देवेंद्र फडणवीस १५ दिवसात दुसऱ्यांदा संघ मुख्यालयात
By कमलेश वानखेडे | Updated: August 3, 2024 18:28 IST2024-08-03T18:25:52+5:302024-08-03T18:28:00+5:30
Nagpur : या भेटीत त्यांची अर्धा तास संघाच्या वरिष्ठ पदाधिकाऱ्यांसोबत चर्चा

Devendra Fadnavis at the RSS headquarters for the second time in 15 days
नागपूर : उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शनिवारी सकाळी रेशीमबाग येथील राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या मुख्यालयात दाखल झाले. या भेटीत त्यांची सुमारे अर्धा तास संघाच्या वरिष्ठ पदाधिकाऱ्यांसोबत चर्चा झाली. फडणवीस यांचे नाव राष्ट्रीय अध्यक्षपदासाठी चर्चेत असताना अध्यक्षपदासाठी नाव चर्चेत असताना या भेटीला विशेष महत्व प्राप्त झाले आहे. विशेष म्हणजे गेल्या १५ दिवसात फडणवीस यांची संघ मुख्यालयातील ही दुसरी भेट आहे.
राष्ट्रीय अध्यक्षपदासाठी आपले नाव नाही. ही चर्चा फक्त आपण मिडियातूनच ऐकतो आहे, असे फडणवीस यांनी शुक्रवारी नागपुरात स्पष्ट केले होते. त्यानंतर शनिवारी सकाळी फडणवीस संघ मुख्यालयात पोहचले. महायुती सरकारमध्ये सुरू असलेल्या हालचाली, आगामी काळात होऊ घातलेल्या विधानसभेच्या निवडणुका या पार्श्वभूमीवर ही भेट महत्वाची मानली जात आहेत.
विधानसभा निवडणूक तोंडावर असताना फडणवीस यांना दिल्लीत पाठविणे योग्य राहील का, की विधानसभेच्या निवडणुकीनंतर याबाबत निर्णय घ्यावा, यावर पक्षात मंथन सुरू आहे. या पार्श्वभूमीवर फडणवीस हे संघाच्या वरिष्ठ पदाधिकाऱ्यांशी सातत्याने संपर्कात असल्याची माहिती आहे.