शहरं
Join us  
Trending Stories
1
अजितचा स्वभाव मला माहीत आहे, तो कधीही...; निवडणुकीच्या अंतिम टप्प्यात पवारांचं मोठं वक्तव्य
2
परळीत लोकशाही नव्हे तर गुंडाराज?; व्हिडीओ पोस्ट करत रोहित पवारांचा सवाल
3
"मुंबई बॉम्बहल्ल्यातील आरोपी प्रचारात पाहून बाळासाहेबांच्या आत्म्यालाही वेदना होत असतील"
4
पुण्याच्या वानवडी भागात ज्वेलर्सच्या दुकानावर दरोडा; ३०० ते ४०० ग्राम सोने घेऊन दरोडेखोर पसार
5
Rohit Sharma अखेर व्यक्त झाला! मुंबई इंडियन्सच्या अपयशाचं खरं कारण सांगितलं, म्हणाला... 
6
"पाकिस्तानात निघून जा अन् तिथे मुस्लिमांना आरक्षण द्या"; CM सरमा यांचा लालू यादवांवर निशाणा
7
निस्वार्थी सुरेश रैना! विराट कोहलीनं सांगितली जगाला माहीत नसलेली Mr. IPL ची गोष्ट, Video 
8
आधी पाया पडते, पदर पसरते म्हणणारे आता गुरगुरत आहेत; जरांगेंची मुंडे बहीण-भावावर टिका
9
MS Dhoniची फिल्ड प्लेसमेंट, रोहितचा पूल शॉट अन्....; विराटला हवी आहेत ६ खेळाडूंची कौशल्य
10
32000 रुपयांचा बँक बॅलन्स, 9 लाखांचे शेअर्स... स्वाती मालीवाल यांच्याकडे किती संपत्ती? जाणून घ्या...
11
Smriti Irani : "अमेठीत पोलिंग बूथ कॅप्चर करणारे एका सामान्य कार्यकर्तीकडून हरले..."; स्मृती इराणींचा घणाघात
12
Ashok Gehlot : "काँग्रेसचं सरकार असतानाही राम मंदिर बांधलं असतं कारण..."; अशोक गेहलोत यांचा मोठा दावा
13
दादा कोंडकेंच्या 'मुका घ्या मुका' चित्रपटाची अलका कुबल यांना होती ऑफर पण...
14
PM नरेंद्र मोदींची आज दिल्लीत सभा, १३ देशांचे राजदूत उपस्थित राहणार!
15
"भारतापेक्षा अधिक तेजस्वी, प्रखर लोकशाही जगात कुठेही नाही"; व्हाईट हाऊसने केली स्तुती
16
...तर २८८ जागा लढवणार, ७ ते ८ उपमुख्यमंत्री करणार; मनोज जरांगे पाटलांचा फॉर्म्युला ठरला
17
'राजा हिंदुस्तानी'साठी करिश्मा कपूर नाही तर ऐश्वर्या राय होती पहिली पसंती, या कारणामुळे अभिनेत्रीने नाकारला सिनेमा
18
१५,२०,२५ आणि ३० वर्षांसाठी घ्यायचंय ३० लाखांचं Home Loan, किती द्यावा लागेल EMI, किती व्याज?
19
MI च्या शेवटच्या सामन्यानंतर कोच बाऊचर यांचा प्रश्न, पुढे काय? रोहित शर्मानं स्पष्ट सांगितलं
20
मोठी बातमी! MI च्या खराब कामगिरीनंतर सूत्र हलली; BCCI चा फैसला, रोहितलाही फटका

नागपूर एसटीकडून डिजिटल इंडियाला वाकुल्या; रोख पैसे असतील तरच चढता येणार पायरी

By नरेश डोंगरे | Published: September 11, 2022 5:49 PM

 नागपूर एसटीकडून डिजिटल इंडियाकडे दुर्लक्ष केले जात आहे. 

नागपूर: महानगरांसोबत छोट्या-छोट्या खेड्यात दिमाखाने धावणारी, महाराष्ट्राच्या नागरिकांची लाडकी लालपरी ७५ वर्षांची झाली आहे. सुवर्ण महोत्सवी वर्षांत वाटचाल करणाऱ्या लालपरीने वेगवेगळ्या नावाने अनेकदा स्वतात बदल करून घेतले असले तरी एसटीने डिजिटल इंडियाला मात्र अद्याप थारा दिला नाही. कॅशलेस पेमेंटला एसटी वाकुल्या दाखवत फिरत आहे. रोख पैसे असेल तरच पायरी चढा, अशी आजही एसटीची भूमिका आहे. नोटबंदी अन् नवे चलन येण्याची प्रक्रिया देशात सुरू झाल्यापासून डिजिटल इंडियाचा नारा देशभर बुलंद झाला. प्रत्येक क्षेत्रात, प्रत्येक विभागात कॅशलेस व्यवहाराला सुरूवात झाली. शहरांमध्येच नव्हे तर गावखेड्यातही मोठमोठे, बहुतांश व्यवहार कॅशलेस होऊ लागले. कुठे १० रुपयांचा चहाही घ्यायचा असेल तर कॅशलेसची सुविधा मिळते.

विमानापासून, टॅक्सीपर्यंत गुगल पे, फोन पे करा अन् प्रवास करा, अशी सुविधा उपलब्ध झाली. ऑटोवालेही ग्राहकांसमोर गुगल, फोन पे चे पर्याय देतात. एसटी महामंडळ मात्र अजूनही डिजिटल इंडियाला वाकुल्या दाखवत आहे. येथे गुगल, फोन पे तर सोडाच कोणते कार्डही स्वॅप होत नाही. बसमध्ये प्रवास करायचा असेल तर रोख रकमेशिवाय पर्याय नाही. रोख पैसे द्या अन् एसटीत या असा सरळ सरळ हिशेब एसटीने ठेवला आहे.

अनेकदा बदलले रूपराज्यातील ९२ टक्के गावात लालपरी पोहचली आहे. उन्हाळा असो पावसाळा असो की हिवाळा, ती १२ महिने तेवढ्याच उत्साहाने धावते. प्रवाशांची ने-आण करण्यासाठी अहोरात्र सज्ज असते. गेल्या काही वर्षांत तिने पारंपारिकता जोपासताना अनेकदा कात टाकून आपले रुपडे बदलले आहे. त्याचाच भाग म्हणून कधी ती एशियाड झाली. कधी शिवनेरी तर कधी शिवशाही बनली. आता अत्याधुनिक अशा शिवाईच्या रुपातही धावत आहे.

पेमेंट ऑप्शनबाबत 'तोच तो पणा'प्रवाशांना अधिक आरामदायक प्रवासाची सुविधा देण्याचा दावा करणाऱ्या एसटी महामंडळाने पेमेंट ऑप्शनच्या बाबतीत मात्र 'तोच तो पणा' अवलंबला आहे. त्यामुळे अनेक प्रवासी एसटीकडे पाठ फिरवत आहेत. या संबंधाने एसटीच्या अधिकाऱ्यांकडे विचारणा केली असता लवकरच कॅशलेसचे ऑप्शन उपलब्ध होणार असल्याचे अधिकारी सांगतात.

 

टॅग्स :nagpurनागपूरdigitalडिजिटलIndiaभारत