात येणार आहे. त्यांच्यासाठी सुयोग्य जागा तयार करण्यास सांगण्यात आले आहे. प्रत्येक दिवशी आलेल्या अर्जावर सेतू केंद्राने त्याच दिवशी आवश्यक ती कारवाई करून तपासणीसाठी तयार करायचे आहे. दुसऱ्या दिवशी एक नायब तहसीलदार सेतू केंद्रात येऊन अर्जाची तपासणी करतील. त्यानंतर दोन दिवसात उपजिल्हाधिकाऱ्यांकडून या प्रकरणाचा निपटारा करतील. सध्या सेतूतील प्रकरणे नायब तहसीलदार व उपजिल्हाधिकाऱ्यांकडे पाठविली जात होती केंद्रात बाहेरच्या व्यक्तींना प्रवेश बंदी करण्यात आली आहे. नव्याने रेकॉर्ड रूम तयार करण्यात येणार आहे.भरारी पथकाला लावले कामालादलालांना हुसकावून लावण्यासाठी नियुक्त करण्यात आलेल्या भरारी पथकाला जिल्हाधिकाऱ्यांनी कामाला लावले आहे. शनिवारी या पथकाची निवासी उपजिल्हाधिकाऱ्यांनी बैठक घेऊन दिवसातून तीन वेळा सेतू केंद्राला भेट देण्याचे आदेश दिले आहे. तहसील कार्यालयातील सेतू केंद्रातही दलालांचा सुळसुळाट आहे. तेथे तर प्रमाणपत्रासाठी रांगेत लागलेल्या पालकांना दलालांकडून विचारणा केली जाते. अधिकारी आणि पोलीस बघ्याची भूमिका घेतात हे येथे उल्लेखनीय.