शहरं
Join us  
Trending Stories
1
“८ महिने झाले तरी GR काढला नाही”; पुन्हा आंदोलनाची हाक, मनोज जरांगे पाटील तारीख जाहीर करणार
2
‘एक्स्प्रेस वे’वर पुन्हा कोंडी, पुण्याहून मुंबईकडे येणारी वाहतूक कोलमडली; ‘मिसिंग लिंक’ही ठप्प
3
कोकणातील काजू आंबा उत्पादक शेतकऱ्यांचा मुंबईत धडक मोर्चा, पोलिसांकडून आंदोलकांची धरपकड
4
"पहिल्याच दिवशी स्पष्ट सांगा की मी महत्त्वाचा नाही किंवा..."; २०२७ वर्ल्डकपबाबत विराटचे सूचक विधान
5
ट्रम्प-जिनपिंग भेटीवर रशियाची पहिली प्रतिक्रिया! 'त्या' ४० तासांच्या चर्चेत नेमकं काय घडलं? पुतिन लवकरच चीनला जाणार
6
बेरोजगारांची झुरळाशी तुलना; CJI म्हणाले, “सोशल मीडिया-RTI कार्यकर्ते बनून यंत्रणा कुरतडतात”
7
STचे तिकीट वाढणार? १२५ कोटींचा भार, डिझेल दरवाढीचा फटका; प्रताप सरनाईकांचे मोठे संकेत
8
Top Marathi News LIVE: नीट पेपरफुटी प्रकरणातील आरोपी धनंजय लोखंडेला ६ दिवसांची सीबीआय कोठडी
9
मोदीजी जे सांगत आहेत ते देशहितासाठीच, देशभक्ती सिद्ध करण्याची हीच वेळ- मुख्यमंत्री फडणवीस
10
बाप रे! आधी कलिंगड खाल्लं, मग मॅगी...; एकाच कुटुंबातील ९ जणांना झाली विषबाधा, रुग्णालयात धावपळ
11
शनि नक्षत्र गोचर २०२६: ५ राशींनी ५ उपाय अवश्य करा, शनि देईल लाभच लाभ; अधिक मास ठरेल खास!
12
सूर्य वृषभ संक्रांती २०२६: ७ राशींना यश-प्रगती, नफा-फायदा; १ उपाय करा, १ महिना चांगला लाभ!
13
धार भोजशाळा 'सरस्वती मंदिर'च! HC कडून हिंदूंना पूजेचा अधिकार, नमाजचा आदेश रद्द; आली मुस्लीम पक्षाची पहिली प्रतिक्रिया
14
युद्धकाळात भारताचा 'मास्टरस्ट्रोक'; PM मोदींच्या युएई दौऱ्यात LPG आणि पेट्रोलचा मोठा करार...
15
सावधान! स्मार्टफोनचा रिकामा डबा कचरा समजून फेकून देताय? थांबा, मिळू शकतो लाखोंचा फायदा
16
"एकतर तहासाठी तयार व्हा अथवा विनाशाचा सामना करा, ५ मिनिटांत..."; चीन दौऱ्यावरून परतताना ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
17
विमान कंपन्यांना दिलासा, महाराष्ट्र सरकारचा मोठा निर्णय; एटीएफवरील व्हॅट १८% वरून थेट ७% वर!
18
Adhik Maas 2026: अधिक मासाला 'धोंड्याचा' मास म्हणण्यामागे काय आहे नेमके कारण?
19
इंधनाच्या किमती गगनाला भिडल्या, पण 'या' ५ बाईक महागाईच्या काळातही ठरतील संकटमोचक!
20
इन्स्टाग्रामचं नवीन 'Instants' फीचर डोकेदुखी ठरतंय? 'या' सोप्या स्टेप्स फॉलो करून लगेच करा बंद!
Daily Top 2Weekly Top 5

आपत्ती व्यवस्थापन कोलमडणार नाही?

By admin | Updated: June 12, 2014 01:12 IST

पूर्व विदर्भात पावसाळ्यातील संभाव्य नैसर्गिक आपत्तीला तोंड देण्यासाठी तयार करण्यात आलेल्या आपत्ती व्यवस्थापन यंत्रणेकडे आवश्यक उपकरणांचा तुटवडा आहे. सहा जिल्ह्यांपैकी चंद्रपूर जिल्ह्यात फक्त

नागपूर : पूर्व विदर्भात पावसाळ्यातील संभाव्य नैसर्गिक आपत्तीला तोंड देण्यासाठी तयार करण्यात आलेल्या आपत्ती व्यवस्थापन यंत्रणेकडे आवश्यक उपकरणांचा तुटवडा आहे. सहा जिल्ह्यांपैकी चंद्रपूर जिल्ह्यात फक्त एकच जनरेटर आहे. इतर जिल्ह्यात तो नाही. इतर आवश्यक उपकरणांच्या बाबतीतही अशीच अवस्था असल्याने ही यंत्रणा किती सक्षम आहे याचा प्रत्यय यावा. रात्रीच्या वेळी अनेक ठिकाणी पूरपरिस्थिती उद््भवली तर बचाव कार्यासाठी जनरेटरची जुळवाजुळव करण्यासाठी धावपळ होण्याची शक्यता नाकारता येत नाही.
पावसाळापूर्व नियोजनाचा एक भाग म्हणून नैसर्गिक आपत्तीला तोंड देण्यासाठी प्रत्येक जिल्ह्यात आपत्ती व्यवस्थापन यंत्रणा सुसज्ज करण्याचा दावा केला जातो. त्याचे समन्वयन नियंत्रण विभागीय आयुक्त कार्यालयातून केले जाते. जिल्हा पातळीवर आढावा घेतल्यानंतर विभाग पातळीवर व नंतर राज्य पातळीवर आढावा घेतला जातो. अलीकडेच राज्यपातळीवर अशा प्रकारची बैठक झाली. त्या बैठकीत पूर्व विदर्भातील तयारीची माहिती देण्यात आली. या माहितीनुसार आवश्यक उपकरणांचा प्रत्येक जिल्ह्याकडे तुटवडा असल्याचे दिसून येते. रात्रीच्या वेळी पूरपस्थिती उद््भवली तर मदतकार्यासाठी जनरेटरची गरज भासते. मात्र सहा जिल्ह्यांपैकी चंद्रपूर जिल्ह्यात जनरेटर आहे व तोही एकच आहे. पूर्व विदर्भात संभाव्य पुराचा धोका असणारी एकूण ६८६ गावे आहेत. ही संख्या लक्षात घेता नियोजन करणे गरजेचे होते. प्रत्यक्षात तसे झाले नसल्याचे आकडेवारी सांगते. नागपूर जिल्ह्यात २३४, वर्धा जिल्ह्यात ८८, भंडारा जिल्ह्यात १४९, गोंदिया जिल्ह्यात ८७, चंद्रपूर जिल्ह्यातील ८६ आणि गडचिरोली जिल्ह्यातील ४२ गावांना पुराचा धोका असताना या जिल्ह्यांकडे जनरेटर नाही. एकाच दिवशी अनेक गावात पूरपरिस्थिती उद््भवण्याच्या घटना यापूर्वी पूर्व विदर्भात घडल्या आहेत. त्यात नागपूर जिल्ह्याचासुद्धा समावेश आहे.
अंधारात मदत कार्यासाठी सर्च लाईटची गरज भासते. नागपूर जिल्ह्यात फक्त ४ सर्च लाईट आहेत. गडचिरोलीत तर एकही नाही. नागपूर, भंडारा, गोंदिया आणि चंद्रपूर जिल्ह्यात प्राथमिक उपचारासाठी लागणाऱ्या ‘फर्स्ट एड्् किट’यंत्रणेकडे नाही. एकूणच परिस्थिती गंभीर आहे. (प्रतिनिधी)