शहरं
Join us  
Trending Stories
1
भारताशेजारील देशांमध्ये भूकंपांची मालिका सुरूच, आता या देशात भूकंपाचे धक्के; किती होती तीव्रता?
2
इथिओपियात ज्वालामुखी उद्रेक; राखेचे ढग भारताच्या दिशेने, DGCA चा विमान कंपन्यांना अलर्ट जारी
3
नागपुरातील पत्रकार परिषदेत भडकले होते 'ही मॅन' धर्मेंद्र; कंधार विमानाचे अपहरण अन् पाजीचा सच्चेपणा...
4
युपी विधानसभा, रेल्वे स्टेशन आणि शाळांना बॉम्बने उडवण्याची धमकी; राजधानीत हायअलर्ट
5
चंद्रपूर पुन्हा हादरले; अल्पवयीन मुलीवर अत्याचार, नराधम शिक्षकास अटक
6
एक व्यक्ती इथे नाही, त्याची उणीव...; धनंजय मुंडेंना परळीतील सभेत वाल्मिक कराडची आठवण
7
UAE ला जात होतं इंडिगो विमान, अचानकच 10000 वर्षांनंतर झाले ज्वालामुखीचे स्फोट अन् मग...!
8
“आता गृह मंत्रालय घेतले, पुढे भाजपावाले नितीश कुमारांचे CM पद काढून घेतील”; कुणाचा दावा?
9
सोन्याच्या खाणीत गुंतवणूक करा, 5 वर्षांची कर सूट मिळवा; अफगाणिस्तानची भारताला मोठी ऑफर
10
शिंदेसेनेला पुन्हा एकदा सहकाऱ्याचा धक्का, नगराध्यक्षपदाच्या उमेदवारचा भाजपमध्ये प्रवेश
11
७०० कोटींचा खर्च केला, पण वंदे भारत ट्रेनची सेवा नाहीच; प्रवाशांची गैरसोय, नाराजी वाढली?
12
Dharmendra : "ते मला नेहमी म्हणायचे की...", धर्मेंद्रजींच्या निधनानंतर सचिनसह विराटही झाला भावूक
13
आता मुंबईतही बिबट्याची दहशत! दिंडोशी म्हाडाच्या बंगल्यात बिबट्याचा संचार
14
“भावनिक वातावरण तयार करून मते मिळवण्याचा प्रयत्न”; राज ठाकरेंच्या विधानावर भाजपाचे उत्तर
15
जुना, वापरलेला फोन खरेदी करताय? थांबा! एका चुकीमुळे होऊ शकते हजारोंचे नुकसान, आताच जाणून घ्या..
16
रिलायन्स जिओला ग्राहक वैतागले! कॉलवेळी ऐकायलाच येत नाहीय..., प्रचंड समस्या, बीएसएनएल परवडले...
17
मोठा पेच...! धर्मेंद्र यांच्या ४५० कोटींच्या संपत्तीचे वारसदार कोण? दोन पत्नी, ६ मुले... 
18
Dharmendra Last Rites: देओल कुटुंबीयांचा आधार हरपला; अभिनेते धर्मेंद्र अनंतात विलीन, सनी देओलने दिला मुखाग्नी
19
"सरकारनं माझं ऐकलं नाही तर संसदेच्या छतावरून उडी मारेन"; जेव्हा राजकारणात दिसली धर्मेंद्र यांची 'शोले स्टाईल'
20
Women’s Kabaddi World Cup 2025: कबड्डीतही भारताच्या लेकी जगात भारी! सलग दुसऱ्यांदा जिंकली वर्ल्ड कप स्पर्धा
Daily Top 2Weekly Top 5

नागपुरातील पत्रकार परिषदेत भडकले होते 'ही मॅन' धर्मेंद्र; कंधार विमानाचे अपहरण अन् पाजीचा सच्चेपणा...

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 24, 2025 23:01 IST

२५ वर्षांपूर्वीचा हा किस्सा आहे. तत्कालिन क्रिडा आणि सांस्कृतिक मंत्री अनिल देशमुख यांनी ६ जानेवारी २०००ला त्यांच्या नागपुरातील निवासस्थानी धर्मेंद्र यांच्या पत्रकार परिषदेचे आयोजन केले होते.

 

नरेश डोंगरे -

नागपूर : कुत्ते, कमिने, मै तेरा खून पी जाऊंगा... मै उन्हे चून चून के मारूंगा... असे म्हणत रुपेरी पडद्यावर खऱ्या अर्थाने दबंगगिरी करणारे चित्रपट सृष्टीतील 'ही मॅन' नागपुरातील पत्रपरिषदेतही एकदा भडकले होते. मात्र, त्यानंतर काही वेळेतच त्यांनी वास्तव जिवनातील 'हिरोगिरी'वर भाष्य करीत वातावरण हलके-फुले केले होते.२५ वर्षांपूर्वीचा हा किस्सा आहे. तत्कालिन क्रिडा आणि सांस्कृतिक मंत्री अनिल देशमुख यांनी ६ जानेवारी २०००ला त्यांच्या नागपुरातील निवासस्थानी धर्मेंद्र यांच्या पत्रकार परिषदेचे आयोजन केले होते. वातावरण अतिशय हलके फुले असताना एका पत्रकाराने 'ईशा देओल'ला चित्रपटात कधी आणणार, असा सवाल केला. या प्रश्नाने धरमपाजी भडकले. त्यांनी व्यक्तीगत प्रश्न कशाला विचारता, असे म्हणत नाराजी व्यक्त केली. त्यांचे मूड गेल्याचे लक्षात येताच दुसऱ्या एका पत्रकाराने विषय बदलवला. २४ डिसेंबर १९९९ ला काठमांडू ते दिल्ली उड्डाण करणाऱ्या इंडियन एअरलाईन्सच्या आयसी ८१४ विमानाचे दहशतवाद्यांनी अपहरण केले होते. या विमानात १५ क्रू मेंबर आणि १९१ प्रवासी होते. हे प्रकरण तेव्हा देश-विदेशात चर्चेत होते. त्याला अनुसरून एका पत्रकाराने धर्मेंद्र यांना विचारले, 'आप उस फ्लाईट मे होते तो क्या करते, क्या उन आतंकियो मार मार कर, अपने सभी देशवासियोंको सही सलामत वापस लाते', असा हा प्रश्न होता. धर्मेंद्र यांनी त्याचे उत्तर देताना म्हटले...'नही भाई... फिल्मो की बात और है... असल जिंदगी मे हम भी आप जैसे ही एक सिधे साधे ईन्सान है. सो मै उस फ्लाईट मे होता तो बाकी पॅसेंजर ने जो किया, वही मै भी करता. त्यांचे हे उत्तर त्यांच्यातील सच्चेपणाची जाणीव करून देणारे होते. परिणामी 'बहोत खूब' म्हणत त्यांना पत्रकारांसह अन्य उपस्थितांनीही दाद दिली होती.पल पल दिल के पास...चा प्रसंग, कल्याणजी म्हणाले...चित्रपटात मारधाड करणारे धर्मेंद्र प्रत्यक्षात मात्र खूप हळवे होते, हे सांगताना सुप्रसिद्ध संगितकार कल्याणजी (आनंदजी) भाई यांनी १० जुन २०२३ ला नागपुरातील एका कार्यक्रमात केंद्रीय मंत्री नितीन गडकरींच्या उपस्थितीत झालेल्या एका स्टेज शो मध्ये किस्सा ऐकवला होता. १९७३ ला ब्लॅकमेल चित्रपटात कल्याणजी-आनंदजीच्या जोडीने त्यांच्यासाठी 'पल पल दिल के पास... तुम रहेती हो...' हे गीत बनविले. त्यावर अभिनय करताना धर्मेंद्र यांच्या चेहऱ्यावरचे भाव कसे अप्रतिम होते अन् डायरेक्टर, प्रोड्युसरसह आम्ही सर्वच कसे ते पाहून स्तंभित झालो होतो, ते कल्याणजी यांनी सांगितले. यावेळी खचाखच भरलेल्या सुरेश भट सभागृहाने प्रचंड टाळ्यांचा कडकडाट केला होता. 

English
हिंदी सारांश
Web Title : Dharmendra's outburst in Nagpur, Kandahar hijacking, and Paji's truthfulness.

Web Summary : Dharmendra, known for his on-screen दबंगगिरी, once flared up at a Nagpur press conference over a personal question. Later, he spoke candidly about the Kandahar hijacking, admitting he'd react like any ordinary passenger, showcasing his honesty. A touching anecdote about the song 'Pal Pal Dil Ke Paas' was also shared.
टॅग्स :Dharmendraधमेंद्रnagpurनागपूर