संशयित शिक्षकांमुळे आता डायट अधिकारी अडचणीत? परवानगीशिवाय शिक्षकांच्या सुनावणीत सहभागी
By निशांत वानखेडे | Updated: September 20, 2025 19:44 IST2025-09-20T19:31:06+5:302025-09-20T19:44:37+5:30
Nagpur : ६३२ शिक्षकांच्या सुनावणीची किंमत डायट अधिकाऱ्यांना चुकवावी लागणार?

DIET officials now in trouble due to suspected teachers? Participated in teachers' hearings without permission
नागपूर : शिक्षण उपसंचालकांच्या सुचनेनुसार बाेगस शालार्थ आयडी प्रकरणातील संशयित शिक्षकांच्या सुनावणीत डायटचे अधिकारी अडचणीत येण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. वरिष्ठांची परवानगी न घेता सुनावणीत सहभागी झाल्याने त्यांच्यावर कारवाई हाेण्याची शक्यता सुत्रांनी व्यक्त केली आहे.
शालार्थ आयडी घाेटाळ्याच्या प्रकरणात संशयित असलेल्या जिल्ह्यातील ६३२ शिक्षकांची सुनावणी शिक्षण उपसंचालकांकडून घेण्यात येत आहे. राज्यभर गाजणाऱ्या या प्रकरणात आतापर्यंत २० जणांवर गुन्हे दाखल करण्यात आलेत. तर संचालक स्तरावरून सुद्धा चौकशी करण्यात आली. यात ६३२ शिक्षकांची कागदपत्र न मिळाल्याने ते संशयाच्या भोवऱ्यात आहे. शासन निर्णयानुसार या संशयित शिक्षकांची एकस्तर सुनावणी शिक्षण उपसंचालकांकडून घेण्यात येत आहे. शिक्षकांची संख्या जास्त असल्याने शिक्षण उपसंचालक माधुरी सावरकर यांनी डायटच्या अधिकाऱ्यांची मदत घेतली आहे. शिक्षकांचे कागदपत्र तपासण्यासाठी दोन समित्या तयार केल्या. यात दोन्ही समित्यांचे प्रमुख नागपूर व वर्ध्यातील डायटचे प्राचार्य आहेत.
या शिवाय नागपूरमधील डायटचे आणखी तीन कर्मचारी घेण्यात आले. यामुळे डायटच्या कामावर परिणाम झाला आहे. सुनावणी समितीत सहभागी होण्यासाठी वरिष्ठांची कुठल्याच प्रकारची परवानगी घेतली नसल्याचे सांगण्यात येते. कागदपत्रांची तपासणी हे प्रशासकीय काम आहे. प्रशासकीय कामात हस्तक्षेत न करण्याचे सूचना असतानाही ते काम करीत आहे. त्यामुळे आता डायटच्या अधिकाऱ्यांवर कारवाई होण्याची शक्यता असल्याने ते अडचणीत येणार असल्याची चर्चा आहे. शैक्षणिक गुणवत्ता वाढीसाठी आवश्यक उपक्रमासह प्रशिक्षण देण्याचे काम डायटचे आहे. परंतु ते न करता कागदपत्रांची तपासणी करीत आहे. हे करताना त्यांनी वरिष्ठांची कोणतही पूर्व परवानगी घेतली नसल्याचे सांगण्यात येते. एक प्रकारे त्यांनी शिस्तभंग केल्याचे बोलल्या जात आहे.