“अध्यक्षपदाची केवळ चर्चाच”; देवेंद्र फडणवीस यांनी केले स्पष्ट, नाकारली शक्यता
By ऑनलाइन लोकमत | Updated: August 3, 2024 06:04 IST2024-08-03T06:04:19+5:302024-08-03T06:04:54+5:30
ते सध्या तरी राज्यातच काम करतील, असे दिसते.

“अध्यक्षपदाची केवळ चर्चाच”; देवेंद्र फडणवीस यांनी केले स्पष्ट, नाकारली शक्यता
लोकमत न्यूज नेटवर्क, नागपूर : उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष होतील, अशी चर्चा सुरू आहे. मात्र, फडणवीस यांनी शुक्रवारी ही शक्यता नाकारली. भाजपचा मी राष्ट्रीय अध्यक्ष होणार ही चर्चा मीडियानेच सुरू केली असून ती केवळ मीडियामध्येच आहे, असे त्यांनी स्पष्ट केले.
जिल्हा नियोजन समिती बैठकीत फडणवीस उपस्थित होते. बैठकीत आलेल्या नेत्यामंध्येही फडणवीस हे राष्ट्रीय अध्यक्ष होणार असल्याची कुजबुज सुरू होती. शेवटी फडणवीस यांनीच या विषयावरील पडदा उचलला. ते राष्ट्रीय अध्यक्ष होणार नाहीत, असे त्यांनी स्पष्ट केले. ते सध्या तरी राज्यातच काम करतील, असे दिसते.